Home » Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेच्या सासऱ्याला आणि दिराला पोलिसांकडून अटक

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेच्या सासऱ्याला आणि दिराला पोलिसांकडून अटक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vaishnavi Hagawane
Share

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण कमालीचे चर्चेत आले आहे. १६ मे रोजी वैष्णवीने तिच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी लग्नानंतर वैष्णवीला हुंड्यासाठी खूप त्रास दिला. तिचा सतत हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. यालाच कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईवडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा नवरा शशांक, सासू आणि नणंदेला पोलिसांनी लगेच अटक केली. वैष्णवीचा सासरा आणि दीर फरार होते. आज अखेर पोलिसांना त्यांना देखील पकडण्यात यश आले आहे. (Vaishnavi Hagawane)

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे मागील सात दिवासांपासून फरार होते. त्यांना आज २३ मे रोजी सकाळी पहाटे ४.३० वाजता स्वारगेट इथून पोलिसांकडून अटक करण्यात आली. वैष्णवीचा सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या ७ दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके सतत त्यांना पकडण्याच्या कामावर होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनं बावधन पोलिसांना मोठं यश मिळाले. (Todays Marathi News)

Vaishnavi Hagawane

दरम्यान राजेंद्र आणि सुशील सात दिवस फरार होते. त्यांना आज अटक करण्यात आली, मात्र अटकेपूर्वी ते एका हॉटेलमध्ये मटण खातानाचे सीसीटीव्ही फुटेजवर दिसले. अटक झाल्यावर पत्रकारांनी राजेंद्रला, “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” असा प्रश्न विचारला. यावर राजेंद्रने कोणताहे दुःख व्यक्त न करता उलट रुबाबामध्ये उत्तर देत नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत नकार दिला. त्याचे हे वागणे पाहून लोकांचा त्याच्यावरचा राग अधिकच वाढला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरही त्याच्यावर टीका होत आहे. (Top Marathi Headline)

सात दिवस राजेंद्र हगवणेने काय केले?
मीडिया रिपोर्टनुसार, १७ मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंध हॉस्पिटलला गेला होता. पुढे तो थार गाडीने मुहूर्त लॉन्सला गेला. त्यानंतर वडगाव मावळ आणि पवना डॅम येथील फार्म हाऊसवर गेला. त्याच दिवशी राजेंद्र आळंदी येथील एका लॉजवर गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मे रोजी तो पुन्हा एकदा वडगाव मावळ आणि पवना डॅम येथील बंडू फाटक कडे बलेनो गाडीने गेला. पुढे तो १९ मे रोजी पुण्याहून साताऱ्याला गेला. (Top Stories)

१९ मे आणि २० मे रोजी राजेंद्र हगवणे हा पुण्याच्या बाहेरच होता. १९ मे आणि २० मे रोजी तो पसरणी मार्गे कोगनोळी येथील हॉटेल हेरीटेज येथे होता. यानंतर त्याने २१ मे रोजी कोगनोळी येथील प्रीतम पाटील या मित्र्याच्या शेतावर मुक्काम केला. यानंतर तो पुण्यात परतला. २२ मे रोजी राजेंद्र हगवणे परत पुण्यामध्ये आला. याबद्दल पोलिसांना भनक लागली आणि त्यानंतर आज २३ मे रोजी पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला स्वारगेट परिसरातून अटक केली आहे. (Latest Marathi Headline)

Vaishnavi Hagawane

नक्की प्रकरण काय?
पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केली. या अघटनेनंतर वैष्णवीच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांना आधीच अटक केली. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. (Marathi News)

पुढे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक आणि तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून तिला सतत बोलले जात होते. वैष्णवीची नणंद करिष्मा देखील या सर्व छळात पुढे होती. वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते. (Social News)

======
======

या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आल्याने या प्रकरणाला एक वेगळेच वलय आणि महत्व मिळाले आहे. या प्रकरणानंतर अजित पवारांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पक्षातून काढून टाकलं. सुप्रिया सुळे यांनीही निष्पक्ष तपासाची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. वैष्णवीच्या १० महिन्यांच्या बाळाला तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र महिला आयोगानं मध्यस्थी केली. (Top Trending News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.