आज १३ फेब्रुवारी २०२६ शुक्रवार आहे. आज विजया एकादशी असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. एकीकडे शुक्रवार लक्ष्मीची वार तर दुसरीकडे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील विजया एकादशी अर्थात विष्णू पूजा. त्यामुळे आज लक्ष्मी आणि विहसनु यांची सोबत पूजा केल्याने अनेक लाभ होणार आहे. आजचा हा खास दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊया.
मेष
आज देवी लक्ष्मीच्या रूपात नवीन पाहुण्यांचे आगमन तुमच्या घरात होणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक फायदा तर होईल सोबतच तुमच्या जोडीदाराचे प्रेम देखील मिळेल. आज कार्य पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आज रागावर नियंत्रण ठेऊनच राहा.
वृषभ
आज तुमच्या व्यवसायात चांगल्या ऑफर मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील मात्र आज धनाची देवाण-घेवाण दिवसभर असेल. धीर धरून तुम्हाला आज कामात प्रयत्न करावे लागतील. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल.
मिथुन
सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळू शकते. बेरोजगार लोकांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून आर्थिक तंगी सोसणाऱ्या लोकांना आज धनप्राप्ती होऊ शकते आणि आर्थिक अडचणी सूटू शकतात.
कर्क
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज रिकाम्या वेळेचा योग्य वापर करा. आज अनावश्यक खर्च टाळा. ज्या कामात तुम्ही मेहनत घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांती मिळेल.
सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. हातात घेतलेले काम वेळेच्या आत पूर्ण करणे फायदेशीर ठरणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या निमित्ताने आज प्रवास होण्याची शक्यता आहे.

कन्या
आज कोणालाही पैसे उधार देणे टाळामी कारण हे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. उत्तम गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. व्यावसायिक कामात तुम्हाला फायदा होऊ शकतो. शिवाय आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते.
तूळ
तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवू शकता. आज कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका अन्यथा याचे परिणाम वाईट होऊ शकतात. विचार पूर्वक निर्णय घ्या. घरात आनंदाचं वातावरण राहील.
वृश्चिक
आज अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमची असे काही घडेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. घरातील लोकांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल.
धनु
आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. नोकरी व्यवसायात मेहनत घेत रहा तुम्हाला यश अवश्य मिळेल. आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. कामातील तुमचा अनुभव एखाद्या महत्त्वाच्या ऑफिसच्या कामात उपयुक्त ठरू शकतो.
मकर
आज तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. अडकलेली कामे आज तुमची पूर्ण होतील. सामाजिक कार्यात निस्वार्थ भाव ठेवून दान करा.
कुंभ
वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. घरातील मोठ्या लोकांचा सल्ला ऐका.
मीन
आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. एखादी गोष्ट आज तुमची चिंता वाढवू शकते. तसेच मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. आज वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
