आगरा येथे शाळेत घेऊन येणाऱ्या आजीवर मुल चोरी करण्याचा आरोप तर त्रिपुरात मुल चोरी केल्याची अफवा, मासनिक रुपात विक्षिप्त असलेल्याम महिलेला जमावाकडून मारहाण… अशा विविध घटनांसंदर्भातील रिपोर्ट्स आपल्याला इंटरनेटवर पहायला मिळतात. अशातच अफवा आणि भीतीमुळे देशात काही दिवसांपासून खुप अधिक हिंसक घटना घडल्या आहेत. या सर्वांमागील कारण हे अत्यंत धक्कादायक आहे. (Child trafficking)
NCRB च्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ मध्ये एकूण ७७,५३५ मुलं बेपत्ता झाली. ऐवढेच नव्हे तर गेल्या ५ वर्षात मुल बेपत्ता झाल्याची ३.४ लाखांपासून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. या व्यतिरिक्त धक्कादायक बाब अशी की, या तथ्यांमध्ये प्रत्येक चार बेपत्तांपैकी तीन मुलींचा समावेश असल्याचे म्हटले आहे,
प्रत्येक वर्षी वाढतोय मुलं गायब होण्याची आकडेवारी
गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता मुलं बेपत्ता होण्याची ३.४ लाखांहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी जवळजवळ ६८ हजार मुलं गायब होतात. चिंतेचा विषय असा की, प्रत्येक वर्षी हा आकडा वाढत चालला आहे. वर्ष २०१७ मध्ये मुलं चोरी केल्याची ६३,३३९ प्रकरणे दाखल करण्यात आली. तर २०२१ मध्ये हिच आकडेवारी वाढून ७७,५३५ वर पोहचली आहे लॉकडाऊनच्या काळात ते त्याआधी म्हणजेच २०२० मध्ये सुद्धा ५९,२६२ मुलं बेपत्ता झालीत.

आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात २०२१ मध्ये सर्वाधिक (११,६०७) मुलं बेपत्ता झाल्याची प्रकरणे दाखल झाली. पश्चिम बंगाल (९९९६), तमिळनाडू (६३९९), दिल्ली (५७७२) आणि राजस्थान (४९३६). देशातील जवळजवळ ५० टक्क्यांहून अधिक प्रकरणे या राज्यातील आहेत.
प्रत्येक ४ मुलांमध्ये ३ मुलींचा समावेश
वर्ष २०२१ च्या एनसीआरबीच्या रिपोर्ट्सनुसार, मुली गायब होण्याची आकडेवारी धक्कादायक आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलांमध्ये ७५ टक्के मुलींचा समावेश आहे. तर उडिसा (८४.८६ टक्के), छत्तीसगड (८७.४ टक्के), पश्चिम बंगाल (८४.८१ टक्के), बिहार (८४.५३ टक्के), पंजाब (८४.३१ टक्के), मध्य प्रदेश (८१.५३ टक्के) आणि आंध्र प्रदेश (८०.१३ टक्के) ही अशी राज्य आहेत जेथे मुली अधिक प्रमाणात बेपत्ता होण्याची टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (Child trafficking)
हे देखील वाचा- “होय, मी आरोपी क्रमांक एक आहे….” असं छातीठोकपणे सांगणारे आचार्य धर्मेंद्र कालवश
देशात वाढतेय मुलं चोरी करण्याच्या अफवा
देशभरात गेल्या काही महिन्यांपासून मुलं चोरी केली जात असल्याची अफवा अधिक वेग धरु लागली आहे. यामुळे खुप हिंसक घटना ही झाल्या आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये मुलं चोरी करण्याच्या अफवेमुळे निर्दोष लोकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आता काही राज्यांतील पोलिसांनी अफवांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सुचना ही जाहीर केल्या आहेत.