एक डिस्फंक्शनल फॅमिली अस्थिर असते आणि बहुतांश वेळा यामध्ये वाद होत राहतात. सर्वसामान्यपणे अशा परिवारातील आई-वडिल आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करतात. त्यामुळे नातेवाईकांसोबत ही त्यांचे नातेसंबंध बिघडलेले असतात. सर्वसामान्यपणे परिवारातील एखादा सदस्य असा वागतो. यामागे काही कारणं असू शकतात. त्यामध्ये दारुचे सेवन, नशेची लत किंवा मानसिक आजार अशा काही गोष्टींचा समावेश असू शकतो. मात्र याचा परिणाम घरातील मुलांवर होतो.काही प्रकरणे मुलांमध्ये गुन्हेगारीची भावना निर्माण होते. अशातच डिस्फंक्शनल फॅमिली (Dysfunctional Family) म्हणजे नक्की काय याच बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
डिस्फंक्शनल फॅमिली म्हणजे जेथे आई-वडिल सातत्याने मुलांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्यासोबत व्यवस्थितीत वागत नाहीत. यामुळे परिवारातील अन्य सदस्य त्यांच्या या व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात. काही प्रकरणांत मुलांचा आत्मविश्वास फार कमी होतो. काही लोक या व्यवहाराला सामान्य मानतात.डिस्फंक्शनल फॅमिलीमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या सामान्य नसतात. पुढील काही लक्षणांवरुन तुम्ही डिस्फंक्शनल फॅमिलीची ओळख करु शकता.
कोणत्याही प्रकारे दुर्व्यवहार
दुर्व्यवहार हा डिस्फंक्शनल फॅमिलीचे सर्वाधिक मोठे लक्षणं आहे. दुर्व्यवहार शारिरीक, मानसिक आणि सेक्शुअली असा सुद्धा असू शकतो. दुर्व्यवहार कितीही हलका असो किंवा मोठा त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होते. मुलं सुद्धा मोठं होऊन त्यांचे पाहून तसेच आपल्या आयुष्यात वागतात.
नियंत्रण
एक किंवा दोघे असे आई-वडिल मुलांचे निर्णय सुद्धा कधीकधी स्वत:च घेतात. त्यांना मुलं बिघडली जातील अशी भीती असते. नियंत्रण करणाऱ्या पालकांची मुलं ही उदास, असहाय्य स्वत:ला मानतात. या व्यतिरिक्त मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता ही कमी होते.
हिंसा
जेव्हा आई-वडिल परिवारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शारिरीक शोषण किंवा हिंसेचा आधार घेतात तेव्हा त्यांच्यामध्ये डिस्फंक्शनल फॅमिलीची लक्षणं दिसतात. यामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. मुलं सुद्धा मोठी झाल्यानंतर हिंसात्मक होतात. ते आपल्या भावंडांसोबत सुद्धा तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. (Dysfunctional Family)
भावनात्मक सपोर्टची कमतरता
एक डिस्फंक्शन फॅमिली मध्ये आई-वडिल मुलांना पुरेसा भावनात्मक सपोर्ट करत नाही. ते आपल्या मध्येच व्यस्त असतात. आपल्या जबाबदाऱ्या काही वेळा दुर्लक्ष करतात. यामुळे मुलांमध्ये ऐकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते.
हेही वाचा- जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला सोशल मीडियात Block करतो, काय कराल?
अॅडिक्शन
जेव्हा घरातील दोघांपैकी एकजण दारु, ड्रग्जचे सेवन करतात तेव्हा ते आपल्या जबाबदाऱ्या विसरतात. यामुळे मुलांसोबतचे त्यांचे नाते बिघडले जाते. एकदा ही लत लागल्यानंतर नात्यात प्रेम, भावना या काहीच शिल्लक राहत नाही. अॅडिक्शनच्या आहारी आई-वडिलांसह मुलांसोबत ही तणावाची स्थिती निर्माण होते. जे डिस्फंक्शनल फॅमिलीचे मुख्य कारण असू शकते.