चीन (china) हा देश सध्य़ा मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. चीनची अर्थव्यवस्था कधीही कोलमडून निघेल अशा स्थितीत आहे. अर्थात यासंदर्भातील अतिशय मोजक्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत. मात्र चीनमधील सरकार एवढी गंभीर अर्थव्यवस्था असतांनाही आपल्या नागरिकांना सुखसोयी देण्यासाठी पैसे खर्च करत नाही, तर चीन आपल्याच नागरिकांची हेरगिरी करण्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे. चीनचे सरकार आपल्याच देशातील नागरिकांची हेरगिरी करत आहे. त्यासाठी तब्बल 60 कोटी कॅमेरे बसवण्याची योजना आहे. मात्र येथेच मोठी खेळी आहे, हे कॅमेरे दुसरे तिसरे कुठेही नाही, तर थेट चंद्रावर स्थापित करण्यात येणार आहेत. चीन गेल्या काही वर्षात चंद्रावर अनेक मोहीमा करत आहे. त्यामागे चीनचा उद्देश काय आहे, याची विचारणा केली जात होती. आता त्याचे उत्तर समोर आले आहे, आणि त्यामुळे अनेकांना धक्का लागला आहे. चीन (china) आपल्याच देशातील नागरिकांची हेरगिरी थेट चंद्रावर लावण्यात आलेल्या कॅमे-यामधून करणार आहे.
चीन (china) सरकार आपल्या देशातील नागरिकांवर अनेक नियम लावत असते. आता त्यात भर पडली आहे, ती हेरगिरीची. आपल्याच देशातील नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी चीननं सार्वजनिक ठिकाणी 20 कोटींहून अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. आता या कॅमे-यांची व्याप्ती वाढवण्यात येत आहे, त्यानुसार मोठ्या प्रमाणात कॅमेरे थेट चंद्रावर लावण्यात येणार आहेत. यातून चीन आपल्या देशातील नागरिकांची हेरगिरी करणार आहेच, शिवाय परदेशातील नागरिकांचीही हेरगिरी करणार आहे. चीनच्या या हेरगिरी कार्यक्रमाचे नाव स्कायनेट आहे. चीनच्या या स्कायनेट कार्यक्रमासंदर्भात ब्रिटीनच्या द सन या वृत्तपत्रानं बातमी दिली आहे.
यासाठी चीननं गेल्या काही वर्षापासून तयारी केल्याची माहिती आता पुढे आली आहे. सुमारे 2007 पासून ही मोहीम सुरु झाली आहे. चीनची (china) चंद्र मोहीम चांग-ई 2007 पासून सुरू आहे. त्यातूनच चीननं ही हेरगिरीची योजना आखली आहे. चीनच्या स्कायनेट प्रोजेक्ट अंतर्गत देशभरात लावलेले 20 कोटींहून अधिकचे कॅमेरे 24 तास लाइव्ह मॉनिटरिंग आणि रेकॉर्डिंग करतात. सध्या जगभरातील ही सर्वाधिक मोठी हेरगिरी यंत्रणा असल्याची माहिती आहे. आता हेच सर्वाधिक मोठे जाळे आता अधिक मोठे होणार आहे. या कॅमे-यांच्या माध्यमातून चीन सरकार आपल्या देशातील गुन्हेगारांवर नजर ठेवते, तसेच चीन सरकारच्या विरोधी काम करणा-यांवरही यातून पाळत ठेवली जाते. आता थेट चंद्रावर कॅमेरे लावल्यास चीनही ही मोहीम अधिक व्यापक होणार आहे.
चीनच्या (china) स्कायनेट मोहीमेमध्ये 60 कोटींहून अधिक कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. यातून चीनमधील प्रत्येक नागरिकावर नजर ठेवण्यासाठी किमान दोन कॅमेरे असतील आणि या कॅमे-यांच्या कक्षेत देशातील कोपरान कोपरा असेल. या प्रत्येक कॅमे-याचे वजन फक्त 100 ग्रॅम आहे. हे कॅमेरे AI-चालित चिप्सने सुसज्ज असतील. यासंदर्भात चीनमधील नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संशोधक अधिक अभ्यास करीत आहेत.
या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा हा चंद्रावर आवश्यक साधन सामग्री पोहचवण्यावर आहे. चीनच्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचाही यामध्ये सहभाग आहे. चीनचा चंद्र तळ डिस्नेलँडपेक्षा मोठा आहे. 3.7 मैल पसरलेल्या या तळावर कमांड सेंटर, पॉवर स्टेशन, कम्युनिकेशन सेंटर, वैज्ञानिक सुविधा आणि रोबोट्सचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. यातूनच चीन (china) आपली पुढची स्कायनेट मोहीम राबवणार आहे.
==========
हे देखील पहा : ‘पुतिनशाही’ विरोधात तिचा संघर्ष
==========
चीन (china) आपल्या नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी आणि त्याच्या आगामी चंद्र तळाचे रक्षण करण्यासाठी चंद्रावर सर्व-दृश्य निरीक्षण स्थापित करण्याची योजना आखत आहे. पुढे ही योजना यशस्वी झाल्यावर त्यातून चीन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याचेही लक्ष ठेवणार आहे.
चीनची ही कॅमेरे लावण्याची मोहीम अत्यंत व्यापक आहे. चीनमधील सर्वच नागरिकांच्या चेह-यांचे यातून मॅपिंग करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे मॅपिंग होणार आहे. यासाठीची साधनसामग्री शेन्झो-13 या रॉकेटच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. चीनची ही मोहीम सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. चीन सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातही यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या वर्षातच ही मोहीम चालू होणार असून, त्यातून लावण्यात आलेले कॅमेरे आता चीनमधील आणि अन्य देशातीलही नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
सई बने