Home » Vasant Panchami : वसंत पंचमीला कामदेवाची पूजा का करतात?

Vasant Panchami : वसंत पंचमीला कामदेवाची पूजा का करतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vasant Panchami
Share

आज सर्वत्र वसंत पंचमीचा सण साजरा केला जात आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूतील माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी किंवा पंचमीला येणारा शुभ दिवस. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करण्यासोबतच सूर्य देवाची देखील पूजा केली जाते. वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. शिवाय वसंत पंचमी कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जाते. या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांची पूजा देखील केली जाते. वसंत पंचमीला कामदेव यांची पूजा करण्याचे कारण आणि महत्त्व जाणून घेऊया. (Vasant Panchami)

मान्यतेनुसार जर वसंत पंचमीच्या दिवशी पती-पत्नीने एकत्र कामदेव आणि रतीची उपासना केली तर त्यांचे नाते आणखी घट्ट होते. कामदेव बद्दल अशी पौराणिक मान्यता आहे की जर कामदेव नसेल तर जीवांमधील प्रेमाची भावना संपेल आणि जग पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून, वसंत ऋतूचा देव कामदेव मानला जातो. कामदेव आणि रती यांच्या आशीर्वादाने तुमचे प्रेम जीवन सुधारेल, नात्यात गोडवा वाढेल, प्रेम वाढेल. वसंत पंचमीला कामदेवाची पूजा कामदेवाला अनंग देखील म्हटलं जातं. भगवान शिवाने त्यांना वरदान दिले होते की ते भावरूपाने कायम राहतील. कामदेव प्रेम आणि कामवासना वाढवणारे आहेत. कामदेव आणि रती एकमेकांना पूरक आहेत. कामदेवाचं धनुष्य आणि बाण फुलांचे बनलेले आहेत. त्यांचे वार प्राणघातक नसतात, ते फुलांच्या बाणाने लोकांमध्ये प्रेम आणि कामभावना निर्माण करतात. अशी धारणा आहे की, वसंत पंचमीच्या दिवशी कामदेव पत्नी रतीसह पृथ्वीवर फिरतात. म्हणून आज वसंत पंचमीच्या दिवशी कामदेव आणि रतीची पूजा करावी. (Marathi News)

कामदेव आणि रतीच्या आगमनाने पृथ्वीवर प्रेम वाढते. कामदेवाच्या प्रभावामुळे पृथ्वीवरील या ऋतूतील सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेमाचा संचार होतो. त्यामुळे वसंत पंचमीला कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांची पूजा करण्याची परंपरा आहे. वसंत पंचमीच्या दिवशी कामदेव व्यतिरिक्त भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. वसंत पंचमीला राधा आणि कृष्ण यांचीही पूजा केली जाते कारण ते खरे प्रेमाचे प्रतीक आहेत. (Top Marathi News)

Vasant Panchami

कोण आहेत कामदेव?
प्रेम आणि संभोगाची देवता आहे कामदेव आणि त्याची पत्नी रती. पौराणिक कथेनुसार कामदेव हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे पुत्र आहेत. त्याचे लग्न रतीशी झाले आहे. जेव्हा भगवान शिवांनी क्रोधाने त्यांना जाळून टाकले होते, तेव्हा द्वापार युगात त्यांना पुन्हा भगवान श्रीकृष्णाच्या पुत्र प्रद्युम्नाच्या रूपात त्यांचे शरीर प्राप्त झाले. सतीच्या आत्मदहनानंतर एकांतवासातील भगवान शिवाच्या मनात प्रेम जागृत करण्यासाठी देवतांनी कामदेवाचे सहकार्य घेतले होते, जेणेकरून भगवान शिवाचे लक्ष विचलित होईल आणि ते माता पार्वतींशी पुन्हा एकत्र येऊ शकतील. (Latest Marathi HEadline)

यामुळे कामदेवाने पत्नी रतीसह भगवान शंकराचे लक्ष विचलित केले. परिणामी ते भगवान शंकराच्या कोपाचा बळी झाला. कामदेवाला भस्माच्या रूपात पाहून रती शोक करू लागली, तेव्हा भगवान शिवाने आशीर्वाद दिला की कामदेव भव रूपात उपस्थित राहतील. ते मेलेले नाहीत, ते अंगविहीन आहेत, कारण त्यांचे शरीर नष्ट झाले आहे, ते आता अवयवहीन आहेत. शिवाने त्यांना प्रद्युम्नाच्या रूपाने त्यांचे शरीर पुन्हा प्राप्त करण्याचे वरदान दिले होते. (Top Trending News)

========

Gupt Navratri : माघ गुप्त नवरात्रींचा आजपासून आरंभ

Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?

========

वसंत पंचमीला कामदेव आणि रती यांची पूजा कशी करावी?
कामदेव आणि रती यांचे चित्र प्रतिष्ठित करावे. नंतर त्यांची पूजा करावी. कामदेवाला फुलं, चंदन, धूप, दिवा, अगरबत्ती, सुपारी, अत्तर, गुलाबी कपडे, सौंदर्य वस्तू इत्यादीं वस्तू अर्पण कराव्या. त्यानंतर रतीची पूजा करा. रतीला श्रृंगाराच्या वस्तू द्या. ॐ कामदेवाय विदमहे, रति प्रियै धीमही, तन्नो अनंग प्रचोदयात्। या मंत्राने पूजा केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळते. तसंच तुम्हाला चांगला जीवनसाथी मिळू शकतो. अशाप्रकारे पूजेसाठी वर दिलेला मंत्र आणि पद्धतीनुसार तुम्ही आज कामदेव आणि रती यांची पूजा करू शकता. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.