सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळतोय. पाऊसामुळे संपूर्ण वातावरण थंड झाले आहे. पाऊस हा येताना आपल्यासोबत मोठा आनंद घेऊन येतो त्यामुळेच हा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटत असतो. पाऊस जितका सुखावणारा असतो, तितकाच तो त्रासदायक देखील ठरतो. या पाऊसाचा परिणाम अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील मोठ्या प्रमाणात जाणवतो.
पाऊसामुळे सतत ढगाळ वातावरण असते, या वातावरणाचा परिणाम थेट किचनमधल्या आपल्या सामानावर देखील होताना दिसतो. आपण किचनमध्ये मीठ आणि साखर ठेवत असलेल्या डब्ब्यात अचानक ओलसरपणा जाणवू लागतो, याचे कारण म्हणजे या ऋतूमध्ये मिठाला आणि साखरेला पाणी सुटते. त्यामुळे या वस्तू खराब होण्याची भीती असते. यासाठी जर आपण काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तर त्रास तुम्हाला जाणवणार नाही. (Todays Marathi HEadline)
* पावसाळ्यात साखर आणि मीठ हे प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये न ठेवता काचेच्या बरण्यांमध्ये ठेवा. याशिवाय साखर किंवा मीठ काढत असताना नेहमी सुक्या हाताने काढा. ओल्या हाताने या वस्तू काढताना आपल्या हातचा ओलावा जर पदार्थाला लागला तर ती ओली होते.
* साखरेला ओलसरपणा येऊ नये यासाठी साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाका. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचूंडी टाकून ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषला जाईल आणि साखर किंवा मिठ कोरडे राहील. (Marathi Latest News)
* साखर आणि मीठ दीर्घकाळ टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरचाही वापर देखील फायदेशीर आहे. ब्लोटिंग पेपर ओलावा खेचून घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे बरणीमध्ये मीठ किंवा साखर भरण्यापूर्वी बरणीत ब्लोटिंग पेपर टाकावा.
* पावसाळ्यामध्ये साखरेला आणि मिठाला ओलसरपणा येऊ नये म्हणून साखरेमध्ये सात-आठ लवंग टाकून ठेवा. यामुळे त्याला ओलसरपणा लागणार नाही शिवाय मुंग्या देखील येणार नाहीत. (Marathi Top HEadline)
* साखर किंवा मीठ ठेवण्याच्या डब्याचे झाकण सैल असेल तर साखर किंवा मीठ ओलसर होऊ शकते. त्यामुळे साखरेच्या, मिठाच्या डब्याचे झाकण घट्ट लावा किंवा एअर टाइट कंटेनरमध्ये मीठ किंवा साखर ठेवावी. यामुळे पदार्थ ओलसर रहात नाहीत. (Top Trending News)
* तसेच साखरेच्या डब्यात दालचिनीचा तुकडा ठेवल्यास देखील फायदा होतो. हाच उपाय मीठासाठीही करू शकता.
* बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावा. वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल. त्यामुळे दमटपणा कमी होईल आणि मीठ किंवा साखर खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेच बदलावा. (Marathi Latest NEws)
* साखरेच्या किंवा मिठाच्या बरणीत लाकडी टूथपिक ठेवा. लाकूड नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेते, ज्यामुळे साखर आणि मीठ कोरडे राहण्यास मदत होते. (Social Updates)
=========
हे देखील वाचा :
Health Care : शरीरातील रक्त वाढीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे सेवन करता? लक्षात ठेवा या गोष्टी
Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत
=========
* साखरेच्या डब्यात सुकलेल्या लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे ठेवा. लिंबाची साल नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेते. तसेच यामुळे साखरेला एक हलका सुगंधही येतो.
* काही लोकांना बरण्यांमध्ये थेट हात टाकून पदार्थ काढण्याची सवय असते. मात्र असे करणे टाळावे अन्यथा त्यामुळे साखर, मीठ ओलं होऊ शकते. हे जिन्नस काढण्यासाठी नीट पुसलेला, कोरडा चमचा वापरा. त्यामुळे स्वच्छताही राहील आणि पदार्थ कोरडे देखील राहतील. तसेच साखर वा मीठ काढल्यावर बाटलीचे वा डब्याचे झाकण घट्ट बंद करा. (Top Stories)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics