पाकिस्तानच्या सैनिकांसाठी 9 मे ही तारीख ब्लॅक डे सारखी आहे. दोन वर्षापूर्वी या 9 मे रोजी पाकिस्तानमध्ये लष्कराविरुद्ध मोठा उठाव झाला. दोन वर्षापूर्वी, 9 मे रोजी पाकिस्तानमध्ये जे उग्र जनआंदोलन झालं, त्यामध्ये या देशाची अर्थव्यवस्था पार तळाला गेली. माजी पंतप्रधान इम्रान खान इस्लामाबाद हायकोर्टात जात असतांना त्यांना अटक कऱण्यात आली. इम्रान खानला अटक झाल्याची बातमी वा-यासारखी त्याच्या चाहत्यापर्यंत पोहचली आणि त्यांनी अवघ्या पाकिस्तानमध्ये हैदोस घालायला सुरुवात केली. 9 मे 2023 रोजी पाकिस्तानमध्ये मोठी दंगल झाली. इम्रान खानच्या अटकेनंतर पेटलेली ही दंगल शांत होण्यासाठी आठवडा लागला. त्या काळात पाकिस्तानचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. अगदी पाकिस्तानच्या लष्करी भागातही या दंगेखोरांनी येऊन गाड्या जाळल्या. ही दंगल पाकिस्तानच्या इतिहासात सर्वात उग्र दंगल ठरली. (Pakistan)
पाकिस्तानी सैन्यासाठी हा 9 मे चा दिवस तेव्हापासून काळा दिवस मानला जातो. आता पुन्हा त्या 9 मे सावट पाकिस्तानी सैन्यावर आहे. कारण याच 9 मे दिवशी पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आर्मीनं पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. शिवाय पाकिस्तानचे कराची बंदरही नष्ट झाल्याची बातमी आहे. भारताकडून होणा-या हल्ल्यांची तीव्रताही वाढली आहे. यासोबत महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानला जगापासून वेगळं पाडण्यात भारताची रणनिती यशस्वी झाली आहे. याच 9 मे च्या दिवशी पाकिस्तानवर अमेरिकेनंही जे केलं आहे, ते भोगावं लागेल, अशा शब्दात आसूड ओढले आहेत. या सर्वात 9 मे च्या रात्री भारत पाकिस्तानवर आणखी मोठा हल्ला करणार ही भीती तेथील नागरिकांमध्ये आहेच, पण पाकिस्तानी सैन्यही घाबरले आहे. त्यामुळे 9 मे ची दहशत आता पाकिस्तानी सैन्यावर पसरली आहे. (Latest Updates)
पाकिस्तानी सैन्याला पुन्हा एकदा काळ्या दिवसाच्या भीतीने पछाडले आहे. 9 मे हा दिवस पाकिस्तानी सैन्य काळा दिवस असल्याचे मानते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कारवाई करत तेथील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले आहेत. तसेच पाकिस्तानने भारतावर जिथून ड्रोण हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्या जागाही भारतानं नष्ट केल्या आहेत. अगदी पाकिस्तानची संरक्षण यंत्रणाही भारतानं नाकाम केली आहे. यानंतर भारतीय हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य पुन्हा 9 मे च्या धास्तीमध्ये आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी 9 मे रोजी पाकिस्तानमध्ये मोठी दंगल झाली होती. (Pakistan)
ही दंगल पाकिस्तानच्या सैन्याच्या विरोधात होती. 9 मे 2023 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयातून अटक करण्यात आली. 9 मे 2023 रोजीही शाहबाज पंतप्रधान होते आणि असीम मुनीर लष्करप्रमुख होते. या दिवशी झालेल्या दंगलीनं पाकिस्तानचे अवघ्या जगात हसू झाले होते. इम्रान खानच्या अटकेनंतर जमाव हिंसक झाला आणि त्यांनी सरकारी इमारती, लष्करी तळांवर हल्ले केले. रावळपिंडी येथील आर्मी कॉर्प्स कमांडरचे निवासस्थान, जनरल मुख्यालय, पाकिस्तान एअर फोर्सचा आलम एअरबेस, फैसलाबादमधील आयएसआय कार्यालय आणि चक्रामधील फ्रंटियर कॉर्प्स किल्ला यांना तेथील सामान्य नागरिकांनी ताब्यात घेतले. तिथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ कऱण्यात आली. अगदी लष्कराच्या गाड्याही दंगेखोरांनी सोडल्या नाहीत. यात अंदाजे दोन अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले. यातून पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी जनता यांच्यामधील विरोधाभासाची माहिती जगभर झाली. (Latest Updates)
==============
हे देखील वाचा : War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक
INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !
==============
आता पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा याच 9 मे ची दहशत आहे. आत्ताही शाहबाज पंतप्रधान आहेत आणि असीम मुनीर लष्करप्रमुख आहेत. या दोघांच्या विरोधात पुन्हा इम्रान खानचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. कप्तानसाहब को छोडो नही तो पाकिस्तान जला देंगे, अशा घोषणा देत हे समर्थक मोठं आंदोलन करण्याची तयारी सुरु करत आहेत. हे गृहयुद्ध पेटत असतांना भारताकडून होणा-या आक्रमणाची तीव्रता वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच शाहबाज आणि मुनीर यांनाही या 9 मे ची भीती वाटत आहे. 9 मे च्या रात्री भारत मोठा हल्ला करणार अशी चर्चा आता पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे. 8 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि सीमेपलीकडून होणारे कट उद्ध्वस्त केल्याने, जनरल मुनीर आणि शेहबाज शरीफ यांची भीती वाढली आहे. (Pakistan)
सई बने