आजकाल बदललेल्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश जणांना पुरेशी झोप घेता येत नाही. व्यवस्थितीत खाणंपिणं होत नाही. नेहमीच कोणत्या ना कोणत्या समस्या उद्भवलेल्या असतात. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक रुपात ही होतो. त्यामुळे नेहमीच हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी. जेणेकरुन तुम्ही आरोग्या संबंधित समस्यांपासून दूर राहता. अशातच ज्योतिष शास्रानुसार तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्या पाहिजेत त्यामुळे समस्या दूर होतीलच पण आयुष्य आनंदीत ही जगता येईल. याच बद्दलच्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Astro remedies)
-रात्री झोपण्यापूर्वी घराच्या दक्षिण दिशेला पितरांच्या नावे राईच्या तेलाचा दिवा लावा. संपूर्ण रात्र दिवा पेटवून ठेवू शकत नाहीत तर त्या दिशेला बल्ब सुद्धा लावू शकता. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होईल आणि पितरांचे आशीर्वाद ही मिळतील. त्याचसोबत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या ही दूर होतील.
-जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक बालदी पाणी भरुन किचनमध्ये ठेवा. असे केल्याने हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि भाग्य ही सुधारेल. तसेच यावेळी लक्षात ठेवा की, किचनमध्ये दूधाचे भांडे उघडे ठेवू नका. ते नेहमीच बंद करुन ठेवा.
-रात्री झोपण्यापूर्वी कापूर बेडरुम आणि बाथरुमसह संपूर्ण घरात फिरवा. त्यासोबत पीतळेच्या भांड्यात पाणी भरुन डोक्याच्या येथे ठेवा. तेच पाणी सकाळी एखाद्या झाडाला टाका. असे केल्याने तुमच्या भाग्यात वाढ होईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल. तसेच पारिवारातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना कायम टिकून राहिल.
-झोपण्यापूर्वी आपला फोन बंद करुन ठेवा आणि मेडिटेशन करा. त्याचसोबत देवाचे नाव घेत रहा. (Astro remedies)
-बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी हिरव्या कपड्यात मुग डाळ बांधून उशीजवळ ठेवा. त्यानंतर ती सकाळी एखाद्या मुलीला दान करा. त्याचसोबत देवी दुर्गेला सुद्धा समर्पित करा. असे केल्याने व्यवसाय, उत्पन्न आणि भाग्यात वृद्धी होईलच. त्याचसोबत आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल.
-आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे या बद्दल विचार करुन झोपा. असे केल्याने तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि ते पूर्ण होण्याची शक्यता ही अधिक वाढली जाईल.
हेही वाचा- मृत्यूवेळी व्यक्तीला दिसतो लख्ख उजेड, वैज्ञानिकांनी सांगितले हैराण करणारे तथ्य
-नेहमीच लक्षात ठेवा रात्री झोपनाना तुमचे पाय दरवाज्याच्या दिशेला नसावेत. असे केल्याने आरोग्य आणि समृद्धीवर प्रभाव पडतो.