Home » अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी २००५ साली दिली होती भविष्यातील मंदीची सूचना!

अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी २००५ साली दिली होती भविष्यातील मंदीची सूचना!

by Team Gajawaja
0 comment
Financial expert Raghuram Rajan Marathi info
Share

जेव्हा वर्तमानपत्रात “देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल, तर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांना परत बोलवावे लागेल”, अशा बातम्या झळकल्या त्यावेळी सर्वांनी गुगलवर रघुराम राजन सर्च करायला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने रिझर्व्ह बँकेचे २३ वे गर्व्हनर असणारे रघुराम राजन यांना आपण तेव्हापासून ओळखायला लागलो होतो. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर होते. ते पहिले असे गर्व्हनर असतील ज्यांना सर्वात कमी काळ पदावर राहायला मिळाले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात त्यांनी डी सुब्बाराव यांच्यानंतर पदावर बसण्याचा बहुमान मिळाला होता. त्यांनी सप्टेंबर २०१३ साली पद स्वीकारले होते आणि २०१६ साली पदावरून पायउतार झाले. 

सुरुवातीपासूनच अभ्यासासोबतच बाकी गोष्टींमध्ये हुशार असणाऱ्या रघुराम राजन (Raghuram Rajan) यांचा जन्म एका सधन आणि सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९६३ रोजी भोपाळ, मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. तमिळ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या राजन यांचे वडील पेशाने प्रशासकीय अधिकारी होते. सन १९५३ च्या बॅचचे रघुराम यांचे वडील गोविंद राजन हे आयपीएस अधिकारी होते. त्यांना ३ भाऊ आणि राजन असे मिळून ४ मुले होती. 

वडिलांची सेवा सरकारी विभागात असल्यामुळे कुटुंबासोबत राजन यांचे लहानपणीचे दिवस भारताबाहेर गेले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जर्मनी येथे झाले. त्यानंतर १९७४ साली ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी ‘दिल्ली पब्लिक स्कुल’ येथे पुढील शिक्षण पूर्ण झाले. शाळेच्या जीवनापासूनच हुशार असणारे रघुराम राजन भविष्यात जाऊन अर्थतज्ज्ञ बनतील हे त्यांच्या ध्यानी मनी पण नव्हते. 

शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्ली येथून पुढील शिक्षणाला सुरुवात केली. पदवीचे शिक्षण करत असताना राजन हे सर्व गुणांनी परिपक्व बनत चालले होते. त्यांच्या याच गुणाला सोनेरी किनार गोल्ड मेडलच्या रूपाने मिळाली. त्यांना सन १९८४ रोजी बेस्ट ऑल राउंडर विद्यार्थी पुरस्कार मिळाला. मग मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. राजन जिथे जात होते तिथे ते आपली छाप सोडत असत. १९८७ साली आयआयएम अहमदाबाद येथून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट मधून कोर्स पूर्ण केला. तिथेही त्यांनी गोल्ड मेडल मिळवले. 

रघुराम राजन (Raghuram Rajan) यांची शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी होत होती. जेव्हा त्यांचा बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला तेव्हा त्यांनी ट्रेनी म्हणून टाटा कंपनी जॉईन केली. पण काहीच दिवसात त्यांना ही नोकरी सोडावी लागली कारण त्यांची पीएचडी कार्यक्रमासाठी एमआयटी सलोन स्कुल ऑफ मॅनेजमेंट कार्यक्रमासाठी निवड झाली. या ठिकाणी त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली.

======

हे देखील वाचा: हळदीची लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील महाराणाची कहाणी

===== 

रघुराम राजन (Raghuram Rajan) यांचे पहिल्यापासूनच बँकिंग, फायनान्स आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट हे आवडीचे विषय राहिले आहेत. ते एक जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची शपथ सप्टेंबर २०१३ मध्ये घेतली होती. जेव्हा त्यांनी हे पद ग्रहण केले तेव्हा काँग्रेस पक्षाचे सरकार होते. त्यावेळी पंतप्रधान असणाऱ्या मनमोहन सिंह यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. त्यांनी २००३ ते २००६ या वर्षी आंतरराष्ट्रीय आर्थिक नाणेनिधीचे अर्थतज्ज्ञ म्हणून काम यशस्वी काम केले. 

भारतात जेव्हा योजना आयोगाने वित्तीय सुधारणांसाठी नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. २०११ साली अमेरिका देशातील अमेरिकन अर्थसंस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांना अर्थक्षेत्रातील दांडगा अनुभव असून, ते सध्या द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे विद्यार्थ्यांना कार्यरत आहेत. 

रघुराम राजन (Raghuram Rajan) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर राधिका पुरी राजन यांच्यासोबत त्यांचा सुखाचा संसार चालू आहे. त्यांची भेट आयआयएम अहमदाबाद येथे झाली होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

रघुराम राजन यांनी २००५ सालीच भविष्यात येणाऱ्या मंदीची कल्पना देऊन ठेवली होती. तेव्हा त्यांना सर्वानी वेड्यात काढले होते. पण जेव्हा २००८ साली मोठ्या प्रमाणावर जगभरात आर्थिक मंदी आली तेव्हा मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला होता. 

रघुराम राजन यांना त्यांचा गव्हर्नर म्हणून कारभार पूर्ण करता आला नाही. त्यानंतर त्यांनी परत आपला मोर्चा शिकागो युनिव्हर्सिटीकडे वळवला. एवढ्या हुशार अर्थतज्ज्ञाची भारत देशात जर उपेक्षा होत असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. 

विवेक पानमंद 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.