आपण वेळोवेळी सर्वधर्म समभाव असे बोलताना कित्येकांच्या तोंडून ऐकतो, त्याचे बहुतांश लोक पालन ही करतात. पण मात्र जेव्हा समलैंगिकतेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा त्यांच्याबद्दल बोलायला किंवा त्यांचे नाते स्विकार करण्यासाठी अद्याप ही लोक पेचात पडतात. आता तर समलैंगिकतेच्या संदर्भातील कायद्याला ही मान्यता दिली गेली आहे. तरीही समाजात समलैंगिकतेच्या नात्याला एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. कित्येक जण अशी ही आहेत त्यांना आपण समलैंगिकतेच्या नात्यात आहोत ते पटवून देण्यासाठी झगडावे लागते. आता काहीही असो अखेर कायद्यानेच जर समलैंगिकतेच्या नात्याला मान्यता दिली आहे तर आपण त्याचा आदर केला पाहिजे. त्यांच्या नात्याला स्विकारले पाहिजे. म्हणूनच जूनचा संपूर्ण महिना हा खास समलैंगिक नात्यात असलेल्या लोकांसाठी साजरा केला जातो. त्यालाच ‘प्राइड मंथ’ (Pride Month) असे म्हटले जाते.
काही वर्षांपूर्वी एलजीबीटीक्यू कम्युनिटीचे अस्तित्व हे मर्यादित होते. तर प्राइड मंथ साजरा होण्यापूर्वी २८ जून १९६९ मध्ये अमेरिकेतील मॅनहट्टन येथील स्टोनवॉल येथे छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी गे समुदायातील लोकांद्वारे सातत्याने केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या विरोधात करण्यात आली होती. परंतु या प्रकारानंतर अन्य गे आणि लेस्बियन समुदायाने पोलिसांच्या हिंसक कारवाईला सडेतोड उत्तर दिले. ऐवढेच नव्हे तर दंगली सुद्धा यावरुन उसळल्या गेल्या. ही गोष्ट जेव्हा जगभरात पसरली तेव्हा ठिकठिकणाच्या एलजीबीटीक्यू+ समुदायाकडून त्यांच्या शहरात आंदोलने केली. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच एलजीबीटीक्यू समुदायाने आपली पहिली प्राइड परेड ही न्यूयॉर्कमध्ये आयोजित केली.

मात्र आजच्या जगात LGBTQ+ कम्युनिटी सर्वांनाच माहिती झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता चौकटीच्या बाहेर जाऊन पाहिले जात आहे. आपण या कम्युनिटीचे आहोत म्हणून लाज बाळगण्याची काही गरज नाही उलट गर्व केला पाहिजे. प्राइड मंथची सुरुवात वर्ष १९९९-२००० मध्ये अमेरिकेतील प्रेसिडेंट बिल क्लिंटन यांनी जून महिना हा LGBTQ+ प्राइड मंथ म्हणून घोषित केला. तेव्हापासूनच ते आतापर्यंत प्राइड मंथ साजरा केला जातो. अमेरिकेतून सुरु झालेला प्राइड मंथ (Pride month) आता जगातील विविध देशात साजरा केला जातो. फ्रांन्स, इंग्लंड, स्विर्त्झलँन्ड, भारतासह काही देशात प्राइड मंथला फार महत्व दिले जाते.
देशात विदेशात ही प्राइड मंथमध्ये एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या लोकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच रॅलीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या नात्यावर गर्व आहे असे ही नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला जातो. या व्यतिरिक्त आमच्या सारख्या लोकांना समाजाने स्विकार करावे यासाठी जनजागृती ही करण्यात येते. यामध्ये फक्त एलजीबीटीक्यू कम्युनिटीमधील लोकच नव्हे तर सामान्य लोक ही सहभागी होऊन त्यांच्या हक्कांसाठी लढू शकतात.

LGBTQIA+ चा अर्थ असा होते की, लेस्बियन, गे, ट्रांन्सजेंडर, क्विर, इंटरसेक्स, एक्सेक्शुअल, प्लस अन्य लिंग आणि सेक्शुआलिटी म्हणजे लोक त्यांना त्यांच्या लिंगानुसार ओळखू शकतात. परदेशात समलैंगिक संबंधांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात असले तरीही भारतात अद्याप काहींना आपले संबध लपवून ठेवावे लागतात. कोणीही उघडपणे बोलण्यास तयार होत नाही.
भारतात पहिली प्राइड परेड ही कोलकाता येथे २ जुलै १९९० रोजी काढण्यात आली होती. तेव्हा मुंबई आणि बंगळुरुसह शहरातील १५ तरुणांनी यामध्ये सहभागी होत त्यांच्या कम्युनिटीची ओखळ पटवून देणारे टी-शर्ट घालून फ्रेंडशिप मार्च काढली होती. त्यानंतर ६ मार्च २०१८ मध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टाने त्यांच्या समलैंगिक संबंधांना गुन्हा नसल्याचे जाहीर केले होते. कोर्टाच्या या निर्णयानंतर एलजीबीटीक्यू कम्युनिटीने आनंद व्यक्त केला होता.
हे देखील वाचा- Women’s Day special – वुमेन ऑफ द ईयर…जहरा जोया (zahra joya)
माझा ही एक मित्र या कम्युनिटीतील आहे. त्याने ही याच संदर्भातील एक लेख लिहिला होता. त्या लेखात त्याने सुरुवातीला आपण या कम्युनिटीतील आहोत हे घरी कसे सांगायचे याबद्दल सविस्तर लिहिले होते. त्यानंतर घरातील मंडळींना त्याच्याबद्दल कळल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि त्याचा त्रास कशा पद्धतीने स्वत: ला झाला यावर ही तो बोलला आहे. अनेक दिवस-रात्र घरातल्या मंडळींनी एक शब्दही माझ्यासाठी तोंडून काढला नसेल त्यामुळे आलेले दडपण आणि होणारी वेदना ही असह्य करणारी होती. हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि अखेर घरातील मंडळींनी त्याला त्याच्या कलेने घेत स्विकार केले आहे. त्यामुळे एलजीबीटीक्यू कम्युनिटीत आपल्या घरातील एखादा सदस्य असेल तर त्याच्याकडे वाईट दृष्टिकोनातून पाहण्याची काहीच गरज नाही. उलट त्याचा अभिमान असला पाहिजे. आपण शरिराने जरी वेगळे असलो तरीही प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. तुमच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. एकमेकांच्या लिंगावरुन, जातीवरुन ताशेरे ओढण्यापेक्षा आपण आपल्या समजाचा, देशाचा, आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर कशी मात करु शकतो याचा विचार करा. अखेरीस हेच सांगेन की, आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्विकारायला विसरु नका.