पासपोर्ट म्हणजे भारताबाहेर प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. पासपोर्टशिवाय आपण दुसऱ्या कोणत्याही देशात प्रवास करूच शकत नाही. प्रत्येक देश आपल्या नागरिकांना पासपोर्ट देऊ करतो. हा पासपोर्ट तुमच्या नागरिकत्वाचा सर्वात मोठा पुरावा देखील समजला जातो. त्यामुळे आजकाल सर्वच लोकं पासपोर्ट काढतात. मात्र पासपोर्ट काढण्यासाठी असणारी प्रोसिजर जरा किचकट आणि मोठी आहे. मात्र आता यावर एक उत्तम उपाय म्हणून सरकारने ई पासपोर्ट सेवा नागरिकांसाठी आणली आहे. (E-Passport)
नुकतेच भारत सरकारने डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सेवा सुरू केली आहे. परदेश प्रवास अधिक सुरक्षित, सोयीचा आणि जलद करण्यासाठी ही सेवा म्हणजे एक खास पाऊल मानले जात आहे. पारंपरिक पासपोर्टच्या तुलनेत ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित असून त्यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ पर्यंत १७४ देश आणि प्रदेशांमध्ये ई-पासपोर्ट जारी करण्याची सुविधा होती. (Marathi Top News)
१ एप्रिल २०२४ रोजी पायलट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात करण्यात आली. २०२५ च्या मध्यापर्यंत देशभरात ई-पासपोर्ट सुरू होण्याची अपेक्षा आहे. पासपोर्टधारकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि डुप्लिकेशन टाळण्यासाठी सरकारने ही नवीन सेवा आणली आहे. सध्या सगळीकडेच हायटेक टेक्नॉलॉजी वापरली जात असताना पासपोर्ट देखील डिजिटल करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. ई पासपोर्टमुळे प्रवाशांची ओळख सुरक्षित राहणार आहे, शिवाय इंटरनॅशनल प्रवासात देखील मदत मिळणार आहे. मात्र सध्या ज्यांच्याकडे जुना पारंपरिक पासपोर्ट आहे, त्यांना लगेचच नवीन ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची गरज नाही. (Marathi Top News)
ई-पासपोर्ट म्हणजे काय?
ई-पासपोर्ट हा कागदी आणि इलेक्ट्रॉनिक पासपोर्टचा एकत्रित प्रकार आहे. पासपोर्टमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चिप आणि अँटेना वापरला जातो ज्यामध्ये पासपोर्ट धारकाची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती असते. पासपोर्टच्या मुखपृष्ठाच्या तळाशी छापलेले एक छोटे अतिरिक्त सोनेरी रंगाचे चिन्ह शोधून ई-पासपोर्ट ओळखता येतात. हा डेटा केवळ अधिकृत स्कॅनिंग सिस्टमद्वारेच वाचला जाऊ शकतो. (Social News)
ई-पासपोर्ट सेवा कोणत्या शहरांमध्ये सुरु आहे?
भारताच्या काही निवडक शहरांमध्ये सध्या ई-पासपोर्ट सेवा सुरु करण्यात आली आहे. यात नागपुर, चेन्नई, जयपुर, दिल्ली, हैदराबाद, रांची, शिमला, भुवनेश्वर, गोवा आणि जम्मू इत्यादी शहरांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाची नियोजनानुसार २०२५ च्या मध्यापर्यंत ही सेवा संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक भारतीय सरकारने सुरु केलेल्या ई-पासपोर्टचा फायदा घेऊ शकणार आहे. (Marathi Trending News)
=======
हे देखील वाचा : Virat-Anushka : विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक जपमाळ’
RTO : महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यात होणार नवीन आरटीओ ऑफिस
=======
ई-पासपोर्टचे फायदे कोणते?
* डिजिटल स्वाक्षरी आणि एन्क्रिप्शनमुळे डेटामध्ये छेडछाड करणे अशक्य होणार आहे. पारंपारिक पासपोर्टपेक्षा हा ई-पासपोर्ट अधिक विश्वासार्ह असणार आहे.
* ई-पासपोर्टमुळे बायोमेट्रिक डेटा अचूक ओळख पडताळणी सुनिश्चित होणार आहे. यामुळे चुकीची ओळख होण्याची शक्यता खूपच कमी होईल.
* अनेक देश व्हिसा प्रोसिजरमध्ये किंवा सीमा ओलांडण्यासाठी ई-पासपोर्ट धारकांना प्राधान्य देत आहेत. यामुळे प्रवास करणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
* इंटरनेशनल एयरपोर्ट्सवर इमिग्रेशन प्रोसेसमधून जाताना तेथील अधिकाऱ्यांना या चिपच्या मदतीने तुमची माहिती त्वरित उपलब्ध होईल. यामुळे वेरिफिकेशनच्या वेळेची बचत होणार आहे.
ई-पासपोर्ट कसा मिळवायचा?
जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्ही पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइट https://portal2.passportindia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. या वेबसाइटवर अर्ज करणे सोपे आहे. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देऊन थेट पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. (Top Stories)