2020 साली जगभरात कोरोना नावाचा रोग झपाट्यानं पसरला. आधुनिकतेची आवरणं घातलेल्या जगाला एका झटक्यात या रोगानं शांत केलं. सर्वत्र लॉकडाऊन आणि रुग्णवाहिन्यांचे आवाज. दिवसागणिक मरणा-या माणसांचा वाढता आकडा. अत्यंत भीतीदायक अशा वातावरणात सुमारे दोन वर्ष तरी अवघं जग होतं. त्यानंतर कोविड-19 या महामारीवर लस काढण्यात आली, त्याद्वारे लाखो, करोडो लोकांचे जीव वाचले. या महामारीतून सावरलेलं जग आता झपाट्यानं पुढे जात आहे. मात्र आता पुन्हा नव्या रोगाची चाहूल लागली आहे. (Epidemic)
इंग्लडमधील वैद्यकीय तज्ञांनी जग एका नव्या महामारीच्या (Epidemic) उंबरठ्यावर असल्याचे भाकीत केले आहे. या महामारीला डिसीज एक्स असे नाव देण्यात आले आहे. याबाबत भीतीदायक असे की, हा नवीन विषाणू 1918-1920 च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा प्रभावी असणार आहे. त्यामुळे त्याचा वेग कोरोनापेक्षा किमान सातपट असेल. या रोगानं कोरोनापेक्षा कितीतरी अधिक मनुष्यहानी होणार आहे. कोरोनामुळे जगभरात 25 लाखाहून अधिक मृत्यू झाले होते. तर अनेकांचे आयुष्य कोरोना प्रतिबंधक औषधांमुळे कायम रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. याच कोरोनाला हरवण्यासाठी झालेला औषधांचा अतिरेकही नव्या रोगासाठी कारणीभूत ठरला असल्याचे तज्ञांचे मत आहे. असे असले तरी कोरोनापेक्षाही सातपट अधिक क्षमतेच्या रोगावर मात करण्यासाठी तयार रहावे असा इशारा आता जागतिक आरोग्य संघटनेनंही दिला आहे. त्यामुळेच या इशा-याचे गांभीर्य वाढले आहे. (Epidemic)
जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करणा-या लंडनच्या लस टास्कफोर्सचे अध्यक्ष डेम केट बिंघम यांनी या नव्या येऊ घातलेल्या रोगाबाबत माहिती दिली आहे. या महामारीमुळे किमान 50 दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा गंभीर इशाराही डेम यांनी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुळात कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी एकमेकांचा संपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच स्वच्छताही महत्त्वाची होती. मात्र या नव्या महामारीमध्ये (Epidemic) रोग कसा आणि कुठून पसरेल याचा निष्कर्षही काढता येणार नाही. एकदा रोग झाला की, त्या माणसाला साधा स्पर्श केला तरी दुस-या व्यक्तीला रोग होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या पसरण्याचा वेगही कोरोनापेक्षा कितीतरी अधिक आहे. यापेक्षा अधिक धोकादायक म्हणजे, वैद्यकीय शास्त्रज्ञ भविष्यात घातकी ठरु शकतील अशा 25 विषाणू कुटुंबांचे निरीक्षण करीत आहेत. त्यापैकी प्रत्येकामध्ये हजारो वैयक्तिक व्हायरस आहेत. यातील कोणताही विषाणू गंभीर महामारीमध्ये बदलू शकतो, हेच सर्वात भयंकर असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. (Epidemic)
याबाबत इशारा दिल्यावर लंडनमध्ये शास्त्रज्ञांनी एक्स रोग टाळण्यासाठी लस तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. विल्टशायर येथील प्रयोगशाळेत या नव्या रोगाच्या लसीसाठी 200 हून अधिक शास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. त्यावरुनच या रोगाची चाहूलच किती भयंकर असू शकते, याची कल्पना येऊ शकते. एक्स नावाचा हा नवा विषाणू बर्ड फ्लू, मंकीपॉक्स आणि हंताव्हायरसचा यांच्या सर्व गुणधर्मांना सोबत घेऊन येणारा असेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळेच त्यात प्राणहानीचे प्रमाण अधिक असल्याचा धोका आहे. (Epidemic)
===========
हे देखील वाचा : ‘या’ बाप्पाची पूजा केली की पडतो पाऊस…
===========
इंग्लडमधील शास्त्रज्ञांपाठोपाठ चीनमधील शास्त्रज्ञही नव्या विषाणूंसाठी लस बनवण्याच्या कामगिरीवर व्यस्त झाले आहेत. जगात कोरोनासारखी आणखी एक भयानक महामारी येणार आहे. ही साथ रोखण्यासाठी तयारी सुरु झाल्याचे, वुहान लॅबचे शास्त्रज्ञ शी झेंगली यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार नवी विषाणूची लाट ही माणसाबरोबर प्राण्यांसाठीही घातक ठरणार आहे. वटवाघुळ, उंदीर, मांजर, डुक्कर, कुत्रा यापासून हा रोग पसरण्याचा धोका अधिक राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एक्स नावाच्या या रोगामुळे किमान पाच कोटी माणसांचा मृत्यू होण्याची भीती आहे. तसेच अशाच प्रमाणात प्राण्यांचाही मृत्यू होऊ शकतो. (Epidemic)
सध्या या एक्सवर लंडन आणि चीनमधील शास्त्रज्ञ अधिक संशोधनही करीत आहेत. लंडनमध्ये अनेक वर्षापूर्वी आलेल्या साथीला कारणीभूत ठरलेल्या विषाणूंचाही आता अभ्यास करण्यात येत आहे. शास्त्रज्ञांच्या मते कुठलाही नवा विषाणू हा जुन्या विषाणूच्या संपर्कातूनच तयार होतो. त्यामुळे जुन्हा विषाणूंचा अभ्यास केल्यास या नव्या घातकी विषाणूवर लस बनवण्यासाठी फायदा होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
सई बने