Home » Bird Flu : आकाशात उडणारे पक्षी थेट जमिनीवर !

Bird Flu : आकाशात उडणारे पक्षी थेट जमिनीवर !

by Team Gajawaja
0 comment
Bird Flu
Share

महाराष्ट्रातील लातूरमध्ये आणि राजस्थानातील जैसलमेरमध्ये बर्ड फ्लू च्या घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये 51 कावळे बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडले आङेत. तर जैसलमेरमध्ये चक्क आकाशात उडताना क्रेन म्हणजेच कुरजान पक्षी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात आत्तापर्यंत 28 पक्षांचा मृत्यू झाला असून हा मृत्यूही बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सागरी पक्षांमध्ये बर्ड फ्लू चा फैलाव किती झाला आहे, याचा तपास करण्यात येत आहे. अशाचप्रकारे बर्ड फ्लू पसरला तर भारतातील अनेक राज्यातील पक्षांना धोका येऊ शकतो, त्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांना आरोग्य विभागानं सूचना दिल्या आहेत. भारतातील महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यात बर्ड फ्लू च्या मोठ्य़ा घटना समोर आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानातील जैसलमेरमध्ये येणाऱ्या कुरजन या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात पसरला आहे. एकाच आठवड्यात बर्ड फ्लूमुळे 28 सागरी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. (Bird Flu)

जानेवारीच्या दुस-या आठवड्यापासून या सागरी पक्षांच्या मृत्यूच्या घटना समोर येऊ लागल्या. भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात स्थलांतरित पक्षांची संख्या मोठी असते. डिसेंबर महिन्यापासून हे सागरी पक्षी या भागात येतात. मात्र यावर्षी आलेल्या पक्षांमुळे बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बर्ड फ्लू चा फैलाव अन्य राज्यातील पक्षांमध्ये होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्य़ात आले आहे. जैसलमेरमध्ये डेमोइसेल क्रेनच्या मृत्यूमध्ये आता वाढ होऊ लागली आहे. या बाबत भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थेनं पहाणी केली असून या पक्षांमध्ये बर्ड फ्लू असल्याची त्यांनी पुष्टी केली आहे. जैसलमेरमधील लुनेरी तलावात हे पक्षी मोठ्या संख्येनं मृत आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनानं याबाबत अधिक तपास करण्यासाठी आणि बर्ड फ्लू चा फैलाव अन्य भागात होऊ नये म्हणून एक समिती नेमण्यात आली आहे. (Latest News)

यासोबतच जिल्ह्यातील जलस्रोतांचे सर्वेक्षणही केले जात आहे. पण एवढे करुनही या पक्षांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त होत आहे. जैसलमेरमधील मोहनगड येथील बकलसर शाळेजवळील एका शेतात 14 क्रेन मृतावस्थेत आढळले आहेत. याबाबत या भागातील शेतक-यांनी सांगितले की, हे पक्षी आकाशात उडत होते, आणि अचानक ते खाली येऊ लागले. जमिनीवर पडणारे हे पक्षी काही काळ वेदनेमुळे तडफडत होते, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरित वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाला दिल्यावर या पक्षांपासून नागरिकांनी दूर रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर जैसलमेर जिल्ह्यातील देगराय ओराणा परिसरातील लुनेरी तलाव भागातही असेच मृत पक्षी आढळल्यानं या भागाला हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय या मृत पक्षांपासून इतर पक्षी आणि मानवांमध्ये बर्ड फ्लू पसरण्याची भीती देखील असल्यामुळे नागरिकांनी बर्ड फ्लू बाधित भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. अशाच स्वरुपाच्या घटना महाराष्ट्रामधील लातूर जिल्ह्यात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. (Bird Flu)

==================

हे देखील वाचा :   Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?

==================

लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे 51 कावळे मृत्युमुखी पडले आहेत. याबाबतही भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेकडून पहाणी करण्यात आली. त्यांनीच या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे. या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 13 जानेवारीपासून उदगीर शहरातील विविध भागातून मृत पक्ष्यांच्या बातम्या येत आहेत. कावळे बागेत किंवा रस्त्याच्या कडेलाही मृत अवस्थेत सापडल्यामुळे या भागात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं या विभागात 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन जाहीर केले आहे. तसेच अन्य पक्षांवर नजर ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. याशिवाय या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित भागांची स्वच्छता करण्यात येत आहे. या भागातील पोल्ट्री फार्मची देखील तपासणी करण्यात येत आहे. या भागात वा अन्य कुठेही पक्षी मरुन पडल्याचे दिसल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. (Latest News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.