गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम यात्रेची सुरुवात झाली आहे. ही हिवाळी चारधाम यात्रा म्हणूनही ओळखली जाते. उत्तराखंडमध्ये असलेल्या या हिवाळी चारधाम यात्रेसाठी गेल्यावर्षी मोठ्याप्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. मात्र यावर्षी उत्तराखंड आणि हिमाचलप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये चारधाम यात्रेसाठी भाविक येतील की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती, मात्र हिवाळी चारधाम यात्रेसाठी येणा-या भाविकांनी पहिल्याच दोन दिवसात गेल्या वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असताना हिवाळी चार धाम यात्रेबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. 30 डिसेंबरपर्यंत 15 हजारांहून अधिक भाविकांनी या चार धामला भेट दिली आहे. या चारधाम मधील सर्वच हॉटेल पुढ्च्या महिन्याभरांसाठी बुक असल्यानं ही स्थाने पुढील काही महिने भाविकांनी अशीच गजबजलेली रहाणार आहेत. (Char Dham)
उत्तराखंड सरकारने 8 डिसेंबर रोजी हिवाळी चार धाम यात्रेचे अधिकृतरित्या उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या यात्रेच्या निमित्तानं उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांमध्येही गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. यावेळीही तसाच प्रत्यय येत आहे. उत्तराखंडमध्ये तापमानाचा चांगालाच घसलेला असतांना आणि मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असतांना मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. उत्तराखंडच्या गढवालमध्ये 4 मुख्य धाम आहेत. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांना चार धाम म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मे ते नोव्हेंबर या कालावधीत लाखो भाविक या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. मात्र त्यानंतर या भागातील हवामान प्रतिकूल होत असल्यानं भाविक या तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी येत नाहीत. याचा फटका येथील स्थानिकांना बसत असे. उत्तराखंड सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी 48 लाखांहून अधिक यात्रेकरू मे ते नोव्हेंबर महिन्यात आल्याची नोंद आहे. (Social News)
या यात्रेकरुंमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. स्थानिकांना यातून रोजगार निर्माण होतो. उत्तराखंड सारख्या राज्यात अन्य कुठलेही रोजगाराचे मार्ग उपलब्ध नाहीत. येथे पर्यटन आणि धार्मिक पर्यटन यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र हे सर्व रोजगाराचे गणित हिवाळ्याच्या महिन्यात सुस्तावल्यासारखे होते. त्याला कारण म्हणजे या भागात होणारी जोरदार बर्फवृष्टी. जवळपास सहा महिने हवामानामुळे या भागात पर्यटक येत नसल्यामुळे स्थानिकांना मोठा आर्थिक फटका बसत असे. हिवाळ्याच्या महिन्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे ही मंदिरे दुर्गम होतात. हिवाळ्याच्या महिन्यांत या मंदिरांच्या मुख्य देवतांना खाली असलेल्या अन्य मंदिरांमध्ये हलवले जाते. उत्तरकाशीतील मुखबा हे गंगोत्री धामचे हिवाळी निवासस्थान आहे. (Char Dham)
उत्तरकाशीतील खरसाळी हे यमुनोत्री धामचे हिवाळी निवासस्थान आहे. केदारनाथचे हिवाळी निवासस्थान उखीमठ असून रुद्रप्रयागमधील ओंकारेश्वर मंदिर आणि बद्रीनाथचे हिवाळी निवासस्थान चमोलीचे पांडुकेश्वर हे आहे. या मंदिरांमध्ये आता हिवाळी चारधाम यात्रा सुरु केल्यानं येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. हा सर्व कालावधी या भागात ऑफ सिझन म्हणून ओळखला जातो. हिवाळा फार असल्यामुळे पर्यटकांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे या चारही धाममधील देवतांचे दर्शन करतांना फार गर्दी नसते. शिवाय या भागातील वातावरणही नेत्रसुखद असते. त्याचाही पर्यटकांना लाभ घेता येतो. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत येथे 15 हजाराहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. हिवाळ्यात हा सर्व भाग बर्फ आणि दाट धुक्यांनी झाकला गेलेला असतो. त्यामुळे या हिवाळ्याच्या महिन्यातील पर्यटनाला सन टुरिझम असेही म्हणतात. (Social News)
========
हे देखील वाचा : US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?
Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?
======
या भागात क्वचित सूर्याचे दर्शन होते. सूर्य दिसलाच तर बर्फाच्या डोंगराआडून त्याला बघणे ही मोठी पर्वणीच असते. त्यामुळेही येथील हिवाळी पर्यटन हे सन टुरिझम म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात मोठ्या संख्येनं येणा-या भाविकांसाठी उत्तराखंड सरकारनं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या भागात रोज मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असला तरी मंदिरापर्यंत जाणा-या सर्व मार्गांवरुन बर्फ हटवण्यात येत आहे. या चारधाम यात्रेपाठापाठ महाकुंभही सुरु होत असल्यामुळे उत्तराखंडमधील पवित्र नदिमध्येही स्नान करण्यासाठी या भाविकांची गर्दी होत आहे. जानेवारीच्या 13 तारखेपासून उत्तराखंडमध्येही पर्यटकांची संख्या अधिक वाढेल, असा विश्वास उत्तराखंड सरकारनं व्यक्त केला आहे. (Char Dham)
सई बने