Home » Betting Apps : बेटींग ठरतंय आत्महत्येचं मोठं कारण

Betting Apps : बेटींग ठरतंय आत्महत्येचं मोठं कारण

by Team Gajawaja
0 comment
Betting Apps | Marathi News
Share

“आप ये क्या कर रहे ये मै कर लेता हू, आप बेटींग ॲप पे टीम बनाओ”, “१ नही २ नाही इस् बार ३ करोंड का इनाम…” ‘मैने डेढ करोड रुपये जिते है… हे सगळं ऐकून कळलं असेलच मी कशाबद्दल बोलतोय. आयपीएल सीजन सुरू आहे आणि आयपीएल म्हटलं की बेटींगला उधाणच येतं. आता तर मोबाईल वर बरेच लीगल बेटींग ॲप्स अव्हेलेबल आहेत. खूप वर्षांपूर्वी लॉटरी सिस्टिम होती. सर्वसामान्य माणसं स्वतःचं लक आजमावून पहायचे. आयुष्यात एकदा तरी लॉटरी लागू दे मग करोडपती. तेव्हाची लॉटरी आणि आता बेटींग. दोन्हीकडे लक फॅक्टर येतं. लक लागलं की मालामाल. पण आता काही लोकं आत स्टेडियम मध्ये मॅच एन्जॉय करत असताना बाहेर याच मॅचेसमुळे काही लोक आत्महयासुद्धा करतायत. आणि हे प्रकार भयंकर वाढले आहेत. याला कारण म्हणजे बेटींग आणि या बेटींग चे परिणाम म्हणजे आत्महत्या ! काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ. (Betting Apps)

सुरुवातीला या बेटिंगमुळे मैसूरमध्ये काय घटना घडली, हे तुम्हाला सांगतो. तीन जणांनी मिळून सावरकरांकडून बेटींगसाठी कर्ज घेतलं. जोशी अँथनी, जॉबी अँथनी आणि शर्मिला अशी त्या तिघांची नावं. बराच काळ त्यांना कर्ज फेडता नाही आलं. सावकार त्यांना त्रास द्यायला लागला. जोशी अँथनीला तो त्रास सहन नाही झाला आणि त्याने स्मशानभूमी जवळ आत्महत्या केली. या घटनेची लोकल पोलिसात तक्रार झाली. आता याचे परिणाम खूप वाईट होतील असा अंदाज जॉबी आणि शर्मिलाला आला. दुसऱ्याच दिवशी या दोघांनीसुद्धा आत्महत्या केली कारण त्यांना कर्ज फेडू शकता येणार नव्हतं. त्यांनी आयपीएल बेटींगसाठी घेतलेली कर्जाची रक्कम होती ८० लाख रुपये. बेटींगमुळे त्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंच पण अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यात बेटींगसाठी कर्ज घेतलं, कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या केली. यात अशी सुद्धा उदाहरणं आहेत जे कमवणारे सुद्धा नव्हते.(Latest Marathi News)

आतापर्यंत जर बेटींगचा आकडा पाहिला तर तो ८.५ लाख करोडच्याही वर गेलाय. हे बेटींगचं व्यसन वाढण्यामागचं कारण काय? बरेच ॲप्स याचं प्रमोशन लार्ज स्केलला करतात. ॲडसाठी मोठ्या सेलिब्रिटींचा वापर करतात आणि टीव्हीवर १८% तर याच ॲड्स असतात. त्यालाच तरुण मंडळी जास्तीकरून अट्रॅक्ट होतात. आणखी एक कारण म्हणजे बेटींग तरूणांना ट्रेंडी आणि क्लासि वाटतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षाला बेटींग करणाऱ्यांची संख्या ३०% टक्क्यांनी वाढतेय.(Betting Apps)

याचे परिणाम काय होतात? तर मघाशी आपण मैसूर मधलं याचंच एक उदाहरण पाहिलं. आणखी काही घटना म्हणजे भालकी इथला २२ वर्षाचा स्टुडंट सोमनाथ चिद्रे हा ८० लाख रुपये हरला आणि कर्जामुळे त्याने आत्महत्या केली. बेंगलुरूच्या महाराणी क्लस्टर कॉलेजमधील २० वर्षांची पवना हिने कॉलेज फीज बेटींगवर खर्च केली आणि नंतर आत्महत्या केली. धारवाड येथील ३० वर्षाचा आयआयटी एम्प्लॉयी नागराज उलवन्नवर याने २० लाखांचं कर्ज घेतलं आणि आत्महत्या केली. बिदर येथील २४ वर्षीय विजय कुमारने १२ लाखांचं कर्ज घेऊन स्वतःला पेटवून घेतल. अशी बरीच उदाहरणं सापडतील. (Latest Marathi News)

==============

हे देखील वाचा : Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण आहे तरी कोण?

==============

बेटींगमुळे आर्थिक नुकसानच होत नाही, तर मेंटल हेल्थ गंभीर परिणाम होतात, ज्यामुळे टेंशन, डिप्रेशन आणि आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे असा विचार मांडत बेटींगच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी Angel One च्या FinOne. club ने “Quit Betting” शपथ मोहीम सुरू केली आहे, ज्यात ४२००० हून अधिक लोकांनी बेटींग सोडण्याचा संकल्प केला आहे. त्यांना पहिल्या फेरीत हा आकडा १ लाखापर्यंत पूर्ण करायचा आहे. यासोबतच कर्नाटकातली हेल्थ हेल्पलाइन (१०४) आणि सुशेग ट्रस्टसारख्या संस्था बेटींगचं व्यसन सोडवण्यासाठी काउन्सेलिंग देतायत.(Betting Apps)

क्रिकेट हा खरा मनोरंजनाचा खेळ पण या बेटींगच्या जंजाळत अडकून बरेच जण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करूं घेतात. त्यांनी यातून बाहेर येणं गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. हा हेतु घेऊन Angel One आणि यासारख्या अनेक संस्था काम पाहत आहेत. पण शॉर्ट कर्ट मार्गाने पैसे कमवायच्या नादात काही लोक वर्तमान उद्ध्वस्त करत आहेत. हे वाढत जाणारं बेटींगचं जाळं कमी व्हायला हवं, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.