Car Hacking : कार मालकांना सर्वाधिक मोठी चिंता असते की, त्यांची कार चोरी होईल. यासाठी कार लॉक करणे आणि खिडकी बंद करणे पुरेसे नाही. पण तुम्हाला माहितेय का, कार चोरी होण्यासह हॅकिंगही एक मोठी समस्या आहे. जसजशी टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे तसे नवे धोके वाढले जात आहेत. आजकाल मॉर्डन कारमध्ये कनेक्टेड कार फिचर्सची क्रेज अधिक आहे. पण हे फीचर तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.
कार हॅकिंगपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स
कारमध्ये पासवर्ड विसरु नका
कारमध्ये एखादा व्यक्ती चुकीच्या विचाराने आल्यास आणि त्याला कारचा पासवर्ड मिळाल्यास त्याच्याकडे तुमच्या कारसंदर्भातील काही महत्त्वाची माहिती मिळेल. यामुळे कारमध्ये कधीच पासवर्ड विसरू नका.
जीपीएसमध्ये घराचा पत्ता
कारच्या जीपीएसमध्ये घराचा पत्ता सेव्ह करणे सामान्य बाब आहे. पण हॅकिंगपासून दूर राहण्यासाठी असे अजिबात करू नका. अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकता. घराच्या सिस्टिममध्ये घराचा पत्ता टाकू नये. हॅकर्स तुमच्या घराचा पत्ता शोधून काढू शकतात.
व्हायरलेस सिस्टिम
कारमध्ये असे काही सिस्टिम असतात जे तार किंवा केबलच्या माध्यमातून कंट्रोल केले जाऊ शकतात. अशातच हॅकिंगची समस्या अधिक वाढली जाते. कारमध्ये कार किंवा तारशिवाय वापरल्या जाणाऱ्या सिस्टिम दिल्या जातात. यामुळे काही सिस्टिम कार अनलॉक करण्याचे काम करतात. यामुळे व्हायरलेस सिस्टिमचा कमी वापर करावा.
इंन्फोटेन्मेंट सिस्टिम
इंन्फोटेन्मेंट सिस्टिम कारचा महत्त्वाचा हिस्सा असतो. जसे की, तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप अपडेट करता त्याचप्रमाणे इंन्फोटेन्मेंट सिस्टिमही अपडेट करावे. (Car Hacking)
कारमध्ये थर्ट पार्टी अॅप
कारच्या इंन्फोटेन्मेंट सिस्टिमला हॅकर्स निशाणा बनवू शकतात. यामुळे कधीच थर्ड पार्टी किंवा अविश्वसनीय अॅप डाउनलोड करू नये. इंन्फोटेन्मेंट सिस्टिममधील वेब ब्राउजरचा वापर करावा.