NRI Village : भारताच्या प्रत्येक राज्यात एखादं तरी गाव असं असतं जे आपल्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध असतं. पण पंजाबमधील दोआबा प्रदेशातलं एक छोटं गाव मात्र संपूर्ण देशात NRI ( गाव )Village म्हणून ओळखलं जातं. कारण या गावातील बहुतेक लोक परदेशात कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया स्थायिक झालेले आहेत. गावाचं नाव आहे बंगा तालुक्यातील बीतलपूर (Bittalpur), ज्याला स्थानिक लोक प्रेमाने “NRI Village” म्हणतात.
या गावातील जवळजवळ प्रत्येक घरात कुणीतरी ना कुणीतरी विदेशात काम करतं किंवा शिक्षण घेतं. शेतकरी कुटुंबातील मुलांनी 90 च्या दशकात परदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी प्रस्थान केलं आणि त्यानंतर संपूर्ण गावाचं चित्र बदललं. आज गावात आधुनिक बंगलो, परदेशी गाड्या आणि उच्च दर्जाची पायाभूत सुविधा दिसतात. या गावात परत येणाऱ्या NRI रहिवाशांनी आपल्या पैशातून शाळा, आरोग्य केंद्रं आणि मंदिरांचं नूतनीकरण करून समाजासाठी मोठं योगदान दिलं आहे.

NRI Village
गावकऱ्यांच्या मते, परदेशात गेलेल्या लोकांनी आपल्या गावाशी नाळ तुटू दिली नाही. ते दरवर्षी दिवाळी, लोहरी किंवा बैसाखी सारख्या सणांमध्ये गावात परत येतात आणि समाजसेवेसाठी निधी देतात. गावातील युवकांनाही उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळते. “NRI CLUB” नावाचा एक स्थानिक गटही आहे, जो गावातील विकासकामांसाठी निधी गोळा करतो. त्यामुळं आज या गावात उत्तम रस्ते, सौर दिवे आणि डिजिटल सुविधा आहेत ज्या अनेक शहरांमध्येही दुर्मिळ आहेत.
===================
हे देखील वाचा :
Badshah Babar : मुघल बादशाह बाबरला काबुलमध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची का इच्छा होती?
Donald Trump : अमेरिकेत का लागू झालेय शटडाऊन !
Afghanistan : तालिबानचे डिजिटल लॉकडाऊन !
=====================
सायबर कॅफेपासून इंग्रजी शाळांपर्यंत सर्व आधुनिक सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत. गावातील लोक सांगतात की, परदेशात राहणारे सदस्य आपापल्या घरांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी विचार करतात. आमचं गाव म्हणजे एक कुटुंब आहे त्यांच्या मते, NRI लोकांनी गावात गुंतवणूक केल्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आहेत आणि ग्रामीण भागात आधुनिकतेचं नवं पर्व सुरू झालं आहे.
भारतामध्ये अशा अनेक “NRI Village” उदाहरणं आहेत पंजाब, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये. पण बीतलपूर (Bittalpur) गावाचं यश हे त्यातील लोकांच्या एकतेचं आणि आपल्या मुळांवरील प्रामाणिक प्रेमाचं प्रतीक आहे. परदेशात राहूनही भारतीय संस्कृती आणि गावाशी जोडलेलं राहणं हेच या गावाचं खरं वैशिष्ट्य आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics