एखाद्या शहराचे कामकाज मुंग्यांच्या वाढत्या संख्येमुळे बंद झाल्याचे ऐकले आहे का. अर्थातच ही अशक्यप्राय घटना आहे, पण ती सत्यात उतरली आहे. जर्मनीमधील एका शहरात चक्क मुंग्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, की तेथील मनुष्यांचे जीवन संकटात सापडले आहे. जर्मनीमधील कील या शहरात विशिष्ट प्रकारच्या मुंग्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ही संख्या आता एवढी झाली आहे की, या शहरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. (Germany)
या मुंग्यांच्या मोठ्या वसाहतीच या शहरात निर्माण झाल्या आहेत. या मोठ्या संख्येत वाढलेल्या मुंग्या वीज आणि इंटरनेट सुविधा पुरवणा-या वायरींना खराब करत आहेत. त्यामुळे कील शहरामध्ये वीज आणि इंटरनेटसारख्या अत्यावश्यक सेवा भविष्यात खंडित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या वाढलेल्या मुंग्यांना रोखायचे कसे, हा प्रश्न येथील प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या मुंग्यामुळे अत्यावश्यक सुविधांवर जसा परिणाम होण्याची शक्यता आहे, तसाच परिणाम येथील जनजीवनावर होण्याची भीती आहे. विशेषतः शेती साठी या मुंग्या घातक ठरत आहेत. मुंग्यां त्यांच्या कक्षेत येणा-या प्रत्येक वस्तूंवर आपला ताबा मिळवत आहेत, त्यामुळे या भागातील वनसंपदाही धोक्यात आली आहे. जर्मनीसारख्या प्रगत देशातील कील शहर सध्या मुंग्यांच्या आक्रमणापुढे हतबल झाले आहे. कील शहरात या वाढलेल्या मुंग्यांनी वीज आणि इंटरनेटचा पुरवठा करणा-या साधनसामुग्रीचा ताबा घेतला आहे. (International News)
त्यामुळे या भागात आता वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून इंटरनेट सुविधाही खंडित होत आहे. या मुंग्या ‘टॅपिनोमा मॅग्नम’ प्रजातीच्या आहेत. भूमध्यसागरीय प्रदेशातून आलेल्या या मुंग्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मुंग्यांचे हे मोठे पथक आता उत्तर जर्मनीकडे वेगाने पसरत आहे. त्यांच्या या प्रवाहामुळे वीज आणि इंटरनेट सेवाही विस्कळीत होत आहेतच शिवाय मुंग्याच्या वाटेत येणारी अन्य साधनेही खराब होत आहेत. या भागात रहाणा-या नागरिकांनाही मुंग्यांमुळे त्रास होत आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या या मुंग्यांना रोखायचे कसे हा प्रश्न येथील नागरिकांसमोर उभा राहिला आहे. या मुंग्यांची समस्या कील शहरात एवढी वाढली आहे की, जर्मनीच्या कार्लस्रुहे येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील कीटकशास्त्रज्ञ मॅनफ्रेड व्हेर्हाग आणि त्यांची टिम मुंग्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासंदर्भात अभ्यास करु लागले आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार टॅपिनोमा मॅग्नम या मुंग्याच्या एका वसाहतीमध्ये लाखो मुंग्या असतात.(Germany)
‘टॅपिनोमा मॅग्नम’ या आक्रमक प्रजातीच्या मुंग्या असून ही प्रजाती मूळची भूमध्यसागरीय प्रदेशातील आहे. मात्र आता ही प्रजाती उत्तर जर्मनीमध्येही मोठ्या प्रमाणात आढळू लागली आहे. बदलत्या हवामानामुळे या मुंग्यांनी उत्तर जर्मनीमध्ये आपले बस्तान केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कील शहरात या मुंग्यांनी जवळपास सर्वच जमिनीचा ताबा घेतला आहे. जर्मनीमध्ये जशा या मुंग्या वाढल्या आहेत, तशाच त्या फ्रान्स आणि स्वित्झर्लंडसारख्या इतर युरोपीय देशांमध्येही वाढत आहेत. त्यामुळे या मुंग्यांचे संकट हे दिसते तितके लहान नसल्याचे मत नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते भविष्यात अवघ्या युरोपभर या ‘टॅपिनोमा मॅग्नम’ मुंग्यांची दहशत पसरणार आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत सर्वांनीच एक येऊन अभ्यास करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.(International News)
=========
हे देखील वाचा : Donald Trump : अमेरिकेतील स्टोर्समध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी !
Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !
==========
बाडेन-वुर्टेमबर्गचे पर्यावरण सचिव आंद्रे बाउमन यांनी ‘टॅपिनोमा मॅग्नम’ या मुंग्यांची कीटकाच्या प्रजातींमध्ये गणना करण्याची सूचना केली आहे. तसेच त्यांचे वेळीच नियंत्रण केले नाही तर मनुष्याला मोठे नुकसान होऊ शकते, असा इशाराही दिला आहे. या ‘टॅपिनोमा मॅग्नम’ मुंग्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या जर्मन शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय संस्था संयुक्त प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते लवकरच या ‘टॅपिनोमा मॅग्नम’ मुंग्या या जर्मन देशासाठी एक देशव्यापी आव्हान होणार आहेत. मुंग्यांमुळे एखाद्या शहराचे कामकाज बंद होत असल्याची बातमी आश्चर्यचकीत करणारी आहे. या मुंग्या फक्त जर्मनासीठीच नाही तर भविष्यात फ्रान्स आणि अवघ्या युरोपसाठीही त्रासदायक ठऱणार असल्याचे उघड झाल्यावर अनेक शास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करु लागले आहेत. (Germany)
सई बने