Acne vs Pimples : चेहऱ्यावर दाणे येणे ही समस्या जवळजवळ प्रत्येकाला कधीतरी भेडसावते. पण दाणे दिसताच प्रत्येकजण त्यांना पिंपल म्हणतो, तर काही जण *एक्ने* समजतात. मात्र त्वचारोग तज्ज्ञांच्या मते हे दोघे एकसारखे नाहीत. नावात साम्य असलं तरी एक्ने आणि पिंपल हे दोन वेगवेगळे स्किन कंडिशन्स आहेत आणि त्यांचे कारणही वेगळे असते. एवढेच नाही तर उपचार पद्धतीही बदलतात. त्यामुळे या फरकाची योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे.(Acne vs Pimples)
एक्ने म्हणजे काय? (What is Acne) एक्ने ही चेहऱ्यावरील तेल ग्रंथी (Sebaceous Glands) आणि पोर्स ब्लॉक होण्यामुळे निर्माण होणारी स्किन कंडिशन आहे. त्वचेवर जास्त प्रमाणात ऑईल तयार झाल्यास, मृत त्वचा आणि धुळीबरोबर मिसळून पोर्स पूर्णपणे ब्लॉक होतात. यामध्ये त्वचेवर व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स, सिस्ट, नोड्यूल्स, दाणे होऊ शकतात.एक्ने दीर्घकाळ टिकते, पुन्हा येते आणि कधी-कधी त्वचेवर डाग व खड्डेही निर्माण करते. म्हणून एक्ने ही केवळ काही दिवसांची समस्या नसून एक स्किन डिसऑर्डर मानली जाते. (Acne vs Pimples)

Acne vs Pimples
पिंपल म्हणजे काय? (What is Pimple) पिंपल हा एक्नेचा एक भाग आहे. त्वचेवर एक-दोन दाणे किंवा सूजलेला छोटासा लाल दाणा दिसला तर त्याला साधारणत पिंपल म्हणतात.पिंपल एकवेळचा दाणा असतो आणि योग्य काळजी घेतल्यास काही दिवसांत बरा होतो. पिंपल येण्याचे प्रमुख कारण म्हणजे घाम, धूळ, जास्त ऑयली फूड, हार्मोनल बदल किंवा स्वच्छतेची कमतरता. (Acne vs Pimples)
फरक समजून घ्या (Major Difference)
Acne | Pimple
स्वरूप स्किन कंडिशन दाणा सूज
कालावधी दीर्घकाळ राहते काही दिवसांत जाते
संख्या अनेक दाणे, ब्लॅकहेड्स, सिस्ट 1 ते 2 दाणे
परिणाम डाग व खड्डे पडू शकतात क्वचित डाग
उपचार विशेष स्किन ट्रीटमेंट आवश्यक घरगुती/साधी काळजी पुरेशी
=========================
हे देखिल वाचा :
Oily Food : ऑयली फूड खाल्ल्याने खरोखर पिंपल्स वाढतात का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
Skin Care : स्किनकेअर रूटीन करूनही मिळत नाही रिजल्ट? या चुका ठरतायत मोठी कारणं!
==========================
उपचार आणि काळजी कशी घ्यावी? एक्ने आणि पिंपलचे उपचार वेगळे असतात. एक्ने साठी औषधं, स्किन ट्रीटमेंट, रेटिनॉइड्स, केमिकल पीलिंग उपयोगी.
पिंपल साठी टी ट्री ऑईल, बर्फ लावणे, नॉन-ऑयली प्रॉडक्ट्स आणि हेल्दी डाएट पुरेसे. दाणे फोडणे किंवा खाजवणे टाळा, अन्यथा डाग होतात. भरपूर पाणी प्या आणि चेहरा दिवसातून 2 वेळा स्वच्छ धुवा. तेलकट, जंक फूड आणि साखर कमी करा.त्वचारोग तज्ज्ञांच्या मते प्रत्येक पिंपल एक्ने नसतो, पण प्रत्येक एक्नेची सुरुवात पिंपलपासूनच होते.म्हणून जर दाणे वारंवार येत असतील आणि महिन्योनमहिने बरे होत नसतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण लवकर उपचार सुरू केले तर डाग व खड्डे होण्यापासून बचाव होतो. (Acne vs Pimples)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
