पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच पावसाची मजा लुटली जातेयं खरं. मात्र वातावरण दमटपणा निर्माण झाल्याने आपल्याला गरम सुद्धा होते. अशातच घरातील कपडे सुद्धा सुकत नाहीत. यामुळे ओलसर राहिलेल्या कपड्यांमधून दुर्गंध येऊ लागतो. अशा स्थितीत नक्की काय करावे कळत नाही. त्यामुळे पावसात कपडे लवकर सुकावे म्हणून नक्की काय करावे याच संदर्भातील खास टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Clothes drying in monsoon)
-वॉशिंग मशीनचा वापर
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर ते ड्रायर मोडवर ठेवून तुम्ही सुकवू शकता. यामुळे कपड्यांमधील अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि ते सुकतील. त्यानंतर तुम्ही कपडे हे वाळत घालू शकता. असे कपडे लवकर सुकतात. आजकाल मार्केटमध्ये ऑटोमॅटिक ड्रायर वॉशिंग मशीन येतात. याच्या माध्यमातून कपडे लवकर सुकण्यास मदत होते.
-कपडे इस्री करा
कपडे इस्री करून तुम्ही तुमचे कपडे सुकवू शकता. इस्री केल्याने कपड्यातील ओलसरपणा दूर होतो. अशातच तुमच्या कपड्यांची लाइनिंग ही उत्तम राहते. यामुळे कपड्यांना ओलसरपणामुळे येणारा वास ही दुर होतो. इस्री केलेले कपडे लवकर सुकतात. मात्र इस्री करताना त्याचे तापमान तपासून पहा. अन्यथा ते जळू शकतात.
-हेअर ड्रायरचा वापर करा
जर तुमचे कपडे हलके ओलसर असतील तर ते लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू शकता. हेअर ड्रायरच्या माध्यमातून निघणारी हवा तुमच्या कपड्यांना सुकवण्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुम्हाला बाहेर जायचे असेल आणि कपडे थोडेसे ओलसर असतील तेव्हा हेअर ड्रायरचा वापर करा. यामुळे कपड्यांना येणारा वास ही दूर होईल.
-फ्रिजमध्ये ठेवा
तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, थोडेसे ओलसर असलेले कपडे जर तुम्ही एका प्लास्टिक बॅगमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते सुकतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यामधील ओलावा निघून जातो. तसेच वास ही दूर होतो.(Clothes drying in monsoon)
-स्टँन्डचा वापर
पावसाळ्यात कपडे आपण बाल्कनीत वाळत घालू शकत नाहीत. अशातच तुम्ही कपडे सुकवण्यसाठी येणाऱ्या स्टँन्डचा वापर करू शकता. हा स्टँन्ड तुम्ही पंख्याखाली ठेवल्यानंतर ते कपडे सुकू शकतात.
हेही वाचा- पावसाळ्यात आरोग्यदायी पारिजातकाच्या पानांचा रस
-हिटरचा वापर
खरंतर हिटरचा वापर हा हिवाळ्यात केला जातो. पावसाळ्यात तुम्ही कपडे सुकवण्यासाठी हिटरचा वापर करू शकता. ओल्या कपड्यांमधून जेव्हा पाणी व्यवस्थितीत निघून जाईल तेव्हा हिटर किंवा ब्लोअर जवळ ठेवा.यामुळे कपडे लवकर सुकले जातील.