अमरसिंग चमकीला नावाचा चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि हे अमरसिंग चमकीला (Amar Singh Chamkila) कोण याची चर्चा सुरु झाली. पंजाबचा या तरुण गायकाचा प्रसिद्धीचा ग्राफ जेव्हा उंचावर होता तेव्हाच त्याची त्याच्या पत्नीसह गोळ्या मारुन हत्या करण्यात आली.
तेव्हा हा अमरसिंग अवघा २७ वर्षाचा होता. ८ मार्च १९८८ रोजी हे हत्याकांड झाले. आज चमकीलाची हत्या होऊन ३७ वर्ष होऊन गेले तरी त्याच्या हत्येचे गूढ अद्यापही उकलले गेले नाही. यासोबत चमकीलाच्य़ा गाण्याची क्रेझही पंजाबमधून उतरली नाही. नेमका हा चमकीला कोण आणि त्याची गाणी कशी होती, हे आता नव्यानं जाणून घेण्यात येत आहे. अमर सिंग चमकीला (Amar Singh Chamkila) पंजाबचा पहिला विक्रमी गायक होता. पण त्याची गाणी अश्लिल असल्याची टिकाही झाली, यातूनच त्याची हत्या झाली. अत्यंत गरीबीतून पुढे आलेल्या या गायकानं २७ वर्षापर्यंत पंजाबसह परदेशातही आपल्या गाण्यांचे कार्यक्रम केले. त्याच्या जीवनावर आलेल्या चित्रपटानं चमकीला नेमका कोण हे जाणण्याचा प्रयत्न आता चालू झाला आहे.
अमरसिंह चमकीला (Amar Singh Chamkila) हा पंजाबचा पहिला रॉकस्टार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमर सिंग चमकीलाचे आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा वेगळे नव्हते, अर्थात त्याचा अंतही एखाद्या चित्रपटासारखाच झाला आहे. अमर सिंग चमकीलाच्या गाण्यानं किंबहुना त्याच्या आवाजानं वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी रसिकांची मने जिंकली. अमरसिंग हे लोकगायक होते. अमरसिंग यांचा जन्म २१ जुलै १९६० रोजी पंजाबमधील लुधियानाजवळील डुगरी गावात झाला. त्यांचे मुळ नाव धनीराम.
दलित कुटुंबात जन्म झालेले धनी राम सुरुवातीला मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असत. त्यांना संगिताची नैसर्गिक आवड होती. हाताला मिळतील ती वाद्य त्यांनी स्वतः शिकून घेतली होती. १९७९ मध्ये सुरिंदर शिंदा या गायकाकडे अमरसिंग गेले. तेव्हा ते १८ वर्षाचे होते. येथेच त्यांना अमरसिंग चमकीला हे नाव मिळाले. या सुरिंदर शिंदा यांच्यासाठी त्यांनी गाणी लिहिली आणि कंपोजही केली. या पथकात काम करुन त्यांना अनुभव मिळाला. पुढे त्यांनी स्वतःचे गाण्याचे पथक तयार केले. अमरजोत नावाची महिला गायक या पथकात होती. अमरसिंग यांनी अमरजोतबरोबर लग्न केले. ही जोडी सुपरहिट होती. त्यांचे अनेक अल्बम बाजारात आले आणि हातोहात संपले.
अमरसिंग यांच्या गाण्यांचे यश त्यांच्या दुहेरी अर्थामध्ये आहे, अशी ओरड सुरु झाली होती. अमरसिंग हे स्वतः गाणी लिहित असत. या गाण्यांमध्ये विवाहबाह्य संबंध, दारू आणि अंमली पदार्थांच्या वापरावर भाष्य करण्यात आले होते. अमरसिंग आणि अमरजोत यांच्या गाण्यांची शैली वेगळी होती. त्यांनी गायला सुरुवात केली की काही क्षणातच संपूर्ण श्रोतेच त्यांच्यात तल्लनी होऊन जायचे. या जोडप्याचे आकर्षण केवळ पंजाबमध्येच नाही तर परदेशातील पंजाबी लोकांमध्ये होते. साधा गावातला युवक परदेशी दौरे करु लागला. चमकीला यांच्या गाण्यांना एवढी मागणी होती की त्यांचा लग्नात शो नसेल तर लग्न रद्द होत असे. जेव्हा चमकीला यांच्या शो ची तारीख मिळायची तेव्हाच लग्ल लावले जायचे. चमकीला यांनी एका वर्षात ३६६ शो केल्याची नोंद आहे, यावरुनच त्यांची प्रसिद्धी किती होती, याचा प्रत्यय येतो. (Amar Singh Chamkila)
मात्र चमकीला यांची प्रसिद्धी जशी सुरु झाली, तशीच एकीकडे त्यांच्यावर टिका होत होती. त्यांची गाणी अश्लिल असून त्यामुळे तरुणांवर परिणाम होत असल्याची ओरड सुरु झाली होती. यातून चमकीला यांना मारण्याच्या धमक्याही मिळायला लागल्या. ८ मार्च १९८८ रोजी दुपारी २ च्या सुमारास, पंजाबमधील मेहसमपूर येथे आंदोलन करण्यासाठी आलेल्या चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत या दोघांना जाहीरपणे गोळ्या घालण्यात आल्या. मोटारसायकलवरुन हत्यारे आले आणि गोळीबार करुन निघूनही गेले. यावेळी तेथे हजारोंनी माणसं होती. पण कोणीही हल्लेखोरांना पकडले नाही की साधे पाहिलेही नाही. या प्रकरणाचा तपासही झाला की नाही, हेही कोडच ठरलं. कारण या हत्यांप्रकरणी कोणाला साधी अटकही झाली नाही. आज ३७ वर्षानंतरही चमकीला यांना कोणी आणि का मारले, हे एक कोडेच आहे. (Amar Singh Chamkila)
============
हे देखील वाचा : दुबईचा पाऊस की रईसीची हौस…
============
चमकीला यांची हत्या झाली तेव्हा त्यांचे वय अवघे २७ वर्ष होते. अमरसिंग, अमरजोत यांच्यासह त्यांच्या पथकातील अन्य दोन गायकांचाही यावेळी हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा आरोप कधी खलिस्तानवादी अतिरेक्यांवर लावण्यात आला तर कधी अमरसिंग यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर लावण्यात आला. आता या सर्वांवरच प्रकाश टाकणारा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘चमकिला‘ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे.
सई बने…