Home » ‘या’ निर्मात्याचे बॉलिवूडमधील 29 सिनेमे झालेत फ्लॉप

‘या’ निर्मात्याचे बॉलिवूडमधील 29 सिनेमे झालेत फ्लॉप

बॉलिवूड इंडस्ट्री देशातील सर्वाधिक मोठी सिनेसृष्टी आहे. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमे हमखास प्रदर्शित केले जातात. काही कलाकारांना ऐवढी प्रसिद्धी मिळते की, त्यांचे नाव सातासमुद्रापलीकडे देखील घेतले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Bollywood
Share

Bollywood : बॉलिवूड इंडस्ट्री देशातील सर्वाधिक मोठी सिनेसृष्टी आहे. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमे हमखास प्रदर्शित केले जातात. काही कलाकारांना ऐवढी प्रसिद्धी मिळते की, त्यांचे नाव सातासमुद्रापलीकडे देखील घेतले जाते. पण काही कलाकार, दिग्दर्शक असे असतात ज्यांना सिनेसृष्टीत यश एका मर्यादित काळापर्यंतच मिळते. त्यापैकीच एक म्हणजे राम गोपाल वर्मा.

राम गोपाल वर्मा यांनी 90sच्या दशकात काही असे सिनेमे तयार केले जे सुपरहिट झाले. याशिवाय त्या सिनेमातील कलाकारही प्रसिद्ध आहे. राम गोपाल वर्मा सिनेसृष्टीत दिग्दर्शकाचे काम करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी नाइजेरियात गेले होते. येथे त्यांना एक आयडिया सुचली आणि त्यांनी हैदराबादमध्ये रेंटल लाइब्रेरी सुरू केली. अशातच त्यांचे सिनेसृष्टीतील लोकांशी संपर्क अधिक वाढू लागला. राम गोपाल वर्मा यांचे वडील अन्नपूर्णा स्टुडिओजचे साउंड एडिटर होते.

त्यानंतर हळूहळू राम गोपाल वर्मांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. दोन सिनेमांमध्ये असिस्टेंट डायरेक्टरच्या रुपात काम केल्यानंतर त्यांनी नागार्जुन यांच्यासोबत मिळून एक सिनेमा तयार केला. तो राम गोपाल वर्मांचा पहिला सिनेमा ठरला. ‘शिवा’ असे सिनेमाचे नाव होते. हा सिनेमा तेलुगू इंडस्ट्रीमध्ये खुप गाजला. यानंतर राम गोपाल वर्मा यांचे नशीब पालटले गेले. त्यांचा शिवा सिनेमा हिंदीत रिमेक करण्यात आला आणि या भाषेतही अधिक प्रेक्षकांनी तो पसंत केला. (Bollywood)

प्रदीर्घकाळानंतर राम गोपाल वर्मांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत ‘रंगीला’ सिनेमा तयार केला. या सिनेमात आमिर खान, जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भुमिकेत होते. या सिनेमाने सात फिल्मफेअर अवॉर्ड्स आपल्या नावावर करून घेतले. यानंतर ‘रंगीला’ सिनेमाचा हॉलिवूडमध्ये रिमेक तयार करण्यात आला. यानंतर वर्मांनी ‘सत्या’, ‘कौन और मस्त’ सारखे सिनेमे तयार केले. वर्ष 2005 मध्ये आलेला वर्मांचा ‘सरकार’ सिनेमा देखील चर्चेत राहिली.

यानंतर वर्मांना मोठ्या प्रमाणात यश मिळणे कमी होऊ लागले. त्यांनी आपल्या बॉलिवूड करियरमध्ये एकूण 34 सिनेमांपैकी 29 सिनेमे फ्लॉप दिले. ‘सत्या’ सिनेमानंतर त्यांचा आजवर एकही हिट सिनेमा ठरला नाही. काही सिनेमे सेमी हिट ठरले तर काही एव्हरेज होते. यानंतर वर्मांनी ‘डरना जरूरी है’, ‘निशब्द’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘डार्लिंग’, ‘फूंक’ असे सिनेमे केले. दिग्दर्शकाच्या रुपात वर्मांचे आजही सिनेमे प्रदर्शित होतात. यंदाच्या वर्षात राम गोपाल वर्मांचा ‘व्यूहम’ सिनेमा चर्चेत आहे.


आणखी वाचा :
साउथ अभिनेता थलापति विजय राजकरणात करणार एण्ट्री?
अमृता राव ते तनुश्री दत्तांसह या कलाकारांनी घेतलाय बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय
हॉलिवूडमधील हे 5 सिनेमे कधीच एकट्यात पाहू नका, अन्यथा…

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.