Home » सोशल मीडियात बनावट आर्थिक सल्ले देणाऱ्यांवर बसणार चाप, SEBI करणार कारवाई

सोशल मीडियात बनावट आर्थिक सल्ले देणाऱ्यांवर बसणार चाप, SEBI करणार कारवाई

by Team Gajawaja
0 comment
Investment Tips
Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की, युट्यूब,टेलिग्राम सारख्या अन्य माध्यमातून सामान्य लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा चुकीचा सल्ला देणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. कारण आता सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI कठोर कारवाई करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर सक्रिय काही सोशल मीडिया इंन्फ्लुयएन्सर्सचा प्रभाव आहे आणि बहुतांश फॉलोअर्स असे मानतात की, त्यांच्या द्वारे दिलेला सल्ला हा गुंतवणूकीसाठी फायदेशीर ठरु शकतो. (Fake Investment Tips)

मार्केटमधील तज्ञांनी असे म्हटले आहे की, एकदा असे उदाहरण पाहायला मिळाले जेथे प्रभावशाली लोक सुद्धा चुकीची टीप्स देतात, ज्यामुळे असे स्पष्ट होते की, त्यांना या विषयावर कोणताही माहिती नसते. दरम्यान, सध्या रेग्युलेटरी सिस्टिममध्ये असा नियम नाही ज्यामुळे असे ठरवता येते की, स्वत: ला आर्थिक सल्लागारांच्या रुपात सादर करण्यास ते सक्षम आहेत की नाही.

Fake Investment Tips
Fake Investment Tips

नव्या गाइडलाइन्सवर काम करतेय SEBI
सेबी यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतेय. सेबीने नुकतेच असे म्हटले की, अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया इंन्फ्लुअर्स द्वारे आर्थिक प्रभाव टाकण्यासंदर्भात काही गाइडलाइन्सवर काम केले जात आहे.

खरंतर सध्या सोशल मीडियात असे इंन्फ्लुअर्सची संख्या वेगाने वाढत आहे. जे सामान्य लोकांना स्टॉक आणि क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. त्याचसोबत चुकीचा डेटा देऊन दिशाभूल करतात. ऐवढेच नव्हे तर युट्यूबवर असे काही व्हिडिओ उपलब्ध आहेत ज्यावर बनावट प्रोफाइल आणि फेक फोटो लावून बड्या नावाच्या आधारावर अनधिकृत सल्ला सुद्धा दिला जातो.

हे देखील वाचा- डिजिटल ट्रांजेक्शन करणाऱ्यांसाठी अलर्ट! अशा प्रकारच्या UPI पेमेंटवर मर्यादा घातली जाऊ शकते

निष्कर्ष देऊन बनावट गुंतवणूक सल्लागार वाचणार नाहीत
हे इंन्फुअर्स उत्तरे देण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई करण्यापासून दूर राहण्यासाठी व्हिडिओखाली एक निष्कर्ष देतात की, सेबीवर रजिस्टर्ड नाही आहे. मात्र आता असे होणार नाही. बाजार नियमक सेबीने स्पष्ट केले की, असे केल्याने तुमची जबाबदारी पूर्ण होणार नाही आहे. (Fake Investment Tips)

काही सर्टिफाइड गुंतवणूकदारांनी असे म्हटले की, हे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांच्या हितासाठी एका दीर्घ काळापासून राखून ठेवलेले पाऊल आहे. तर निर्मात्यांचे अव्यवहारिक आणि बनावट दावे ट्रॅक करण्यासाठी आवश्यकता आहे. त्याचसोबत गुंतवणूकच्या क्षेत्रातील एकूणच विकास करायचा असेल तर अशा पद्धतीने कारवाई केली गेली पाहिजे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.