Home » समुद्राखाली जाणार अमेरिका

समुद्राखाली जाणार अमेरिका

by Team Gajawaja
0 comment
america
Share

गेल्या वर्षी ‘अमेरिका इज सिंकींग’ नावाचा एक हॉलिवूडपट आला होता. त्यात वातावरणातील बदलामुळे हिमनद्या वितळतात हे दाखवण्यात आले आहे. याचा सर्वात पहिला फटका बसतो, तो सुपरकॉप असलेल्या अमेरिकेला (America) . अमेरिकेमध्ये अतिप्रचंड पूर येतो. पाण्याचा एवढा मोठा प्रवाह येतो, त्यासोबत भुकंप आणि त्सुनामीही येतात. त्यामुळे उत्तर अमेरिका (America) पाण्याखाली जाते. या चित्रपटाची कथा ही काल्पनिक असली तरी भविष्यात अमेरिकेतील प्रणुख शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका एका प्रसिद्ध मासिकात वर्तवण्यात आला आहे.

एवढच नव्हे तर या धोकायदायक स्थितीची सुरुवात झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसून आर्टांटिकामधील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या वीस वर्षात येथील बर्फाची घनता कमी होणार आहे. त्यामुळे पुढच्या पंचवीस वर्षात अमेरिकेतील (America) प्रमुख शहरांना समुद्र गिळंकृत करेल असा इशाराच देण्यात आला आहे.

यामुळे अमेरिकेतील (America)  हवामान तज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेची सध्याची समुद्रकिना-यावरील शहरे पाण्याखाली जात असल्याचा अहवाल तेथील अभ्यासकांना प्रसिद्ध केला होता. मात्र आता या प्रमाणात वाढ होणार असल्यामुळे 2050 या वर्षाच्या आसपास अमेरिकेला (America) वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर रहाणार आहे.

नेचर जर्नल या मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या लेखानं अमेरिकेतील नागरिक धास्तावले आहेत. यानुसार अमेरिकेच्या किनारपट्टीवरील समुद्राची पातळी 2050 पर्यंत 0.25 – 0.30 मीटर पर्यंत वाढणार आहे. यामुळे अमेरिकेच्या(America)  प्रमुख शहरांमध्ये पूर येणार असून किनाऱ्यावरील भूभाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत अमेरिकेतील बहुतांशी शहरे समुद्रामध्ये जाणार आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे, कारण अमेरिकेमधील (America) 32 पैकी 24 किनारी शहरे प्रतिवर्षी 2 मिलिमीटरपेक्षा जास्त बुडत असल्याची माहिती पुढे आली आहे. हा वेग वाढला तर त्यापैकी निम्म्या शहरांचे पुढच्या काही वर्षात अस्तित्व पुसले जाणार आहे.

या शहरांमध्ये अमेरिकेचे (America)  प्रमुख शहर असलेल्या न्यूयॉर्कचा समावेश आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका या शहरला पहिल्यांदा बसणार आहे, आणि तोही मोठ्याप्रमाणात बसणार आहे. हिमनद्या वितळून जे पाणी होणार आहे, ते समुद्राला मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील समुद्रकिना-यावर असलेली शहरे धोक्यात आली आहेत. यामध्ये भारतातीलही काही शहरांचा समावेश आहे. मात्र या सर्वात अमेरिकेला (America) सर्वाधिक नुकसानला तोंड द्यावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षापासून हिमनद्यांच्या वितळण्याचा धोका अमेरिकेला (America)  बसू शकतो, अशी माहिती पुढे आल्यावर अमेरिकेतील हवामान तज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनं समुद्रकिना-यावरील सर्व शहरांचा अभ्यास केला आहे. किनारपट्टीवरील शहरांच्या नवीन विश्लेषणातून स्पष्ट झाले की, अमेरिकेतील (America) किमान 24 किनारी शहरांना 2050 च्या आसापास मोठ्या पुराचा धोका आहे.

हा पुर एवढा भयानक असेल की, त्यामुळे संपूर्ण शहरच पाण्याखाली जाण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. या शहरांमध्ये बोस्टन, न्यूयॉर्क सिटी, जर्सी सिटी, अटलांटिक सिटी, व्हर्जिनिया बीच, विल्मिंग्टन, मर्टल बीच, चार्ल्सटन, सवाना, जॅक्सनविले, मियामी, नेपल्स, मोबाइल, बिलोक्सी, न्यू ऑर्लीन्स, स्लाईडल, लेक चार्ल्स, पोर्ट आर्थर, टेक्सास सिटी यांचा समावेश आहे.

=========

हे देखील पहा : जगातील श्रीमंत महिलांमध्ये ‘या’ भारतीय लेडीचाही समावेश

=========

ही घटना मानवी जीनवास हानीकारक ठरणार आहे. यामुळे तब्बल 500,000 लोक बाधित होऊ शकतात. तर 94,000 ते 2,88,000 हून अधिक मालमत्तांचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेसाठी (America) ही दिर्घकालीन समस्या ठरणार आहे. अमेरिकेतील प्रमुख शहरे आणि त्याकाठावर असलेली शहरे पुन्हा उभी राहू शकरणार नाहीत. परिणामी अमेरिकेचा बराचसा भुभाग हा समुद्राखाली जाणार आहे. यासंदर्भात आत्तापासूनच काही संरक्षक उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे.

यासंदर्भात भारताच्या पंजाबमधील इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या संशोधकांनी अमेरिकेच्या (America) किनारपट्टीवर बुडणाऱ्या जमिनीचे उच्च-रिझोल्यूशन चित्रण तयार केले आहे. अशाप्रकारचे हे जगातील पहिलेच चित्रण असल्याचा दावा या संस्थेनं केला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार भर समुद्रात ज्याप्रमाणे हलान बोट फुटल्यास ती थेट समुद्राच्या तळाला जाते. तशीच अमेरिकेची शहरे ही समुद्राच्या तळाला जाणार आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.