Home » गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट

by Correspondent
0 comment
Share

पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी गडचिरोली दौऱ्यावर असलेले नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी हेमलकसा या अतिदुर्गम भागातील लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांनी अपार मेहनतीने उभ्या केलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्येक अंगाची माहिती यावेळी श्री. शिंदे यांनी प्रकाश आमटे यांच्याकडून घेतली.

इतक्या दुर्गम भागात तीन ऑपरेशन थिएटरसह सुसज्ज रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, कृषी संशोधन, वन्यजीव मदत केंद्र आदी अनेक प्रकारच्या कार्यातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आमटे परिवार आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या अद्वितीय कार्याबद्दल श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

तसेच, राज्य शासन सदैव आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली. वन्यजीवांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी श्री. आमटे यांनी उभ्या केलेल्या रेस्क्यू सेंटरची माहितीही श्री. शिंदे यांनी यावेळी घेतली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.