Home » चर्चा बलराम बोस यांचीच

चर्चा बलराम बोस यांचीच

by Team Gajawaja
0 comment
Baba Balram Ghosh
Share

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी निषेध आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाचे नाव नबन्ना आंदोलन होते. प्रत्येक घरातून किमान एका व्यक्तीनं या आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आवाहन विद्यार्थी संघनांकडून करण्यात आले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आधीच आरजी हॉस्पिटलमधील हॉक्टरची हत्या आणि त्यानंतर सरकारची संशयास्पद भूमिका यावर पश्चिम बंगालमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय, नबन्नाकडे आपला मोर्चा वळवल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचे हरप्रकारचे प्रयत्न केले. या मार्गावर बॅरिकेट उभारण्यात आल्या होत्या. तसेच ६ हजार पोलीस तैनात होते. यातही आंदोलकांवर पाण्याचा जोरदार फवारा मारण्यात आला. (Baba Balram Ghosh)

पाण्याचा हा मारा सहन न झाल्यामुळे अनेक आंदोलक माघारी फिरले. पण त्यातही एक आंदोलक हातातला तिरंगा फडकावत या पाण्याच्या मारा सहन करत उभा होता. शेवटी पोलीसांनी पाण्याचा मारा थांबवला, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे बघत, माझ्यावर आणखी पाणी मारा, मी घाबरत नाही. तुम्ही हातात बांगड्या भरल्या आहात काय, अशा खुणा करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवर पुन्हा पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. मग मात्र काही तरुणांनी या व्यक्तीला घेरले आणि आंदोलन सुरु केले. पाण्याचा मारा सहन करणा-या या व्यक्तीचा हा निश्चयच त्याला रातोरात स्टार करुन गेला. भगवी वस्त्रे, गळ्यात रुद्राक्षांची माळ असलेली ही व्यक्ती नेमकी कोण हा प्रश्न सर्वांना पडला. (Baba Balram Ghosh)

भगवे कपडे घातलेले आणि हातात तिरंगा फडकवणारे हे होते, बाबा बलराम बोस. वय वर्ष ८३. आता हेच बाबा बलराम बोस हे पश्चिम बंगालमधील आंदोलनचा चेहरा झाले आहेत. त्यांचा पाण्याचा मारा सहन करत ठामपणे उभे रहाण्याचा निर्णय हजारोंना प्रेरणा देऊन गेला आहे. बाबा बलराम बोस यांचा व्हिडिओ हजारो जणांनी शेअर केला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी बाबा बलराम बोस या व्हिडिओ शेअर करत आंदोलनाचा चेहरा, पश्चिम बंगाल सरकारचा निषेध, अशा कॅप्शन दिल्या आहेत. मात्र त्यासोबत बाबा बलराम बोस नेमके कोण आहेत. ते भाजचापे सदस्य आहेत की आरएसएसचे पाठिराखे आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या. सोशल मिडियावर बाबा बलराम बोस यांची शोधाशोध सुरु झाली. मात्र बाबा बलराम बोस यापैकी कोणीही नसून ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. या राज्याचा रहिवासी म्हणून माझी काही कर्तव्य आहेत, ती मी पार पाडत होतो, असेच स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. (Baba Balram Ghosh)

८३ वर्षाचे बाबा बलराम बोस हे पश्चिम बंगालच्या सरकारविरोधी आंदोलनचा चेहरा म्हणून प्रकाशात आले आहेत. कोलकाता मधील आर.जी. रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली. त्यात विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरातील एका व्यक्तींनं या आंदोलनात या अशी साद घातली. संन्यासी मार्ग स्विकारलेल्या बाबा बलराम बोस यांनी या विद्यार्थ्यांची साद ऐकली आणि आपल्या समाजातील महिलांच्या सुरक्षेततेसाठी ते या आंदोलनात सहभागी झाले. माझ्या घरातील महिला जशी सुरक्षित रहायला हवी, तशीच माझ्या समजातील महिलाही सुरक्षित हवी, यासाठी मी रस्त्यावर उतरलो असे बाबा बलराम बोस अभिमानानं सांगतात. यासाठी मी कुठल्या राजकीय पक्षातच असायला हवं, असं बंधन नाही. हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे ते सांगतात. (Baba Balram Ghosh)

==============

हे देखील वाचा : एका ट्रेनी डॉक्टरची हत्या !

===============

८३ वर्षाचे बाबा बलराम बोस हे हे संन्यासी आहेत. कोलकाताच्या माजी महापौर कमला बोस यांचे ते नातू असल्याचीही माहिती पुढे आली आहे. बाबा उच्च शिक्षीत असून त्यांनी स्वेच्छेने संन्यासी मार्ग स्विकारल्याचीही माहिती आहे. बाबा बलराम घोष हे गुरू अरबिंदो घोष यांच्या विचारांनी प्रभावीत आहेत. अरबिंदो घोष यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. “मी ज्या महान गुरूंच्या विचारांचे अनुकरण करतो, त्या अरबिंदो घोष यांनी तुम्हाला खरोखर काही करायचे असेल तर ते करा. नाहीतर मरा,” असे सांगितले होते. त्यामुळे मी रस्तावर उतरलो, असे बाबा बलराम बोस सांगतात. आज त्यांचा हातात तिरंगा असलेला आणि अंगावर पाण्याचा मारा सहन करणारा व्हिडिओ सर्वाधिक शेअर झाला आहे. (Baba Balram Ghosh)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.