प्रत्येक घरामध्ये डेकोरेशनसाठी आपण अनेकदा विविध प्रकारच्या मुर्त्या, शो पीस बघतो. घराची शोभा वाढावी म्हणून या गोष्टी ठेवल्या जातात. मात्र या गोष्टींमागे काही तथ्य देखील आहेत. या गोष्टी कोणी, कुठे आणि कशा ठेवायच्या? त्या ठेवल्यावर काय फायदे होतात? याबद्दल देखील अभ्यासक आणि तज्ज्ञ लोकं या मागील शास्त्र सांगतात.
घरामध्ये शो पीस म्हणून अनेक लोकं लाफिंग बुद्धा ठेवतात. छोटासा, जाड, गोल मटोल आणि मोठ्याने हसत उभा असलेला हा लाफिंग बुद्धा आपल्या घराचे सौंदर्य वाढवताना सगळ्यांचे लक्ष आकर्षित करतो. मात्र तुम्हाला माहित आहे का?, हा लाफिंग बुद्धा घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हा बुद्धा तुमचे जीवन सकारात्मक आणि आनंददायी करण्यासाठी मदत करू शकतो.
लाफिंग बुद्धा हा जरी चिनीच्या फेंगशुईमधून आला असला तरी भारतात या लाफिंग बुद्धाची लोकप्रियता खूप आहे. सोबतच या बुद्धाला आपल्या वास्तुशास्त्रात विशेष मानले जाते. आपल्या वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाला सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. जर योग्य दिशा आणि वास्तूनुसार हा लाफिंग बुद्धा आपण घरात ठेवला तर घरामध्ये पैशाशी संबंधित समस्या कधीच येत नाहीत. बरेच लोकं घरासोबतच त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि कार्यालयांमध्ये लाफिंग बुद्धा ठेवतात.
– आर्थिक समस्या असतील, घरात सतत उदास वातावरण असेल. अशावेळी लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेऊन तुम्ही तुमच्या समस्यांवर मात करू शकता.
– वास्तू शास्त्रात लाफिंग बुद्धाला सुख-संपत्ती आणि प्रगतीचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे याला घरात ठेवल्यामुळे आर्थिक संपन्नता आणि सकारात्मकता येते.
– तुम्ही लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी ठेऊ शकता.
– या मूर्तीला कधीही जमीनीपासून अडीच फुट वर किंवा मुख्य दरवाज्याच्या अगदी समोर ठेवावे.

– या लाफिंग बुद्धाच्या हसणाऱ्या मूर्तीला आनंद, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे.
– लाफिंग बुद्धाचे पोट मोठे असते. या लाफिंग बुद्धाचे मोठे पोट हे संपन्नतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या मूर्तीला घराच्या मुख्य दारासमोर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते.
– तसेच हातात किंवा पाठीवर धनाची पोटली घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती चांगली मानली जाते.
– वास्तू शास्त्रानुसार बेडरूम आणि स्वयंपाक घरात लाफिंग बुद्धाचा फोटो किंवा मूर्ती ठेऊ नये. कारण यामुळे घरात नकारात्मकता येते.
– लाफिंग बुद्धाची दोन्ही हात वर असलेली मूर्ती दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवा. यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील.
– घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी ड्रॅगनवर विराजमान लाफिंग बुद्धा घरात ठेवा.
– लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात अशा ठिकाणी ठेवावी, जिथे घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती दिसेल.
– पैशाशी संबंधित समस्या असल्यास घरात पैशांचा गठ्ठा हातात असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवा.
– अपत्यहीन जोडपे मुलांसोबत खेळतानाची लाफिंग बुद्धाची मूर्ती घरी ठेवावी.
– लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात पूर्वेकडे ठेवावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
– लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे नाक घराच्या मालकाच्या हाताच्या बोटाइतके असावे.
– वास्तूशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती किचन, बेडरूम, डायनिंग रूम किंवा टॉयलेट-बाथरूमजवळ ठेवू नये.
– स्टडी रूममध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवता येते. त्यामुळे मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल.
– जर तुम्ही अनेकदा आजारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल तर लवकर बरे होण्यासाठी तुम्ही आजारी व्यक्तीच्या उशीजवळ वू लू असलेला लाफिंग बुद्ध ठेवावा.
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
