Home » पुणे ते कश्मीर पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या मानसी पवार यांचा वाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे ते कश्मीर पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या मानसी पवार यांचा वाचा प्रेरणादायी प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Dr Mansi Pawar
Share

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून काम करताना दिसून येतात. त्यापैकी काहीजण हे समजासाठी प्रेरणादायी स्थान ही होतात. याच पार्श्वभूमीवर पुणे येथील फिजियोथेरपीस्ट म्हणून असणाऱ्या मराठमोठ्या डॉक्टर मानसी पवार (Dr Manasi Pawar) यांनी आता थेट कश्मीर गाठलं आहे. तेथे त्या रुग्णांसाठी काम करतात. या ठिकाणी मानसी या प्रत्येक महिन्याला येतात आणि तेथील रुग्णांसाठी काम करतात. रुग्णांना मिळालेले समाधान यामध्येच त्या अत्यंत आनंदी असतात. फिजियोथेरपी करणे हे त्यांचे लक्ष्य असून दुसऱ्यांना मदत करण्यास त्यांना फार आवडते.

मानसी पवार यांच्या कामाची अशी झाली सुरुवात
मानसी पवार यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या या फिजियोथेरपीच्या कामात त्यांच्यासोबत घरातील मंडळींनी फार मोठे पाठबळ दिले. त्यांनी गरिबी सुद्धा पाहिली होती पण मटाच्या एका बातमीतून त्या एका एनजीओशी जोडल्या गेल्या. त्यांनी एका कुटुंबाची मदत केली आणि यामध्ये पुढे पुढे जात त्या आता थेट कश्मीरला जाऊन तेथील कुटुंबांची सेवा करतात.

Dr Mansi Pawar
Dr Mansi Pawar

घरातल्यांनी दिले मदतीचे धडे
डॉक्टर मानसी पवार यांना इतरांना मदत करण्याची शिकवण घरातून मिळाली. खासकरुन आई-वडिलांकडून. कुटुंबातील अशा वातावरणामुळे त्या महाराष्ट्रातील काही संस्थांशी जोडल्या गेल्या. जर एखाद्याला ब्लडची गरज असेल, निधीची गरज असेल, तर त्या त्या ठिकाणी स्वत:हून उपस्थितीत राहून त्यांची मदत करायच्या.

फिजिओथेरपिच्या माध्यमातून केली मदत
नेहमीच फिजिओथेरपिच्या माध्यमातून मानसी पवार यांनी इतरांची मदत केली. याच दरम्यान स्वयंसेवी संस्थेतर्फे कश्मीर मध्ये काम करणारा एक व्यक्ती पाठ दुखीच्या समस्येमुळे आला आणि त्याचा संपर्क मानसी यांच्याशी झाला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, कश्मीर येथे फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नाही. अशातच त्यांनी कश्मीर मधील लोकांच्या सेवेसाठी उभे राहण्याचा निर्धार केला. (Dr Manasi Pawar)

हे देखील वाचा- डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Awachat): एक साधा, सरळ, सोपा, माणूस

लॉकडाउनच्या काळात कश्मीरमध्ये दिला मदतीचा हात
मानसी यांनी २०१३ मध्ये गडचिरोलीत काम केलेच. पण २०१६ मध्ये त्यांनी कश्मीर मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून एक महिना काम केले. त्यानंतर २०१८ मध्ये पुण्यातच कामाला सुरुवात केली. मात्र संपूर्ण लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सेवा ही कश्मीरमध्ये पुरवली होती. तेथे त्यांनी मोफत कँम्प ही घेतले. सध्या त्या मेडिकल क्षेत्रात काम करतात. काउंसिलिंग ही करतात.

त्यांना आता पुढे कश्मीरमध्ये जाऊन लोकांना मदत करायची आहे. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचसोबत त्या काम करतात म्हणून आक्षेप ही घेतला गेला. परंतु मानसी यांनी या सर्वावर मात करत आपले काम सुरुच ठेवले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.