आपले सौंदर्य अधिकच खुलून यावे यासाठी सगळेच नानाविध उपाय करताना दिसतात. पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल करणे, मेकअप करणे शिवाय घरगुती उपाय करून सौंदर्यात भर घातली जाते. मात्र चेहऱ्याच्या सौंदर्यातील एक बाधा म्हणजे, चेहऱ्यावर असलेले अनावश्यक केस. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हे केस असतात. मात्र काहींच्या चेहऱ्यावर जास्त असतात तर काहींच्या कमी. हेच केस कायम चेहऱ्याचे सौंदर्य खराब करण्याचे काम करतात. यासाठीच फेशियल वॅक्स केले जाते. यामध्ये चेहऱ्यावरील नको असलेले केस काढले जातात आणि चेहरा एकदम मऊ केला जातो. (Beauty Tips)
अनेक महिला फेशियल वॅक्स न करता रेझरने हे केस काढतात. मात्र रेझरने केस काढणे धोकादायक ठरू शकते. याचे कारण म्हणजे यामुळे कधी कधी चेहरा कट होण्याची देखील शक्यता असते. तर फेशियल वॅक्स करताना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. तर काही हेअर रिमूव्हल क्रीमच्या उपायांमुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे त्वचेलाही नुकसान होते. यासाठीच चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी अनेक घरगुती उपाय देखील आहेत. या उपायांनी कोणत्याही त्रासाशिवाय आपण हे केस काढून टाकू शकतो. (Marathi)
मध आणि लिंबाचा रस
एका भांड्यात दोन चमचे मध घ्या आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला, आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यावर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने ओल्या टॉवेलने ती काढून टाका. लक्षात ठेवा की टॉवेल जास्त घासू नका. यानंतर तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवा. (Social Updates)
अंडी आणि कॉर्नस्टार्चचा वापर
अंड्यामधील पांढरा भाग आणि कॉर्नस्टार्च मास्कच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले केस काढू शकता. अंड्याचा पांढरा भाग त्वचेच्या मृत पेशी आणि चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी तर कॉर्नस्टार्च त्वचेला मऊ करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी कॉर्नस्टार्चमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळा.आपल्या त्वचेवर पेस्टचा एक समान थर लावा आणि गोलाकार हालचालींमध्ये मालिश करा. १५-२० मिनिटे राहू द्या आणि नंतर धुऊन टाका. (Todays Marathi Headline)

साखर आणि लिंबाचा रस
चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी दोन चमचे साखरेत लिंबाचा रस मिसळा आणि त्यात ८-९ टेबलस्पून पाणी घाला. आता हे मिश्रण गरम करा आणि नंतर थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर ही पेस्ट तुम्ही चेहर्यावर लावा. त्यानंतर ही पेस्ट चेहर्यावर २०-२५ मिनिटे अशीच राहू द्या. या मिश्रणाचा वापर तुम्ही तुमच्या हाताच्या एका भागावर करुन पाहा. (Marathi News)
तांदळाचा लेप
घरात असणाऱ्या तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने तुम्ही चेहऱ्यावरील नको असणारे केस काढू शकता. यासाठी तुम्ही तांदळ्याच्या पिठात गुलाब पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करु शकता. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यास मदत होईल. (Top Marathi News)
जिलेटिन आणि दूध
मिठाई घट्ट करण्यासाठी वापरण्यात येणारा जिलेटिन हा पदार्थ फेस मास्क करण्यासाठी वापरता येतो. यासाठी तीन मोठे चमचे दूध घ्यावे. त्यात एक चमचा अनफ्लेवर्ड जिलेटिन पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावेत. त्यानंतर हे मिश्रण १५ ते २० मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवावं. मग हे मिश्रण एकत्र करावं. त्यानंतर ते चेहऱ्यावर लावावं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते फार गरम नाही ना याची खात्री करा. काही मिनिटं चेहऱ्यावर लावलेलं मिश्रण कोरडं होऊ द्यावं आणि नंतर धुऊन टाकावे. (Latest Marathi News)
मसूर डाळ आणि संत्र्याची साल
मसूर डाळ आणि संत्र्याची साल हा देखील फेशियल हेअरवर सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी १०० ग्रॅम मसूर डाळ, ५० ग्रॅम चंदन पावडर आणि संत्र्यांच्या सालींची पावडर रात्रभर दुधात भिजत घालावी. मिश्रण घट्ट होण्यासाठी सर्व घटक एकत्र भिजवावेत. या पेस्टचा थर चेहऱ्यावर लावावा. १५ ते २० मिनिटांसाठी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्यावी. कोरड्या झालेल्या थरावर गोलाकार गतीने हळूहळू स्क्रब करावे आणि चेहरा धुऊन टाकावा. (Top Trending Headline)
=======
Health : जेवल्यानंतर किंवा उपाशीपोटी ढेकर का येतात?
=======
गव्हाचे पीठ, हळद आणि तूप
दोन चमचे गव्हाचे पीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडे तूप एका पेस्टमध्ये मिसळा. ते चेहऱ्यावर हळूवारपणे लावा. ही रेसिपी केवळ बारीक केस काढून टाकत नाही तर मृत त्वचेच्या पेशी देखील साफ करते. आठवड्यातून दोनदा वापरल्याने चांगले परिणाम मिळतात. (Top Stories)
बेसन आणि गुलाबपाणी
२ चमचे बेसन, २ चमचे गुलाबपाणी आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा, ते सुकू द्या आणि नंतर बोटांनी हळूवारपणे घासून काढा. आठवड्यातून चार वेळा वापरल्याने केसांची वाढ मंदावते. (Social News)
( टीप : या लेखात माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
