Home » आता अजमेर शरीफ दर्गा

आता अजमेर शरीफ दर्गा

by Team Gajawaja
0 comment
Ajmer Sharif Dargah
Share

उत्तरप्रदेशच्या संभळ येथील जामा मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशाने होत असलेल्या सर्वेक्षणादरम्यान बाहेर झालेल्या हिंसाचाराबाबत अजूनही बातम्या येत आहेत. त्यातच उत्तरप्रदेशमधील ज्ञानवापीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. अशाचवेळी राजस्थानमध्येही आता अशाच प्रकारे सर्वेक्षण कऱण्यात येणार आहे. राजस्थानच्या अजमेरच्या जगप्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याबाबत सर्वेक्षण करण्याची याचिका कनिष्ठ न्यायालयाने स्विकारली आहे. अजमेर शरीफ दर्गाला शिवमंदिर घोषित करणारी ही याचिका हिंदू सेनेतर्फे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार असून आहे. या दर्ग्याच्या जागी शिवमंदिर होते, ते तोडून दर्गा बांधल्यासंदर्भात ही याचिका आहे. (Ajmer Sharif Dargah)

दर्ग्याच्या दरवाजात आजही हिंदू धर्मासंबंधी खुणा असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या अजमेरच्या दर्गा शरीफच्या सर्वेक्षणाबाबतची याचिका कनिष्ठ न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने नोटीस बजावून दोन्ही पक्षांकडून उत्तर मागितले आहे. हिंदू बाजूने दाखल केलेल्या याचिकेत दर्गा शरीफमध्ये शिवमंदिर असल्याचा दावा आहे. यासंदर्भात दर्गा शरीफच्या बाजुने कोणतेही विधान आत्तापर्यंत आलेले नाही. उत्तरप्रदेशच्या संभळमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणानंतर झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण अद्याप थंडावले नसतांना अजमेर शरीफ बाबतही सर्वेक्षणाचा निर्णय आल्यामुळे त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका मान्य केली असून याचिकेत अजमेर शरीफ दर्गाचे वर्णन हिंदू मंदिर असे करण्यात आले आहे. (Social News)

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दर्ग्याशी संबंधित मुद्दे उपस्थित करून कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी केली होती. न्यायालयाने याचिका स्वीकारल्यानंतर या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. याबाबत 20 डिसेंबर रोजी होणा-या पुढील सुनावणीत दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकला जाणार आहे. तसेच संबंधित प्रकरणी कागदपत्रे दाखल करण्यात येणार आहेत. विष्णू गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेत पुरावा म्हणून एक विशेष पुस्तक सादर करण्यात आले आहे. या पुस्तकाचा हवाला देत दर्ग्यात आधी हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे पुस्तक 1911 मध्ये अजमेरचे रहिवासी हर विलास शारदा यांनी लिहिले आहे. या पुस्तकानुसार पूर्वी दर्ग्याच्या जमिनीवर भगवान शंकराचे भव्य मंदिर होते. या शिवमंदिरात पूजा आणि जलाभिषेक होत असे. दर्गा संकुलात असलेल्या 75 फूट उंच बुलंद दरवाजाच्या बांधकामात मंदिराच्या बांधकामातील काही वस्तू वापल्यात आल्या आहेत. त्याच्या खुणा अद्यापही आहेत. याशिवाय दर्ग्याच्या तळघरात गर्भगृह आहे. (Ajmer Sharif Dargah)

=====

हे देखील वाचा :  हिंदूसाठी लढणा-या चिन्मय दास यांना अटक !

========

त्यातही भगवान शंकराच्या मंदिराचे अस्तित्व आहे, असा वस्तू असल्याचा उल्लेख आहे. याचिकेत ज्या हर विलास शारदा यांच्या पुस्तकाचा दाखला देण्यात आला आहे त्या पुस्तकाचे नाव अजमेर हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह अँड हिस्ट्री ऑफ सुफीझम इन इंडिया असे आहे. हरविलास शारदा हे न्यायाधीश होते आणि त्यांनी 1911 मध्ये अजमेर: ऐतिहासिक आणि वर्णनात्मक पुस्तक लिहिले. याशिवाय गर्भगृह आणि परिसरात जैन मंदिर असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले आहे. यापूर्वीही अजमेर दर्ग्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अशोक गेहलोत यांच्याकडून करण्यात आली होती. दर्ग्याच्या खिडकीवर स्वस्तिकाच्या खुणा आढळून आल्याचे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र यावर कुठलीही चौकशी तत्कालीन सरकारनं केली नाही. आता यासंदर्भात थेट न्यायालयात लढाई सुरु झाली आहे. अजमेर शरीफ दर्ग्याची लोकप्रियता भारतासोबत परदेशातही आहे. या दर्ग्याला अकबराने भव्य अशी कढई दिली असून ती अद्यापही वापरात आहे. सम्राट अकबराने ख्वाजासाहेबांना पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली होती. सलीमच्या रूपाने त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर अकबर आग्रा ते अजमेर दर्ग्यापर्यंत चालत गेला. त्याला 15 दिवस लागल्याची माहिती आहे. त्यावेळी अकबराने अजमेर शरीफ दर्ग्याला कढई भेट दिली. या कढईत एकाचवेळी 45 क्विंटल अन्न शिजवले जाऊ शकते. दर्ग्याला भेट देणा-यांमध्ये या कढईबाबतही मोठी उत्सुकता असते. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.