Home » Dhurandhar : धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धुरळा !

Dhurandhar : धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धुरळा !

by Team Gajawaja
0 comment
Bollywood Movie Box Office Collections 2025
Share

२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने अभिनेता अक्षय खन्ना याचं ठरलंय असं म्हणायला हरकत नाही. फेब्रुवारीमध्ये छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवत या वर्षाची जोरदार सुरुवात केली होती आणि आता अक्षय खन्नाच्याच धुरंधर चित्रपटाने छावासह दंगल, बाहुबली २ चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. २०२५ मध्ये बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाले. या वर्षाची सुरुवात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ने केली होती. बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत ५०० कोटींचा या वर्षाचा पहिला टप्पा पार करणारा ‘छावा’ ठरला होता.  विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्नाचा आणखी एक चित्रपट आता स्वत:च्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढणार आहे… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने लोकांना वेड लावलं आहे… जाणून घेऊयात रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि या चित्रपटाने कोणकोणते रेकॉर्ड मोडले आहेत… (Bollywood Movie 2025)

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी २८ कोटी, दुसऱ्या दिवशी ३२ कोटी, तिसऱ्या दिवशी ४३ कोटी, चौथ्या दिवशी २३.३५ कोटी, पाचव्या दिवशी २७ कोटी, सहाव्या दिवशी २७ कोटी, सातव्या दिवशी २७ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी २०७.२५ कोटींची कमाई केली होती. पुढे दुसऱ्या शुक्रवारी (आठव्या दिवशी) ३२.५ कोटी, दुसऱ्या शनिवारी (नवव्या दिवशी) ५३ कोटी, दुसऱ्या रविवारी (दहाव्या दिवशी) ५८ कोटी, दुसऱ्या सोमवारी (अकराव्या दिवशी) ३०.५ कोटी कमवत ११ दिवसांत ३८१.२५ कोटी कमावले आहेत… महत्वाचं म्हणजे धुरंधर चित्रपटाने रणवीर सिंगच्या स्वत:च्याच पद्मावत चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या पद्मावतने ३०२.१५ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे.

‘धुरंधर’ चे रेकॉर्ड इथवरच थांबत नाहीत… दुसऱ्या वीकेंडमध्ये तगडी कमाई करणाऱ्या बॉलिवूडच्या टॉप १० चित्रपटांमध्ये ‘धुरंधर’ पहिल्या क्रमांकावर आहे. ‘अॅनिमल’, ‘बाहुबली २’, ‘पुष्पा २’ (Pushpa 2) चित्रपटांचेही धुरंधरने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले आहेत.  तर आदर्श यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार सेकंड वीकेंडला कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पुढीलप्रमाणे – ‘धुरंधर’ १४६.६० कोटी,पुष्पा २’ (हिंदी) १२८ कोटी,छावा’ १०९.२३ कोटी, ‘स्त्री’ ९३.८५ कोटी, ‘गदर २’ ९०.९७ कोटी, ‘अॅनिमल’ ८७.५६ कोटी, ‘जवान’ ८२.४६ कोटी, ‘बाहुबली २’ (हिंदी) ८०.७५ कोटी, ‘सैय्यारा’ ७५.५० कोटी आणि ‘दंगल’ ७३.७० कोटी(Entertainment News)

ओपनिंग वीकेंडला १०३ कोटी कमवत रणवीर सिंगच्या या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे.  या व्यतिरिक्त सातव्या दिवशी २७ कोटी कमावणारा हा पहिला A रेटेड चित्रपट ठरला आहे.  रिलीजच्या आठव्या दिवशी ३२.५० कोटी कमावणारा हा बिगेट हिंदी चित्रपट ठरला आहे… शिवाय, नवव्या आणि दहाव्या दिवशी ५३ आणि ५८ कोटी कमावणारा हा बिगेस्ट बॉलिवूड चित्रपटही बनला आहे… इतकंच नाही तर दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत सलग शुक्रवार, शनिवार आणि रविवार ११० कोटी पार करणारा हा सर्वात मोठा चित्रपट आहे, जगभरात आत्तापर्यंत ५८८ कोटी ११ दिवसांमध्ये कमवत रणवीर सिंगचा हा Highest Grossing चित्रपट असून सरतेशेवटी २०२५ मधला सर्वाधिक कमाई करणारा A Rated चित्रपट म्हणून धुरंधर बॉक्स ऑफिसवर अग्रसेर ठरला आहे… (Bollywood Movie Box Office Collections 2025)

तर, दुसरीकडे अक्षय खन्ना याचा २०२५ मधील ‘छावा’ नंतर हा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ चित्रपटापूर्वी २०२२ मध्ये रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘दृश्यम २’ (Drishyam 2) चित्रपटाने २४०.५४ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे. त्यामुळे आता अक्षयचा ‘छावा’ नंतर ‘धुरंधर’ हा दुसरा चित्रपट ठरेल जो ५०० कोटी पार करणार आहे.  तसेच, रणवीर सिंगच्या फिल्मी करिअरमधला हा पहिला चित्रपट असेल जो ४०० कोटींचा टप्पा लवकरच पार करत ५०० कोटींकडे आपली वाटचाल करणार आहे… इतकंच नाही तर ‘धुरंधर’चं लाईफटाईम कलेक्शन ७०० कोटींपर्यंत जाऊ शकतं असा अंदाजही बांधला जात आहे. त्यामुळे येत्या काळात ‘धुरंधर’ आणखी कोणते रेकॉर्ड मोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Dhurandhar movie box office records)

========

हे देखील वाचा :  New Year : २०२६ चे स्वागत करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं देखील आहेत उत्तम पर्याय

========

१९ डिसेंबर २०२५ रोजी ‘अवतार ३’ (Avatar 3) रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या तरी सध्या ‘धुरंधर’ चित्रपटाकडे ५०० कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी ३ दिवस हातात आहेत. आता रणवीर सिंगचा चित्रपट ‘अवतार ३’ ला टफ टक्कर देणार का? अवतार ३ थिएटर्समध्ये असूनही शो हाऊसफुल्ल करण्याची ताकद ‘धुरंधर’मध्ये असणार का हे पाहणं येत्या काळात फार महत्वाचं असणार आहे.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.