काही वर्षांपूर्वी एड्स, टीबी, कॅन्सर या आजारांचा समावेश गंभीर आजारांमध्ये केले जायचे मात्र आता केवळ हेच गंभीर आजार राहिलेले नाही. यात आणखीन ही काही आजारांची वाढ झालेली आहे. आणि त्यातलाच एक आहे ‘डिप्थीरिया‘.हा एक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे जो प्रामुख्याने कोरिन बॅक्टेरिया डिप्थीरिया या जिवाणूंमुळे होतो. या आजाराबद्दल आजही अनेकांना पूर्ण माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आजार शेवटच्या टप्प्यावर पोहचल्यानंतर त्यावर उपचार सुरु केले जातात. पण हे अतिशय घातक आहे कारण डिप्थीरिया हा गंभीर आजार असून त्यामुळे व्यक्तीचा जीव ही जाऊ शकतो. (Diphtheria Diseases).
सामान्यतः हा आजार २ वर्षांपासून १० वर्षांच्या मुलांमध्ये जास्त दिसून येतो. मात्र वयस्क आणि वृद्ध व्यक्तींमध्येही हा आजार पाहण्यात आलेला आहे. तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने त्या व्यक्तीने काळजी घेण्याची खुप गरज असते. केवळ लस घेतल्याने डिप्थीरिया टाळता येऊ शकतो. मात्र जस आम्ही आधी म्हणलो याबद्दल अधिक जागरूकता नसल्याने याचे गंभीर आजारात रूपांतर होते.आणि डिप्थीरियामुळे अर्धांगवायूचा झटका ही येण्याची शक्यता असते. आज च्या लेखात आपण याच गंभीर आजराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
डिप्थीरिया म्हणजे काय?
डिप्थीरिया हा एक गंभीर बॅक्टेरियाचा संसर्ग आहे, जो घसा आणि नाकाच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम करतो. तसेच आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो,केवळ लसींच्या वापराने डिप्थीरिया पासून बचाव केला जाऊ शकतो. या आजरावर लवकर उपचार न केल्यास यामुळे आपल्या मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि हृदयाचे गंभीर नुकसान होऊ शकते. फुफ्फुसांच्या संसर्गाससुद्धा हा विषाणू कारणीभूत ठरू शकते. हे घसा आणि नाकात जाड तपकिरी आवरण तयार झाल्यामुळे होते.
डिप्थीरियाची लक्षणे कोणती आहेत?
डिप्थीरिया हा श्वसनाशी निगडित असा आजार आहे. सामान्यतः या आजारशी संक्रमण झाल्यानंतर २-४ दिवसात त्याची लक्षणे व्यक्तित दिसून येतात मात्र काही वेळा ही लक्षणे विकसित होण्यासाठी ९-१० दिवसांचा कालावधी लागू शकतो. या आजाराची लक्षणे पाहूयात.(Diphtheria Diseases)
– घसा खवखवणे
– सतत जोरजोरत खोकला येणे
– गळ्याला सूज येणे
– हल्का ताप
– कमजोरी येणे
– तोंडात अल्सर किंवा जखम झाल्यासारखे दिसणे
– भूक कमी होणे – लाळ गळने – श्वास घेण्यास त्रास होणे – बोलताना त्रास जाणवणे.
डिप्थीरियाची होण्याची करणे कोणती?
कोरिनबॅक्टेरियम डिप्थीरिया नावाच्या एक प्रकारच्या बॅक्टेरियामुळे डिप्थीरिया होतो.शिंकताना, खोकताना किंवा नाक चोळताना आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या आसपास असल्यास आपल्याला डिप्थीरिया देखील असू शकतो.तसेच लहान मुलांमध्ये हा आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. कारण लहान मुले बऱ्याचदा हातात असणाऱ्या गोष्टी तोंडात घालतात जसे एखाद खेळण किंवा पेन्सिल वस्तु ते शेअर ही करतात. अशा एकमेकांच्या गोष्टी तोंडात ठेवल्याने घशाच्या श्लेष्मल पडद्यामध्ये डिप्थीरिया रोग होऊ शकतो.
==================
==================
डिप्थीरिया कसा रोखला जाऊ शकतो आणि त्यावरील उपचार
डिप्थीरिया रोखण्यासाठी अँटीबायोटिक्स आणि लसीचे डोस दिले जाऊ शकतात, जे सहसा बालपणात दिले जाऊ शकतात. डिप्थीरिया लसीला डीटीएपी म्हणतात आणि सामान्यत: डांग्या खोकला आणि टिटॅनस लसीसह दिली जाते, जी वयानुसार पाच डोसमध्ये दिली जाते. आणि या लसीचा प्रभाव पुढील 10 वर्षे टिकू शकतो. मूल 12 वर्षांचे असतानाही आपल्याला ही लस घेण्याची आवश्यकता असू शकते, ज्याला बूस्टर शॉट म्हटले जाते.त्याचप्रमाणे लहान मुलांनाही डीटी लस घ्यावी, जी डिप्थीरिया आणि टिटॅनसपासून संरक्षण करते. त्याचप्रमाणे, प्रौढांना यापासून वाचण्यासाठी टीडीएपीविरूद्ध लस दिली पाहिजे. हे टिटॅनस, डिप्थीरिया आणि पर्ट्यूसिस (डांग्या खोकला) पासून संरक्षण करते. प्रौढांमधील टीईटी लस टिटॅनसआणि डिप्थीरियापासून संरक्षण करते.
(Disclaimer: वरील लेखातील माहिती खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. केवळ माहितीच्या आधारावर हा लेख लिहिण्यात आलेला आहे.)