अनेक दिवसांपासून जोडीदाराची वागणूक बदलली आहे का? तो तुमच्यापासून दूर जाऊ लागला आहे का? तो ऑफिसमध्ये किंवा बाहेर असताना तुमचे कॉल उचलत नाही का? तुमचा पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागला आहे का? तो तुमच्याशी नीट बोलत नाही किंवा एकत्र वेळ घालवत नाही का? त्याचा फोन सतत व्यस्त असतो का? ऑनलाइन असतानाही तो तुमच्या मेसेजला उत्तर देत नाही का? (Relationship Crisis)
जर तुम्हाला तुमच्या नात्यात या सर्व गोष्टी जाणवू लागल्या असतील आणि तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीतील बदल तुमच्या लक्षात येत असतील, तर तुमच्या नात्यात सर्वकाही ठीक नाही, असं समजा. कदाचित तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या नात्यात प्रवेश केला असेल. तुमच्या जोडीदाराला एकतर तुमच्यापासून दूर जायचे आहे किंवा नात्यात तुमची फसवणूक होत आहे. जोडीदाराच्या या वागण्यावरून नात्यात होणारी फसवणूक ओळखा. (Relationship Crisis)
जोडीदाराकडे तुमच्यासाठी वेळ नाही
नात्यात जोडप्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो. एकमेकांना भेटण्याची, बोलण्याची उत्सुकता असते. पण जर जोडीदाराकडे तुमच्यासाठी वेळ नसेल, जर तो नेहमी भेटीच्या नावाखाली बहाणा करू लागला, तर समजावे की त्याचा वेळ तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला तरी मिळतोय. तो आपला वेळ आता दुसऱ्याला देऊ लागला आहे.
गोष्टी लपवणे
जोडपे अनेकदा एकमेकांशी सर्व काही शेअर करतात. कदाचित कामामुळे त्याला तुमच्याशी बोलायला वेळ नसेल. पण जेव्हा तो भेटतो, तेव्हा त्याच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी खूप काही असते. पण जर तुमचा जोडीदार या नात्यात खूश नसेल किंवा तो नात्यात तुमची फसवणूक करत असेल, तर तो तुमच्याशी बोलणे टाळतो. तो तुमच्यापासून गोष्टी लपवू लागतो. तो तुमच्यापासून गोष्टी लपवण्यास किंवा खोटे बोलण्यास सुरुवात करतो.
जोडीदाराच्या वागण्यात बदल
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीबद्दल समजू लागतं. तो कशावर आनंदी असू शकतो, कशावर रागावू शकतो, त्याला तुमच्याबद्दल काय आवडते आणि काय नाही, हे तुम्हाला माहीत असतं. पण जर त्याच्या वागण्यात काही बदल होत असेल, तर समजून घ्या की काहीतरी चुकीचं घडतंय. (Relationship Crisis)
नात्यात एकटेपणा जाणवणे
रिलेशनशिपमध्ये असतानाही जर तुम्हाला एकटेपणा जाणवू लागला, तर तुम्ही समजून घ्या की या नात्यातील जोडीदाराची आवड संपुष्टात येऊ लागली आहे. त्याला तुमच्यासोबत राहायचे नाही. तुमचा जोडीदार तुमच्या भावनांना महत्त्व देत नाही आणि तुमचा त्याच्या प्राधान्यक्रमात समावेश नाही.
======
हे देखील वाचा – शाहरुख खानने आजपासून राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात
======
भावनिक बंधन कमी होणे
जेव्हा नात्यात सर्व काही ठीक नसते, तेव्हा भावनिक ओढ कमी होऊ लागतो. जर तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करत असेल, तर त्याला तुमच्या शब्दांची आणि भावनांची पर्वा राहत नाही. तुमच्या वेदनांचा त्यांच्यावर होणारा परिणामही कमी होऊ लागतो.