Home » Uttar Pradesh : संभळच्या बावडीचे रहस्य !

Uttar Pradesh : संभळच्या बावडीचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Uttar Pradesh
Share

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) संभळमध्ये रोज एकापाठोपाठ एक रहस्य बाहेर पडत आहे. संभळच्या भूमीवर विष्णुच्या दहाव्या अवताराचे आगमन होणार असल्याचा उल्लेख पुराणात आहे. याचा आधार घेत येथील मशीद ही हरिमंदिर असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरुन सुरु झालेल्या वादानं आता नवे रुप घेतलं आहे. संभळ ही एकेकाळी सम्राट पृथ्वीराज चौहान (Prithviraj Chauhan), राजा कृष्णकुमार सिंह, या विरांची भूमी होती हे स्पष्ट होऊ लागले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या 1857 च्या लढ्याचेही संभळच्या भूमीबरोबर असलेले नाते आता उलगडू लागले आहे. या विरांच्या भूमीमध्ये एक नाही तर 19 चमत्कारिक विहिरी होत्या. (Uttar Pradesh)

या विहिरी अखंड पाण्यानं भरलेल्या असून त्या पाण्याची चवही वेगवेगळी होती, असे येथील स्थानिक सांगतात. संभळच्या भूमीमध्ये अजून किती रहस्य दडली आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. येथील मंदिरांच्या पुजा-यांकडे जुन्या संभळचा नकाशा जपून ठेवलेला आहे. या नकाशात येथे भगवान शंकराची आणि भगवान विष्णुची मंदिरे दाखवण्यात आली आहेत. तसेच या मंदिरांची स्वतंत्र अशी विहिर होती. या सर्वांना जोडणारा परिक्रमा मार्गही होता. संभळच्या या मंदिरांची परिक्रमा करण्यासाठी देशभरातले हिंदू राजे आणि सामान्य भाविकही येथे येत असत. (Social News)

एकेकाळी हिंदू धर्मातील महत्त्वाचे तिर्थस्थळ म्हणून या शहराची ख्याती होती. संभळ म्हणजे, सांभाळून ठेवले आहे असे. म्हणजेच या शहरानं हिंदू धर्मातील अनेक रहस्य सांभाळून ठेवली आहेत, असे येथील स्थानिक सांगतात. आता हिच रहस्य बाहेर येत असून संभळमध्ये निघालेल्या बावडीनं अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. अशाप्रकारच्या बावडी राजस्थान आणि गुजरातमध्ये तयार होत असत. मात्र संभळच्या राणीनं या बावडींसारखीच बावडी संभळमध्ये का बांधली आणि तिचा 1857 च्या बंडामध्ये कसा वापर झाला हे कोडे आता पडले आहे. संभळचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया यांच्याकडे एका स्थानिकाने केलेल्या पाठपुराव्यातून सुमारे 150 वर्षापूर्वीची एक बावडी सापडली आहे. संभळमधील मंदिरांबाबत चर्चा वाढू लागल्यावर स्थानिक कौशल किशोर यांनी दंडाधिका-यांकडे या बावडीबाबत पत्र पाठवून खोदकाम करण्याची विनंती केली होती. (Uttar Pradesh)

या बावडीलाऐतिहासिक महत्त्व असून ते जपण्यासाठी बावडीचे जतन आवश्यक असल्याचे या पत्रात त्यांनी नमूद केले होते. यानंतर संभळ जिल्ह्यातील चांदौसी तहसीलमध्ये लकमनगंज परिसरात जमिनीखाली दडलेल्या या बावडीला शोधण्यात आले. सुमारे 150 वर्षे जुनी 400 चौरस मीटरची पायरी विहीर म्हणजेच बावडी सापडली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ही बावडी दोन मजल्यांची असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. एवढे मोठे बांधकाम बुझले की बुझवले गेले हा प्रश्नही त्यामुळे निर्माण झाला. जशीजशी ही बावडी खोदण्यात येऊ लागली, त्यातील माती, गाळ बाहेर पडू लागला, तसे या बावडीचे महत्त्व किती होते आणि या बावडीवर कोण येऊन गेले आहे, हे समोर येऊ लागले. (Social News)

या बावडीच्या सर्व भिंती भक्कम आहेत. जुन्या काळात ज्या बारीक विटांचा वापर करण्यात येत असे, त्या विटांचा वापर ही बावडी बांधतांना करण्यात आला आहे. बावडीच्या भिंतीवर हिंदू देवदेवतांच्या प्रतिमाही आहेत. हे बांधकाम खोदतांना कुठल्याही मशीनचा वापर करण्यात येत नाही. 40 मजूरांची टिम दिवसरात्र ही बावडी साफ करीत आहे. यासाठी अनेक स्थानिकांनीही पुढाकार घेतला आहे. संभळच्या चंदौसी राजघराण्याकडून ही बावडी बांधली गेली असल्याची माहिती स्थानिक सांगत आहेत. या बावडीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, यात 5 लहान खोल्याही सापडल्या आहेत. या खोल्यांमध्ये बांधकाम व्यवस्थित आहे. राणी की बावडी म्हणून ही बावडी प्रसिद्ध होती. या बावडीचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी त्या काळात होत होता. (Uttar Pradesh)

=======

हे देखील वाचा : Kashmir : काश्मीरच्या थंडीत कांगरीची गर्मी !

Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवरचा मार्ग भारतीयांसाठी खुला

=======

स्थापत्यशास्त्राचा हा नमुना राजस्थानच्या भागात आढळून येतो. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी असते, तिथे पाणी साठवण्यासाठी अशा बावडी तयार केल्या जात. या बावडीमध्ये पाणीही असायचे. शिवाय येथून जाणा-या प्रवाशांसाठी काही काळ आराम करण्याची व्यवस्था बावडीतील खोल्यांमध्ये व्हायची. प्रवाशी बावडीमध्ये बसून आपल्यासोबत आणलेली शिदोरी खात असत. बावडीचे पाणी पिऊन थोडा आराम करत प्रवासी पुन्हा मार्गस्थ व्हायचे. या बावडीचा वापर युद्धकाळातही झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. येथे सैन्याचा पाडाव पडायचा आणि बावडीच्या पाण्याचा या सैनिकांना उपयोग व्हायचा. मात्र कालांतरानं या बावडीभोवती बांधकामे झाल्यानं पावसाचे पाणी यात जाण्यापासून अटकाव झाल्याचा अंदाज आहे. नंतर ही दोन मजली बावडी बुझवली गेली आणि त्याच्यावर बांधकामे झाली. आता पुन्हा हा इतिहासाचा खजिना खुला झाला असून यानिमित्तानं संभळच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.