Home » Perfume : परफ्यूम प्लॉस्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतच का साठवले जातात?

Perfume : परफ्यूम प्लॉस्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतच का साठवले जातात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Perfume
Share

आजच्या मॉडर्न काळात ऍक्सेसरीज खूपच अत्यावश्यक बाब झाली आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यात विविध ऍक्सेसरीजचा वापर करत असते. मग यात फॅशनेबल स्कार्फ असो, बेल्ट, पर्सेस असो किंवा इतर गोष्टी. या ऍक्सेसरीजशिवाय आपला एकही दिवस पूर्ण होत नाही. कमी अधिक प्रमाणात ऍक्सेसरीज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. याच ऍक्सेसरीजमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘परफ्युम’. आपल्याला आणि आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुगंधित सुवास यावा यासाठी परफ्युम अंगावर मारला जातो. परफ्युममुळे आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील फ्रेश वाटते. (Perfume)

पूर्वी परफ्युम खास दिवशीच वापरला जायचा. मात्र आजच्या काळात परफ्युम दैनंदिन जीवनात सर्रास वापरला जातो. त्यामुळेच परफ्युमची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. आपण जेव्हा जेव्हा परफ्युम खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की, परफ्युमच्या बाटल्या सर्वच काचेच्या असतात. कोणत्याही ब्रॅण्डचा परफ्युम घेतला तरी तो काचेच्या बाटलीत येतो तर असे का? परफ्युम काचेच्या बाटलीत असण्यामागे देखील एक खास कारण आहे, कोणते ते जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Perfume

परफ्यूममध्ये आवश्यक तेले आणि अल्कोहोल असते, जे त्याचा सुगंध टिकवून ठेवतात. प्लास्टिकच्या बाटलीत साठवल्यास, प्लास्टिकमधील रसायनांशी परफ्यूममधील रसायने एकत्र येऊन त्यावर रिऍक्ट करू शकतात. अर्थात त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतात. असे झाल्यास परफ्युमचा सुगंध बदलू शकतो किंवा तो खराब देखील होऊ शकतो. काच हा एक नॉन-रिअॅक्टिव्ह पदार्थ आहे, जो परफ्यूमची गुणवत्ता दीर्घकाळ टिकवून ठेवतो. परफ्यूमला जास्त टिकवण्यासाठी थेट सूर्यप्रकाश आणि जास्त उष्णतेपासून दूर ठेवणे महत्वाचे असते. काचेच्या बाटल्या विशेषतः गडद किंवा गोठलेल्या काचेच्या बॉटल्स, प्रकाश परावर्तित करत नाही आणि परफ्यूम टिकवून ठेवतात. याउलट प्लास्टिक हे संरक्षण देत नाही. (Top Marathi News)

प्लास्टिकमधील सूक्ष्म कण कालांतराने परफ्यूममध्ये मिसळू शकतात. यामुळे परफ्युमचा सुगंध तर खराब होतोच सोबतच त्वचा रोगाचा देखील धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय ऍलर्जी होण्याची शक्यता सुद्धा वाढते. काच पूर्णपणे निष्क्रिय असते म्हणजेच ती प्रतिक्रिया देत नाही. काचेच्या बाटल्या परफ्यूमला एक क्लासी आणि प्रीमियम लूक देतात. त्या मजबूत असतात आणि परफ्यूम दीर्घकाळ टिकवून ठेवतात. प्लास्टिकच्या बाटल्या हलक्या असल्या तरी काचेसारख्या क्लासी फील त्या देऊ शकत नाही. परफ्यूमचा सुगंध खूप नाजूक असतो. कोणताही दुसरा वास त्याचा खरा परिणाम नष्ट करू शकतो. प्लास्टिकला काही काळाने थोडासा वेगळा वास येऊ शकतो, परंतु काच पूर्णपणे गंधहीन असते. म्हणून परफ्यूमची शुद्धता राखण्यासाठी काच हा सर्वोत्तम पर्याय आहे. परफ्यूम नेहमी थंड, गडद ठिकाणी साठवा. (Top Trending Headline)

========

Vastutips : घरात घोड्याची नाल लावण्याने होतील चमत्कारिक फायदे

========

दिर्घकाळ परफ्यूम कसा टिकवावा?
कितीही महाग किंवा स्वस्त परफ्यूम विकत घेतले तरी तुम्हाला नेहमी बाटली व्यवस्थित बंद करावी लागते कारण बाटली उघडल्यानंतर ऑक्सिजनचा त्यावर परिणाम होऊ लागतो. परिणामी बाटलीतील परफ्यूम कमी होतो आणि त्यासोबत त्याचा वासही कमी होतो. सुगंध बाहेर पडू नये म्हणून बाटली घट्ट बंद ठेवा. परफ्यूमला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज नाही. फक्त खोलीच्या तपमानावर साठवा. परफ्यूम टिकवून ठेवण्यासाठी, त्याचा सुगंध टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला प्रीमियम लूक देण्यासाठी काचेच्या बाटल्या सर्वोत्तम पर्याय आहेत. लॅम्पखाली परफ्यूम ठेवू नये परफ्यूमसाठी थोडासा प्रकाशही योग्य नाही. त्यामुळे तो कपाटात ठेवावा. परफ्युम लावताना तो कधीही हलवू नका. थेट लावा. (Scoial News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.