Home » एकेकाळी म्हटले गेले २१ व्या शतकातील हीरो आणि भावी पीएम, पण आज मुख्यमंत्री होण्यासाठी करतायत धडपड

एकेकाळी म्हटले गेले २१ व्या शतकातील हीरो आणि भावी पीएम, पण आज मुख्यमंत्री होण्यासाठी करतायत धडपड

by Team Gajawaja
0 comment
Chandra Babu Naidu
Share

देशाच्या राजकरणात नव्वदीच्या दशकात काही मोठे चेहरे उदयास येत होते. त्यापैकीच एक होते- तेलगू देशम पार्टीचे प्रमुख चंद्र बाबू नायडू (Chandra Babu Naidu). नायडू आंध्र प्रदेशात खुप प्रसिद्ध झाले होते, नाटकीय ढंगाने ते मुख्यमंत्री झालेच. केंद्राच्या राजकरणात सुद्धा मोठी दखल घ्यायचे. आपले असे एक पद त्यांनी निर्माण केले होते की, ज्यामुळे त्यांना कोणीही दुर्लक्षित करु शकत नव्हते.

तर २० व्या शतकाचा अखेरचा काळ होता. १९९९ मध्ये इंडिया टुडेच्या मॅगझिनमध्ये भारतीय राजकीय नेत्यांवर एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये सर्वात वरच्या स्थानावर नायडू यांचे नाव होते. चंद्र बाबू नायडू यांना स्टार ऑफ द न्यु मिलेनियम म्हणजेच नव्या दशकाचा हिरे असे म्हटले होते. २१ वे शतक आले आणी राज्य ते केंद्राच्या राजकरणात त्यांची छाप पडली गेली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची ही छाप फिकी झाल्याचे दिसून आले आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष YSRCP चे सदस्य रामबाबू यांनी चंद्र बाबू नायडू यांच्या पत्नीवरुन अश्लील टीप्पणी केली होती. टीडीपी सदस्यांनी विधानसभेत विरोध करत गदारोळ केला होता. दोन्ही पक्ष्यांच्या सदस्यांमध्ये वाद पेटला होता. तर नायडू यांनी सभात्याग केला. त्यांनी असे म्हटले की, आजच्या नंतर मी सदनात येणार नाही. मी मुख्यमंत्री होईन तेव्हाच सदनात पाऊल टाकेन.

विधानसभेतून निघाल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या दरम्यान, मीडियासमोर जोरजोरात ते रडले. त्यांनी विधनासभेची तुलना महाभारताच्या त्या सभेशी केली होती जेथे कौरवांनी द्रौपदीचे चीरहरण करण्याचा प्रयत्न केला होता.

Chandra Babu Naidu
Chandra Babu Naidu

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी संघर्ष
आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री राहिलेले चंद्र बाबू नायडू आता विरोधी पक्ष नेते आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत निवडणूकीत पराभव झाल्यानंतर त्यांना सत्तेसाठी संघर्ष करावा लागत आहे. जगन मोहन रेड्डी हे अलीकडच्या काळात लोकप्रिय युवा नेता म्हणून उदयास आले आहेत. तर नायडू यांच्या लोकप्रियतेसह राजकरणातील त्यांचे पद ही कमी झाले आहे. नायडू (Chandra Babu Naidu) यांना मुख्यमंत्र्यांच्या पदासाठी संघर्ष करावा लागत आहे. या संघर्ष यात्रेत त्यांनी २८ ते ३० डिसेंबर दरम्यान नेल्लोरच्या परिसरात दौऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये सात जणांचा मृत्यू आणि काही जण जखमी झाले.

चतुराईने बनले होते मुख्यमंत्री
शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले चंद्र बाबू नायडू यांनी वयाची ७२ वर्ष ओलांडली असतून त्यांना पाच दशकांहून अधिक राजकरणाचा अनुभव आहे. १९९६ मध्ये एचडी देवेगौडा यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचवण्यासाठी सेक्युलर मोर्चाचे गठन असो किंवा १९९९ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारचे गठन… नायडू यांची भुमिका महत्वपूर्ण होती.

एनटीआरचे जावई होते, त्यामुळेच त्यांना टीडीपीत अधिक वर जाता आले आणि नंतर १९९५ मध्ये नाटकीय ढंगाने ते आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. एनटीआरच्या जागी त्यांची दुसरी पत्नीलक्ष्मी यांच्यावर शासन चालवण्याचा आरोप लावत त्यांनी पक्षात गटबाजी सुरु केली आणि सासऱ्यांनाच पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन हटवले. एनटीआर यांना खाली उतरवरुन ते स्वत:च मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले.

हे देखील वाचा- टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या रोड शोमध्ये चेंगराचेंगरी, ७ जणांचा मृत्यू

एकेकाळी पंतप्रधानांच्या पदासाठी होते दावेदार
काही राजकीय पक्षांमध्ये खासगी संबंध ठेवणारे नायडू यांना २०१९ मध्ये पंतप्रधान पदाचा दावेदार मानले जात होते. एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा त्यांचे नाव सुचवले होते. दरम्यान, त्यांनी स्वत: असे म्हटले होते की, भाजपला पूर्णपणे बहुमत मिळण्याच्या स्थिती विरोधी पश्राकडून एचडी देवगौडा किंवा शरद पवार हे पीएमसाठी योग्य उमेदवार असतील.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत नायडू यांनी म्हटले होते की, त्यांना खुप आधी दोन वेळा मुख्यमंत्री पदासाठी ऑफर दिली गेली होती. १९९५-११९६ मध्ये देवगौडा यांच्या निवडीपूर्वी आणि नंतर इंदर कुमार गुजराल यांच्या निवडीपूर्वी, मात्र तेव्हा त्यांनी त्यासाठी नकार दिला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.