ब्रिटन आणि जगाच्या इतिहासात सर्वाधिक राज्य करणारी राणी म्हणून एलिथाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या राणीचा गौरव करण्यात येतो. तब्बल 70 वर्षे आणि सात महिन्यांची राणी एलिझाबेथची राजवट इतिहासातील कोणत्याही ब्रिटिश सम्राटापेक्षा सर्वात मोठी होती. राणीनंतर तिचा मुलगा चार्ल्स तृतीय हा ब्रिटनचा राजा झाला. वयाच्या 73 व्या वर्षी राजा झालेल्या चार्ल्सची राजवट ही सुरुवातीपासून अडचणीची ठरली आहे. पहिल्यांदा चार्ल्सच्या राजेपदालाच काही ब्रिटीश नागरिकांनी विरोध केला. चार्ल्सची पहिली पत्नी युवराज्ञी डायना हिच्या हत्येचा आरोप चार्ल्सवर आहे. असा राजा आम्हाला नको, म्हणून ब्रिटनमध्येच चार्ल्सला विरोध झाला. अगदी राणीनंही शेवटपर्यंत आपला उत्तराधिकारी कोण हे जाहीर केलं नव्हतं. (Charles III King And Camella Parker)
पण ब्रिटीश राजघराण्याच्या नियमानुसार चार्ल्स तिसरा हा ब्रिटनचा राजा झाला. आणि त्याची द्वितीय पत्नी कॅमेला पार्कर ही राणी झाली. त्यानंतर राजाची कर्तव्य पार पाडणा-या चार्ल्सला कॅन्सर सारखा आजार झाला. कॅन्सरवरील उपचारासाठी चार्ल्स वर्षभर आपल्या राजवाड्यतच राहिला. आता कुठे या रोगावर मात केल्यावर चार्ल्स आपल्या राजकीय कर्तव्यासाठी बाहेर पडत आहे. मात्र त्याच्या पहिल्याच राजकीय दौ-यात ब्रिटीश राजेशाहीविषय़ी अतिशय कठोर भाषेत टिका त्याला ऐकावी लागली. ऑस्ट्रेलियन संसदेत एका समारंभासाठी गेलेल्या राजा चार्ल्स तिसरा याला खासदार लिडिया थॉर्प हिनं आरसा दाखवला. तू राजा नाहीस, तू खुनी आहेस, आम्ही तुला राजा मानत नाहीत, असं लिडिया थॉर्प यांनी जाहीरपणे सांगून खळबळ उडवून दिली. (International News)
त्यानंतर चार्ल्स यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पण लिडिया थॉर्प यांच्यानंतर चार्ल्स तिसरे यांना कॉमनवेल्थ देशांच्या परिषदेत गुलामगिरीबद्दल अनेक देशांनी सुनावले. नुसते सुनवले नाही तर ब्रिटन राजघराण्यानी आमच्या पूर्वजांवर अन्याय केला आहे. आमच्या जनतेला गुलामगिरीमध्ये ठेवले. यासाठी ब्रिटननं आम्हाला भरपाई द्यावी अशी मागणीच या देशांनी भर शिखर परिषदेमध्ये केली आहे. ज्या देशाच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नाही, असे गर्वाने बोलले जायचे, त्या राजघराण्यासमोर त्यांनीच केलेल्या कॉमनवेल्थ देशांनी चक्क भरपाईची मागणी केली आहे. यामुळे ब्रिटनचे राजे तिसरे चार्ल्स हे नाराज झाले आणि त्यांनी लवकरच या परिषदेतून पाय काढून घेतला. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स, म्हणजेच कॉमनवेल्थ म्हणजे 56 सदस्य राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यातील बहुतांश देशांवर ब्रिटनची सत्ता होती. कॉमनवेल्थची स्थापना 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटीश साम्राज्याच्या विघटनासह झाली. (Charles III King And Camella Parker)
कॉमनवेल्थचे प्रमुख ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आहेत. याच राजा तिसरे चार्ल्स यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच दक्षिण-मध्य प्रशांत महासागरातील सामोआ बेट समुहांवर शिखर परिषद झाली. या शिखर परिषदेला 56 राष्ट्रकुल देशांचे नेते उपस्थित होते. यातील बहुतेक देश हे ब्रिटनच्या वसाहतवादी धोरणाला बळी पडलेले देश आहेत. बदलते हवामान आणि त्याचे परिणाम यावर या शिखर परिषदेत चर्चा कऱण्यात येणार होती. मात्र त्यातील सहभागी देशांनी आपल्या चर्चेचा रोख ब्रिटन राजघराण्याच्या वसाहतवादी धोरणाला विरोध करण्याकडे वळवला, आणि एकच गोंधळ उडाला. कॉमनवेल्थ देशांनी ब्रिटनच्या राजावर गुलामगिरीची भरपाई देण्यासाठी दबाव आणला. या शिखर परिषदेत गुलामगिरी आणि साम्राज्याचा वारसा या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. या परिषदेत आफ्रिकन, कॅरिबियन आणि पॅसिफिक देशांनी ब्रिटनसह इतर युरोपीय शक्तींनी भूतकाळात त्यांना गुलाम बनवल्याबद्दल आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी केली. (International News)
शिखर परिषदेदरम्यान बहामासचे पंतप्रधान फिलिप डेव्हिस यांनी हवामान बदलापेक्षा आपल्या भूतकाळावर चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आपल्या भविष्यात ऐतिहासीक चुका झाल्या आहेत. या चुकांवर बोलण्याची वेळ आली आहे. गुलामगिरीच्या भीषणतेने आपल्या समाजात एक खोल, पिढ्यानपिढ्या जखमा सोडल्या आहेत आणि न्यायाचा लढा अजून संपलेला नाही, असे सांगून त्यांनी ब्रिटनच्या राजघराण्याकडे माफी मागावी अशी मागणी केली. शिवाय ब्रिटीश राजघराण्यानं जी आमच्या देशाची लूट केली आहे, ती परत करावी अशी मागणीही केली आहे. यामुळे उपस्थित देशांमध्ये खळबळ उडाली. अन्य देशांच्या प्रतिनिधींनीही याच मागणीला उचलून धरले. ब्रिटीश राजघराण्याकडे आमच्या पूर्वजांचा वारसा आहे. त्यांनी तो लुटून नेला आहे, तो आम्हाला परत करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्थात या मागणीमुळे राजे चार्ल्स हे गोंधळून गेले होते. त्यांनी, कॉमनवेल्थमधील लोकांचे ऐकल्यानंतर, आपल्या भूतकाळातील सर्वात वेदनादायक पैलू आजही आपल्या मनात आहेत. (Charles III King And Camella Parker)
======
हे देखील वाचा : तू राजा नाहीस तू खूनी आहेस !
======
आपल्यापैकी कोणीही भूतकाळ बदलू शकत नाही, परंतु त्यापासून काही शिकण्यासाठी आणि असमानता दूर करण्यासाठी आम्ही मनापासून वचनबद्ध आहोत. असे सांगून उपस्थित देशांच्या प्रतिनिधींची समजूत काढण्याता प्रयत्न केला. मात्र हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेतही गाजला. आधिच मोठ्या आर्थिक मंदीचा फटका बसलेल्या ब्रिटन सरकानं अशी कुठलीही नुकसानभरपाई दिली जाणार नाही, असे सांगितले. शिवाय ब्रिटन सरकारच्या प्रतिनिधींनी शिखर परिषदेत माफी मागण्यास नकार दिला आहे. या सर्वांमुळे भविष्यात कॉमनवेल्थ या संघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजेशाहीला खुलेपणानं विरोध करणा-या या देशांनी आता आपल्या न्याय मागण्यांसाठी राजाकडे जाहीर तक्रार केली आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे वर्चस्व मानत नसल्याचा सूर ऑस्ट्रेलियामध्ये नुकताच गुंजला. त्यापाठोपाठ कॉमनवेल्थ शिखर परिषदेतही असाच सूर होता. यावरुन ब्रिटनच्या राजघराण्याला घरघर लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. (International News)
सई बने