केंद्र सरकारने वाहनांमध्ये ६ एअर बॅग (Air Bags) असणे अनिवार्य असल्याच्या प्रस्तावाला एका वर्ष स्थगिती दिली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,६ एअर बॅह अनिवार्य असल्याचा प्रस्ताव १ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत टाळला आहे. तर केंद्र सरकार प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता ८ सीटर वाहनात १ ऑक्टोंबर पासून ६ एअर बॅग अनिवार्य करण्याच्या योजनेवर काम करत आहे. आता एका वर्षानंतर हा नियम लागू होणार आहे.
परंतु वाहनात एअर बॅगच्या नियमांसह लोकांच्या मनात त्याबद्दल विविध प्रश्न उपस्थितीत राहतात. जसे की, एअर बॅग लावण्यासाठी किती खर्च येते किंवा जुन्या वाहनांचे काय होईल. याच दरम्यान लोकांना हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे की, अखर एअर बॅगसची सिस्टिम काय असते, कोणत्या कारणामुळे सरकार ते अनिवार्य करण्यासाठी जोर देत आहे. या सर्वाबद्दल अधिक जाणून घेऊयात.
एअर बॅग म्हणजे काय?
खरंतर ती कापडापासून बनवली जाते आणि त्याला सिलिकॉनची कोटिंग केली जाते. यामध्ये सोडियम एजाइड गॅस भरलेला असतो. एअर बॅग गाडीच्या पुढील बाजूस डॅशबोर्डच्या येथे लावण्यात आलेली असते. जशी कार वेगाने धडक देते किंवा वाहनावरील ताबा सुटतो तेव्हा एअर बॅग आपोआप उघडल्या जातात आणि प्रवाशासमोर एका फुग्यासारख्या त्या फुलतात. यामुळे अपघात झाला तरी प्रवाशाला नुकसान होत नाही. एअर बॅगच्या कारणामुळे सीटवर आपण नीट राहतो. असे मानले जाते की, एअर बॅगमुळे तुमच्या वाहनाचा मोठा अपघात जरी झाला तरी तुमचा मृत्युचा धोका कमी होतो.
कसे काम करते?
आता प्रश्न उपस्थितीत राहतो की, अखेर बॅग मध्ये असे काय असते जी धडक दिल्यानंतर उघडली जाते. खरंतर एअर बॅगचे एक सिस्टिम असते. त्यामध्ये काही सेंसरचा समावेश असतो. हे सेंसर कारच्या बोनटच्या जवळ असते. जसा अपघात होतो तेव्हा हे सेंसर एअरबॅग अॅक्टिव्हेट करतात. त्यामुळेच त्या बाहेर येतात आणि हे काम फार वेगाने होते. असे सांगितले जाते की, एअर बॅगची (Air Bags) स्पीड ३०० किमी प्रति तासापर्यंत असते.
हे देखील वाचा- अशा ३ खास व्यक्ती ज्या जगभरात पासपोर्टशिवाय प्रवास करु शकतात
कशी उघडते?
खरंतर एअर बॅगमध्ये एक सोडियम एजाइड गॅसचा सिलिंडर असतो. तो सॉलि़ कॅमिकलच्या फॉर्ममध्ये असतो आणि त्याची खासियत अशी की, जर त्याला वेगाने गरम केल्यास तो गॅसमध्ये रुपांतर होतो. हलक्या स्वरुपात सोडियम एजाइड गॅसा नाइट्रोजन गॅस बनतो. सेंसरमुळे गॅस सिलिंडर पर्यंत तारेच्या माध्यमातून जोडलेला असतो. जेव्हा कारचा अपघात होतो तेव्हा तो सिलिंडर पर्यंत इलेक्ट्रिक करंट पुरवतो आणि यामुळे सॉलिड केमिकल गॅस तयार होतो व एअर बॅग या फुलतात. या सर्व प्रक्रियेसाठी मायक्रोसेकंद लागतात.
कुठे लावण्यात आलेल्या असतात?
एअर बॅग प्रत्येक प्रवाशाच्या सीटच्या येथे लावलेल्या असतात. जी ड्रायव्हरची सीट असते त्याची एअरबॅग स्टेयरिंग मध्ये असते. तर बाजूच्या सीटवर एअरबॅग पुढील डॅशबोर्डवर लावण्यात आलेली असते.