Bollywood Movie : 70 च्या दशकात एकामागोमाग एक अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांच्या एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच. पण प्रेक्षकांच्या मनावर ठसाही उमटला. खरंतर, अमर अकबर एंथोनी सिनेमाने बॉक्सऑफिसच नव्हे परदेशातही धुमाकूळ घातला होता. या सिनेमाची कल्पना कशी सुचली हे तुम्हाला माहितेय का?
सिनेमाची अशी आली आयडिया
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, एकदा मनमोहन देसाई यांनी सांगितले होते अमर अकबर एंथोनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नव्हता. त्यांनी म्हटले होते की, एक दिवस आपल्या गार्डनमध्ये बसून न्यूजपेपर वाचत असताना एका बातमीने त्यांचा विचार करणे भाग पाडले.
परदेशातीलच एक बातमी होती. त्यामध्ये लिहिले होते की, एका दारू पिणाऱ्या गरीब व्यक्तीने तीन मुलांना गार्डनमध्ये सोडून निघून गेला. यानंतर मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना तो भेटला असता त्याने मुलांना ओखळले. केवळ ऐवढ्याशाच स्टोरीवरून मनमोहन देसाई यांनी लेखकांच्या टीमला बोलावून ऐवढ्याशाच कथेतमधून संपूर्ण सिनेमा लिहिण्यात सांगितला. काही काळानंतर सिनेमाची कथा तयार केली आणि त्याचे नाव अमर अकबर एंथोनी असे ठेवले गेले. (Bollywood Movie)
सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार
वर्ष 1977 मध्ये आलेल्या अमर अकबर एंथोनी एक हिंदी मसाला सिनेमा होता. या सिनेमाच्या कथेची कल्पना मनमोहन देसाई यांचा सुचली होती. सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती मनमोहन देसाई यांनीच केले होते. सिनेमात विनोद खन्ना, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासह शबाना आजमी, नीतू सिंह आणि परवीन बाबी यांनी भूमिका साकारली होती.
सिनेमाचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन
27 जानेवारी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर अकबर एंथोनी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने भारतात उत्तम कमाई केली होतीच. पण परदेशातही तडगी कमाई झाली होती. Sacnilk च्या मते, एक कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनेमाने भारतात 7.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाची कमाई 15.50 कोटी रुपये झाली होती.