Home » Virginity Test : इथे लग्नाआधी ‘मुलाची’ Virginity चेक होते !

Virginity Test : इथे लग्नाआधी ‘मुलाची’ Virginity चेक होते !

by Team Gajawaja
0 comment
Virginity Test
Share

‘कांदे पोहे आवडले तर मुलगी पसंद आहे’, ‘आमची पोरगी चपात्या गोल बनवते, पोरगी पसंत आहे’. इतकंच काय लग्नाच्या आदल्यादिवशी हळद नको, दोन दिवसाआधी हळद आणि सोय पाहिजे.. जसा काळ बदलला तशा प्रथा सोयीनुसार बदलत गेल्या. आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा ऐकल्या. पण कधी लग्नाआधी नवऱ्या मुलाची वर्जिनिटी टेस्ट होते असं कधी ऐकलंय का? तर ही प्रथा आहे युगांडा, बान्यांकोले मधली आणि बरं ही वर्जिनिटी टेस्ट कोण करतं माहिती आहे? चला तर मग जाणून घेऊ. (Virginity Test)

बान्यांकोले, ही युगांडामधली एक प्रमुख आदिवासी जमात आहे, जी युगांडातल्या अंकुले प्रदेशात राहते. ही जमात बांटू वंशाची आहे, आणि त्यांचं आयुष्य शेती, पशुपालन आणि सामाजिक परंपरांभोवती फिरतं. बान्यांकोले लोकांचं जीवन गायींवर खूप अवलंबून आहे, कारण गायी त्यांच्यासाठी संपत्ती, सामाजिक दर्जा आणि सांस्कृतिक मूल्यांचं प्रतीक मानल्या जातात. त्यांच्याकडे दोन उपजमाती आहेत, एक म्हणजे ‘बाहिमा’, जे गुराखी आहेत आणि दुसरे ‘बैरु’ ज्यांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे. या जमातीत मुलीची आणि मुलाची दोघांचीसुद्धा वर्जिनिटी टेस्ट होते. आता ही व्हर्जिनिटी टेस्ट करण्याची प्रथा सुरु कशी झाली? ते बघूया..(Top Stories)

Virginity Test

बान्यांकोले जमातीच्या व्हर्जिनिटी टेस्ट प्रथेची सुरुवात त्यांच्या पारंपरिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेतून झाली. त्यांच्यासाठी लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत, तर संपूर्ण जमात एकत्र येणं महत्त्वाचं मानतात. त्यांच्या संस्कृतीत, मुलगी वर्जिन असणं तिच्या कुटुंबाच्या सन्मानाचं गोष्ट मानली जाते. ही प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. हे कुटुंबाचा दर्जा आणि समाजात विश्वास टिकवण्यासाठी महत्त्वाचं होतं. पण इथे आणखी एक गोष्ट म्हणजे, या जमातीत मुलगा सुद्धा वर्जिन आहे का? हे पाहिलं जातं. म्हणजे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी दोघेही वर्जिन असणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे दोघं वर्जिनिटी टेस्ट पास झाले की, मगच दोघांचं लग्न लावलं जातं.(Top Stories)

आता प्रश्न असा की, ही वर्जिनिटी टेस्ट कोण करतं आणि कशी होते? तर ही वर्जिनिटी टेस्ट मुलीची मावशी करते किंवा मुलीच्या कुटुंबातली ज्येष्ठ स्त्री करते. पण ही प्रोसेस खूप खासगी असते. यात मुलीच्या फिजिकल ऑबजरवेशन मधून मुलीची टेस्ट होते आणि मुलाची टेस्ट सुद्धा तीच मावशी करते. त्यात ती मुलाची सेक्शुअल पावर चेक करण्यासाठी त्याच्यासोबत संबंध ठेवते. काही वेळेस तर, मावशी पहिल्या रात्री जेव्हा नवरा नवरी संबंध ठेवतात, ती त्याचं ऑबजरवेशन करते. ज्याचा उद्देश ते दोघे एकमेकांना अनुरूप आहेत का? आणि त्यांची reproduction करण्याची क्षमता आहे का? याची खात्री करणं एवढंच आहे.(Virginity Test)

================

हे देखील वाचा : Panki Hanuman : या मंदिरात दिवसातून तीन वेळा बदलतो हनुमानाचा चेहरा !

================

आता या प्रथेमागची कारणं बघू. बान्यांकोले जमातीच्या व्हर्जिनिटी प्रथेमागे अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कारणं आहेत. पहिलं म्हणजे, त्यांच्या समाजात गायी आणि संपत्ती ही सामाजिक दर्जाचं प्रतीक आहे. लग्नात हुंडा म्हणून गायी दिल्या जातात, आणि त्याचं मूल्य ठरतं मुलीच्या वर्जिनिटीवर आणि वराच्या sexual power वर. त्यामुळे ही वर्जिनिटी टेस्टची प्रथा त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा एक भाग बनली. दुसरं म्हणजे, बान्यांकोले समाजात कुटुंब आणि समुदाय यांचं महत्त्व खूप आहे. लग्न हे दोन व्यक्तींचंच नाही, दोन कुटुंबांचं बंधन आहे. त्यामुळे मुलगा आणि मुलगी यांच्या शारीरिक आणि सामाजिक योग्यतेची खात्री करणं महत्त्वाचं मानलं जातं. तिसरं, ही प्रथा त्यांच्या पारंपरिक विश्वासांशी जोडली गेली आहे, जिथे purity आणि sexual power यांना पवित्र मानलं जातं.(Top Stories)

पण या बान्यांकोले जमातीच्या व्हर्जिनिटी प्रथेवर बरेच वाद आहेत. ही प्रथा आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी कमी झाली आहे, पण काही ग्रामीण भागात अजूनही टिकून आहे. आज बऱ्याच लोकांना ही प्रथा चुकीची वाटते, या प्रथेवर बऱ्याच टीका सुद्धा झाल्या. पण बान्यांकोले जमात या पारंपरिक प्रथेला अजूनही तितकंच पवित्र मानतात आणि ही प्रथा पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या त्यांच्या परंपरेचा भाग आहे. तुम्हाला या प्रथेबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.