बहुतांश लोक एखाद्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी टॅक्सी किंवा कॅब बुक करतात. ऑफिसला किंवा फिरण्यासाठी जरी जायचे म्हटले तरीही शेअर्ड कॅबची मदत घेतली जाते. तर काहींना पर्सनल बुकिंग करतात. आजकाल काही अॅपच्या माध्यमातून कॅबची बुकिंग करता येते. ज्यामध्ये कंपनीकडून विविध प्रकारच्या सुरक्षितता आधीच दिल्या जातात. पण आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सुद्धा तयार राहिले पाहिजे. खासकरुन महिलांना आपल्या सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी लागते. तर आम्ही तुम्हाला कॅब बुकिंग करतेवेळी किंवा बोर्डिंग करतेवेळी महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याबद्दलच अधिक सांगणार आहोत.(Cab boarding safety tips)
बोर्डिंगपूर्वी ड्रायव्हरकडे फोटो आयटी ओळखपत्र मागा
ड्रायव्हिंग परवाना, कंपनीची आयडी किंवा अन्य कोणतेही ओळखपत्र तुम्ही तपासून पाहून शकता. अशातच जर वेळ मिळाल्यास तर त्याचा फोटो सुद्धा काढून आपल्या मित्रपरिवाराला पाठवू शकता.
जीपीएस ऑन ठेवा
जो पर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत पोहचत नाहीत तो पर्यंत आपल्या मोबाईलवर नेहमीच जीपीएस सुरु ठेवा. जेणेकरुन चुकीच्या मार्गावरुन जरी तुम्ही जात असाल तरीही तुम्हाला लगेच कळू शकते.
वाहनाचा क्रमांक लक्षात ठेवा
कॅबचा फोटो काढा. अथवा वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढण्यास विसरु नका.
शॉर्टकटचा वापर करु नका
काही कॅब ड्रायव्हर शॉर्टकटने जाण्याचा पर्याय सुचवतात. परंतु तुम्हाला ते शॉर्टकर्ट्स माहिती नसतील तर तुम्हा त्या मार्गाने जाण्यापासून त्यांना नाही म्हणा. जेणेकरुन एखाद्या ठिकाणी पोहचण्यास वेळ लागला तरीही चालेल पण शॉर्टकट्सच्या भानगडीत पडू नका.
स्पिड डायल लिस्ट तयार करा
स्पि़ड डायल लिस्टमध्ये तुम्ही परिवारातील सदस्य किंवा आपल्या जवळच्या मित्रांचे फोन क्रमांक ठेवा. गरज भासल्यास तुम्ही काही सेकंदांमध्येच एखादी स्थिती उद्भवल्यास त्यांच्याशी संपर्क करु शकता.
हे देखील वाचा- धावपळीच्या आयुष्यात महिलांनी अशा पद्धतीने दूर करा मानसिक थकवा
मोबाईल चार्ज असू द्या
कॅबमध्ये बोर्डिंग करण्यापूर्वी तुमचा मोबाईल चार्जिंग असू द्या, तुमच्याकडे बॅटरी बॅकअपसाठी पॉवर बँक ठेवा. कॉल किंवा डेटा पॅक अॅक्टिव्हेट आहे की नाही ते सुद्धा पहा.(Cab boarding safety tips)
सेफ्टी टूल्स ठेवा
आपल्या बॅगमध्ये पेपर स्प्रे किंवा अशा सारख्या काही गोष्टी ठेवणे विसरु नका. या गोष्टी बॅगेत अशा ठिकाणी ठेवा जेथून तुम्ही त्या अगदी लगेच काढू शकता.