रामायण ग्रंथ हा भारतातील प्राचीन ग्रंथांपैकी एक आहे. रामायणाच्या काळातील काही कथा अत्यंत खास आहेत. तर रामायणासंबंधित या कथांमध्ये केवळ भारतच नव्हे तर अन्य देशांबद्दल ही लिहिले गेले आहे. वाल्मिकी रामायण किंवा तुलसीदास जी यांचे रामचरित मानस व्यतिरिक्त अन्य देशांमध्ये विविध भाषांमध्ये रामायण आपल्या-आपल्या पद्धतीने लिहिले गेले आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की भारताव्यतिरिक्त अन्य देशांमध्ये लिहिल्या गेलेल्या रामायणात रावणाच्या मुलीचा उल्लेख मिळतो. अशातच कोणत्या देशात आणि कोणत्या रामायणांच्या कथेत रावणाच्या मुलीचे वर्ण केले आहे त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Daughter of Ravana)
तर श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, माली, थायलंड आणि कंबोडियात लिहिल्या गेलेल्या रामायणाच्या कथेत श्री राम यांच्यासह रावणाला सुद्धा फार महत्व दिले गेले आहे. थायलंड मधील रामकियने रामायण आणि कंबोडियाच्या रामकेयर रामायणात रावणाच्या मुली बद्दल काही खास आणि रहस्यात्मक गोष्टी लिहिल्या आहेत.
थायलंड आणि कंबोडियातील रामायणात रावणाच्या ७ मुलींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या रावणाच्या तीन पत्नी मंदोदरी, धन्यमालिनी आणि तिसरी पत्नीपासून झाल्या होत्या. तसेच रावणाने आपल्या मुलीबद्दल असे सांगितले आहे की, जिचे नाव सुवर्णमछा किंवा सुवर्णमत्स्य होते. ती मनुष्य आणि माशाचे रुप होते आणि ती दिसायला ही अत्यंत सुंदर होती.अर्ध शरिर मासा आणि व्यक्तीचे असल्याने सुवर्णमत्स्यला जलपरी सुद्धा म्हटले जायचे. त्याचसोबत सोन्याचे शरिर असल्याने तिचे नाव सुवर्णमछ असे पडले होते.
थायलंड आणि कंबोडियातील रामायणात रावणाच्या मुलीला अत्यंत पुजनीय मानले गेले आहे. याच कारणास्तव सोन्याच्या माश्याला अत्यंत शुभ मानले जाते. त्याचसोबत तेथे असा मासा ठेवल्याने वास्तु दोष आणि घरातील समस्या ही दूर होतात असे मानतात. कंबोडिया आणि थायलंड मधील रामायणात असा ही एक उल्लेख करण्यात आला आहे की, रावणाच्या मुलीला हनुमानावर प्रेम जडले होते. तिला हनुमानाशी लग्न करायचे होते. (Daughter of Ravana)
हे देखील वाचा- हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर का लावले जाते?
परंतु जेव्हा हनुमान लंका दहन करत होते तेव्हा रावणाच्या मुलीची नजर हनुमानावर गेली. तेव्हाच तिने हनुमानाला आपल्या पतिच्या रुपात स्विकार केले होते. दरम्यान, जगभरात लिहिल्या गेलेले सर्व रामायण वाल्मिकी रामायणापासून प्रेरित आहे आणि त्याच आधारावर अन्य रामायणे लिहिलि गेली आहेत.