कोणत्याही व्यक्तीला विचारले की, तुमचा आवडता नाश्ता कोणता? किंवा आवडते कुझीन कोणते? तर जवळपास ७० ते ८० टक्के लोकांचे उत्तर एकच असेल ते म्हणजे इडली, डोसा किंबहुना साऊथ इंडियन कुझीन. अतिशय चविष्ट आणि बनवायलाही सोपे असणारे साऊथ इंडियन पदार्थ सर्वांचेच जीव की प्राण असतात. त्यातही मऊ लुसलुशीत इडली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती आहे. हे आंबवलेले खाद्यपदार्थ केवळ चवीलाच अप्रतिम नसतात, पण आंबवलेले अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते. हे पदार्थ पचायला अतिशय हलके असतात. त्यामुळे अनेक लोकं जे डाएटवर असतात ते देखील अगदी बिनधास्त हे पदार्थ खातात. (Food)
मात्र साऊथ इंडियन पदार्थ बनवताना त्याचे पीठ आंबवणे ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची पायरी असते. कारण हे पीठ आंबल्याशिवाय इडली, डोसा हे पदार्थ बनूच शकत नाही. पीठ आंबवण्यासाठी उष्णता किंवा उष्ण वातावरण खूपच महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात ठीक आहे, मात्र हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने इडली, डोसा पीठ आंबवणे खूपच कठीण होऊन बसते. रात्रभर पीठ ठेऊनही हे पीठ नीट आंबत नाही. एकतर पीठ आंबतच नाही नाही तर अपेक्षित आंबटपणा त्याला येत नाही. आणि पीठ नीट न आंबल्याने इडली डोसा नीट बनत नाही. अशावेळेस महिलांसमोर मोठा प्रश्न असतो की, इडली डोसा पीठ थंड वातावरणात कसे आंबवावे? यास्तहीच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही अतिशय सहज आणि उत्तम पद्धतीने पीठ आंबवयु शकता. (Kitchen Tips)
* सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पीठ चांगले वाटून तयार झाल्यानंतर, तयार झालेले पीठ गॅसजवळ, फ्रीजच्या वर, किंवा स्वयंपाकघरात उबदार ठिकाणी ठेवा. ओव्हन असेल तर फक्त लाईट ऑन करून आत ठेवा. पण ओव्हन गरम करु नका. (Idli Batter)
* पीठ भिजवताना किंवा दळताना थोडेसे कोमट पाणी वापरल्याने आंबायला मदत होते. त्यानंतर मीठ नंतर घाला. दळल्यानंतर पीठ थोडं आंबू द्या, मग मीठ घाला. मीठ लवकर घातल्यास आंबणं मंद होते. (Todays Marathi Headline)

* ग्राइंडरमध्ये तांदूळ दळताना त्यात पोहे किंवा शिजवलेला भात घालून दळा. असे केल्याने पीठ लवकर आंबते. हाताने पीठ मिसळल्यास ते लवकर आंबते. कारण आपल्या हातांची उष्णता पिठात पसरते आणि पीठ लवकर आंबण्यास मदत करते. (Social Updates)
* एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. त्यामध्ये जाडसर टॉवेल ठेवा या गरम पाण्याच्या भांड्यात इडलीच्या पीठाचे भांडे ठेवून त्यावर झाकण लावा. गरम पाण्याची वाफ आणि उष्णता पीठाला बाहेरून उबदार ठेवेल. (Marathi)
* पीठ आंबवण्यापूर्वी मीठ घालणे टाळावे, कारण मीठ आंबवण्याची प्रक्रिया मंद करते. तांदूळ आणि डाळ बारीक केल्यानंतर मीठ न घालता पीठ आंबवण्यासाठी ठेवा. मीठ फक्त सकाळी किंवा इडली बनवण्यापूर्वीच मिसळावे. (Latest Marathi News)
* जर पीठ आंबत नसेल, तर तुम्ही घरी बनवलेले दही आणि इनो वापरू शकता. इनो आणि दही पीठ लवकर आंबण्यास मदत करतात. थंड हवामानात, दही आणि इनो पीठ लवकर आंबवतात. दह्याचा आंबटपणा देखील आंबवण्यास मदत करू शकतो. (Top Marathi News)
* १ ते २ चमचे जुने आंबलेले इडली पीठ नवीन पिठात मिसळल्यास आंबण्याची प्रक्रिया झपाट्याने होते. हिवाळ्यात पीठ आंबण्यासाठी १२ ते १८ तास लागू शकतात. सतत झाकण उघडून पाहू नका, त्यामुळे उष्णता कमी होते. (Latest Marathi Headline)
* पीठ हाताने फेटल्यास म्हणजेच हाताने केल्यास हातातील उष्णता आणि नैसर्गिक बॅक्टेरिया किण्वन प्रक्रियेला अर्थात आंबवण्याच्या चालना देतात. त्यामुळे पीठ मिक्स करण्यासाठी चमच्याऐवजी हात वापरा आणि चांगले फेटून घ्या. तसेच, भांड्यावर घट्ट झाकण ठेवा किंवा भांडे कपड्याने गुंडाळून ठेवा, जेणेकरून उष्णता आत टिकून राहील. (Top Trending Headline)
======
Simmer Dating नक्की काय आहे? Gen Z तरुणाईमधील रिलेशनशिपचा नवा ट्रेंड
======
* यीस्ट हे पीठ आंबवण्यास वेगवान करण्यास मदत करते. ब्रेड, डोसा किंवा खमन यांच्या पिठात किंवा पिठात मीठ आणि साखर घालून थोडे यीस्ट मिक्स करू शकता. हे किण्वन प्रक्रियेला देखील गती देते. (Top Stories)
* कांद्याचा एक छोटा तुकडा सोलून घ्या आणि डोसा पिठात किंवा खमण पिठात किंवा कोणत्याही आंबलेल्या पिठात घाला आणि उबदार ठिकाणी ठेवा. असे केल्याने आंबायलाही गती मिळते. शिजवताना फक्त हा कांद्याचा तुकडा बाहेर काढा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
