Home » अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्य़ाशी संबंधित अनेक ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेचे छापे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्य़ाशी संबंधित अनेक ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेचे छापे

by Team Gajawaja
0 comment
NIA
Share

NIA ने आज पाकिस्तानस्थित गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि काही हवाला ऑपरेटर्सच्या साथीदारांविरुद्ध मुंबईत डझनभराहून अधिक ठिकाणी छापे टाकले. छाप्यांदरम्यान, एनआयएने हाजी अली आणि माहीम दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी आणि सलीम फ्रुट्स यांना ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेची ही कारवाई मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी सुरू आहे. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज तस्कर दाऊदशी जोडले गेले होते. NIA ने फेब्रुवारीमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरोधात आज छापे टाकण्यास सुरुवात करण्यात आली.

सलीम फ्रूट याच्या घरावर छापा टाकला होता. सलीम फ्रुट्सच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय कय्युम नावाच्या व्यक्तीला माहीम परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

NIA takes over probe on Chinese vessel with 'suspicious' equipment that  arrived in Gujarat last year | India News,The Indian Express

====

हे देखील वाचा: अटीचं उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याचा अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता

====

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छापा तुरुंगात बंद महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांच्याशीही संबंधित आहे. मंत्री नवाब मलिक यांना दाऊदची बहीण हसिना पारकरकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी आणि त्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने दाऊद इब्राहिम या त्याच्या अवैध व्यावसायिक टोळी ‘डी कंपनी’विरोधात गुन्हा दाखल केला होता. डी कंपनी ही संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेली दहशतवादी संघटना आहे.

दाऊद इब्राहिमला 2003 मध्ये UN ने जागतिक दहशतवादी घोषित केले होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील तो मुख्य आरोपी आहे. तो कधी पाकिस्तानात तर कधी इतर देशांत लपून बसतो. एनआयएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दाऊदचे साथीदार आणि काही हवाला ऑपरेटर यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.

nia raids in mumbai: NIA Raids: मुंबईत एनआयएची मोठी कारवाई; नागपाडा,  भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी - nia raids begin at several locations  in mumbai in connection with gangster dawood ...

====

हे देखील वाचा: लोको पायलटने जीव धोक्यात घालून नदीच्या पुलावर थांबलेली ट्रेन पुन्हा केली सुरु

====

सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील हा त्याच्या साथीदारांमार्फत अवैध खंडणीची टोळी चालवतो. सलीमला 2006 मध्ये संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पाठवण्यात आले होते. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. एनआयएने त्याला तुरुंगातूनच ताब्यात घेतले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.