Home » अशा पद्धतीने सुधारा तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर

अशा पद्धतीने सुधारा तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर

सध्या कर्जाची सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने आपण आपल्या काही गरजा याच्या माध्यमातून पूर्ण करतो. कर्ज घेताना सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासून पाहिला जातो.

by Team Gajawaja
0 comment
Credit Card Hidden Charges
Share

Credit Score : सध्या कर्जाची सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने आपण आपल्या काही गरजा याच्या माध्यमातून पूर्ण करतो. कर्ज घेताना सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासून पाहिला जातो. त्यानंतरच तुम्हाला कर्ज द्यावे की नाही हे एखादी बँक किंवा आर्थिक संस्था ठरवते. यामुळे नेहमीच तुमचा सिबिल स्कोर उत्तम ठेवावा असे सांगितले जाते. एक्सपर्ट्सनुसार, सिबिल स्कोर 750 च्या वर असणे उत्तम मानले जाते. कारण तुमचा सिबिल स्कोर कमी असल्यास तुम्हाला कर्ज मान्य केले जात नाही. यामुळे उत्तम सिबिल स्कोर ठेवावा. जाणून घेऊयात तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर कसा सुधारु शकता याबद्दल अधिक….

क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट वेळच्या वेळी करा
तुम्ही क्रेडिट कार्ड वापर असाल तर त्याच्या बिलिंग सायकलकडे जरुर लक्ष द्या. प्रत्येक महिन्याच्या क्रेडिट कार्डच्या बिलिंग तारखेला त्याचे पेमेंट करत राहा. असे करण्यासाठी तुम्ही फोनमध्ये रिमाइंडर सेट करून ठेवा.

कमीत कमी उधारी घ्या
प्रयत्न करा की, तुम्हाला उधारी घ्यावी लागणार नाही. याशिवाय जेवढे पैसे उधारीवर घेतले आहेत ते वेळच्या वेळीही परत करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेवढ्याच पैशांचे कर्ज घ्या ज्याची तुम्हाला परतफेड एका महिन्याभरात करता येईल. 30 टक्क्यांपेक्षा कमी क्रेडिट कार्डाचा वापर करण्याचे उद्देश लक्षात ठेवा.

एकापेक्षा अधिक कर्ज एकाचवेळी घेऊ नका
एकापेक्षा अधिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापासून दूर राहा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर बिघडला जातो. असे मानले जाते की, एखादा व्यक्ती सातत्याने कर्जासाठी अर्ज करत असेल तर त्याची आर्थिक स्थिती बिघडल्याचे मानले जाते. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा बँक क्रेडिट ब्युरोकडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मागवून घेते. (Credit Score)

क्रेडिट रिपोर्ट पाहात राहा
क्रेडिट रिपोर्ट तुमच्या क्रेडिट स्कोरला प्रभावित करू शकतो. काहीवेळेस क्रेडिट रिपोर्टमध्ये दिलेली चुकीची माहिती देखील तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम करू शकते. यामुळे नियमित रुपात तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहात राहा. जर तुम्हाला यामध्ये काही चुकीचे वाटत असल्यास तर संबंधित क्रेडिट ब्युरोला याची सुचना द्या.

किती असाला पाहिजे सिबिल स्कोर
सिबिल स्कोर 300-900 च्या दरम्यान असतो. 300-549 मधील क्रेडिट स्कोर खराब मानला जातो. तर 550-750 मधील स्कोर उत्तम मानला जातो. जर तो 750-900 दरम्यान असेल तर तो अतिशय उत्तम मानला जातो.


आणखी वाचा :
WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी नवे फीचर लाँच, जाणून घ्या अधिक
कंम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी या टिप्स येतील कामी
Slow Parenting म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.