जगातील सर्वाधिक मोठ्या इंस्टंट मेसेजिंक कंपन्यांपैकी एक असलेल्या व्हॉट्सअॅप युजर्ससाठी वेळोवेळी नवे फिचर्स आणते. व्हॉट्सअॅफवरील नवे फिचर आणि अपडेट्चा अनुभव हा नेहमीच उत्तम असतो. रिपोर्ट्सनुसार, कंपनी एक नव्या फिचरवर काम करत आहे. याच्या माध्यमातून युजर्सने पाठवण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजला एडिट करु शकता. दरम्यान, हे फिचर केवळ आयफोन युजर्ससाठी लॉन्च केले जाणार आहे.(Edit Message Feature)
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले मेसेज एडिट केले जाणार आहे. चॅटमध्ये मेसेडला एडिट करणे अथवा मेसेज मधील माहिती योग्य करण्यासाठी तो मेसेज डिलिट करण्याची गरज पडणार नाही आहे. अशातच नवा आणि फ्रेश मेसेज पाठवण्याची ही गरज नाही. तर याच नव्या अपडेटबद्दल अधिक जाणून घेऊयात.
नवे फिचर आल्यानंतर मेसेज पाठवल्याच्या १५ मिनिटांमध्ये कोणताही बदल अथवा एडिट करता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेट्स आणि नव्या फिचरला ट्रॅक करणारे पोर्टल वाबीटाइंफो यांच्यानुसार नव्या फिचरसोबत युजर्सला ओरिजन मेसेजमध्ये योग्य माहिती व्यवस्थिती करणे, नवी माहिती देणे अथवा चुक दुरुस्त करणे अशी कामे करता येणार आहे. अशातच अपकमिंग फिचर लोकांसाठी खुप फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान, हे लक्षात ठेवावे लागणार आहे की एडिट करण्यात आलेला मेसेजवर एडिट असा लेबल लावला जाणार आहे. मसेज पाठवणाऱ्या आणि मिळणाऱ्या युजर्सला लेबल दिसणार आहे. व्हॉट्सअॅफच्या लेटेस्ट वर्जनमध्ये एडिट मेसेज फिचर येणार आहे. हे फिचर केवळ मेसेज एडिट करण्यापर्यंतच मर्यादित राहणार आहे. याचा वापर मीडिया कॅप्शनसाठी नसणार आहे. सध्या हे फिचर आयफोन युजरसाठी डेवलप केले जाणार आहे.(Edit Message Feature)
इस्टेंट मेसेजिंक अॅप एडिट मेसेज फिचरला लवकरच बीटा टेस्टिंगसाठी रिलिज करु शकते. व्हॉट्सअॅपच्या अपकमिंग अपडेट्सच्या या फिचरला रोलआउट केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त कंपनी आयफोन युजर्ससाठी व्हिडिओ मेसेज फिचरवर ही काम करत आहे. यामुळे वॉयस नोट्स प्रमाणे ६० सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ पाठवता येणार आहे.
हे देखील वाचा- ट्विटरवरील सोर्स कोड ऑनलाईन लीक
दरम्यान, व्हॉट्सअॅपमध्ये तुम्ही डिलिट केलेले मेसेज पुन्हा वाचू शकता. यासाठी मात्र थर्ड पार्टी अॅप तुम्हाला डाउनलोड करावे लागले. या अॅपचे नाव Get Deleted Messages असे आहे. याच्या माध्यमातून डिलिट करण्यात आलेले मेसेजचा रेकॉर्ड ठेवला जातो. म्हणजेच एखादा मेसेज पाठवल्यानंतर डिलिट केल्यास आणि काही वेळासाठी नोटिफिकेशन पॅनलमध्ये दाखवला जात असेल तर तो अॅपमध्ये येऊन वाचता येऊ शकतो.