Home » चीनच्या हि-यांनी सुरतचा हिराबाजार

चीनच्या हि-यांनी सुरतचा हिराबाजार

by Team Gajawaja
0 comment
Diamond Market Of Surat
Share

गुजरातमधील सूरत शहराची ओळख तेथील हिरेबाजारामुळे आहे. सूरतच्या याच हिरे बाजारातून रोज करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या हिरे बाजाराला चीनी हि-यांची नजर लागली आहे. कारण जगभरात होणारी सूरतच्या हि-यांची निर्यात आता मंदावली आहे. या हि-यांची चमक हरवल्याचे चित्र येथील बाजारपेठेत आहे. परिणामी येथून मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांना सुट्टी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचीच एक झलक म्हणजे सूरतच्या सर्वात मोठ्या हिरे कंपनीनं आपल्या ५० हजार कर्मचा-यांना १० दिवसांच्या सुट्टीवर पाठवले आहे. चीनी सिंथेटिक हि-यांमुळे ही वेळ आली असल्याची माहिती पुढे येत आहे. चीनी सिंथेटिक हिरे हे हुबेहुब ख-या हि-यांसारखे असतात. मात्र त्यांची किंमत कमालीची कमी असते. परिणामी त्यांची मागणी वाढली आहे आणि सूरतच्या हि-यांची मागणी घटली आहे. यामुळे सूरतमधील हिरे उद्योगावर लवकरच मंदिची छाया येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. (Diamond Market Of Surat)

गुजरातमधील एका मोठ्या हिरे कंपनीनं ५० हजार कर्मचा-यांना एकाच दिवशी १० दिवसांच्या सुट्टीवर पाठवून दिले. या बातमीमुळे उद्योगजगतात खळबळ उडाली. राज्यसभेतही हा मुद्दा विचारला गेला. चीनी सिंथेटिक हि-यांमुळे गेल्या काही वर्षात हिरे व्यापारावर मंदी येणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्याची ही सुरुवात असल्याची माहिती आहे. चीनमधून जगभरात या सिंथेटिक हिऱ्यांचा व्यापार वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सूरतमधून होणा-या हि-यांच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. चीनमधून येणाऱ्या सिंथेटिक हिऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता करण्यात येत आहे. (Diamond Market Of Surat)

या चीनी सिंथेटिक हि-यांचा परिणाम फक्त अर्थकरणावर नाही तर त्यामुळे सामाजिक परिस्थितीही गंभीर होण्याचा धोका आहे. गुजरातमधील अनेक तरुण सुरतमध्ये डायमंड पॉलिशिंगच्या व्यवसायात आहेत. या तरुणांनी आर्थिक गुंतवणूक करुन आपला उद्योग उभारला आहे. मात्र सिंथेटिक हिऱ्यांच्या आगमनामुळे डायमंड पॉलिशिंग हा भागच संपुष्ठात आला आहे. परिणामी सुरतमधील डायमंड पॉलिश करणाऱ्यांना काही तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबियही रस्त्यावर आले आहेत. या सिंथेटिक हि-यांमुळे सूरतचे लहान हिऱ्यांचे कारखाने बंद झाले आहेत. त्यातच सूरतच्या सर्वात मोठ्या डायमंड फर्मने, म्हणजे किरण जेम्सने कर्मचा-यांना १० दिवसांची सुट्टी दिल्यानं खळबळ उडाली आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्या अन्य व्यावसायिकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

हिरे उद्योगामुळे या परिसरात अनेक पुरक व्यवसायही उभे राहिले आहेत. हे सर्व पुरक व्यवसायही या मंदिमुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. परिणामी लाखोंनी बेरोजगार वाढण्याची शक्यता आहे. याची धास्ती लागून काही तरुणांनी आत्महत्या केली आहे. यामुळे या सर्वात केंद्र सरकारनं वेळीच हस्तक्षेप करत चिनी सिंथेटिक हि-यांच्या व्यापारावर वेळीच बंदी आणावी अशी मागणी होत आहे. सूरतमध्ये हि-यांची पॉलिश आणि कटींग करणा-यांची संख्या लाखाच्या आसपास आहे. यातील बहुतांश कर्मचारी हे काम पिढ्यानंपिढ्या करतात. त्यामुळे अन्य व्यवसायापासून ते दूर आहेत. सद्यपरिस्थितीत यापैकी किमान २० हजार लोकांनी आपले काम कायमस्वरुपी गमावले आहे. (Diamond Market Of Surat)

==================

हे देखील वाचा : या धरणाचे पृथ्वीलाही ओझे !

================

यातील काहींनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही संख्या वाढत असल्यामुळे या कर्मचा-यांना अन्य व्यवसायात सामावून घ्यावे किंवा अन्य उद्योगाची माहिती करुन द्यावी अशी मागणीही होत आहे. कोविड-१९ महामारी पासून सूरतच्या हिरे उद्योगाला उतरती झळा लागली. त्यात रशिया युक्रेन युद्धाची भर पडली आहे. या सर्वात चीनच्या सिंथेटिक हि-यांनी हा बाजार पार झोकाळून गेला आहे. प्रयोगशाळेत तयार झालेले हे हिरे अत्यंत स्वस्त असतात. त्यामुळे त्यांच्या व्यापारात वाढ झाली आहे. आत्ताशा या सर्वांची झळ सूरतमधील छोट्या हिरे व्यापा-यांना बसू लागली आहे. मात्र या सर्वांचा परिणाम मोठ्या कंपन्यावर होऊ लागला तर येथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होईल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या सर्वांतून वाचायचे असेल तर चीनी सिंथेटिक हि-यांचे दुष्परिणाण समोर आणले पाहिजेत असे आवाहनही कऱण्यात आले आहे. (Diamond Market Of Surat)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.