हिंदू धर्मातील आद्य देवता म्हणून गणेशाला विशेष स्थान आहे. विद्येची, कलेची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीचे अनेक सण साजरे केले जातात. दर महिन्याला येणारी चतुर्थी आणि भाद्रपदामध्ये येणारा गणेशोत्सव सर्वांचेच आवडीचे सण आहे. मात्र यासोबतच दरवर्षी माघ महिन्यात गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवसाला म्हणतात गणेश जयंती. (Maghi Ganesh)
गणेश जयंती (Ganesh Jayanti) हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हणले जाते. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखविला जातो. (Maghi Ganesh Information)
गणेश जयंती माघी विनायक चतुर्थीला असते. त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला. जे लोक गणेश जयंतीचे व्रत ठेवून गणपती महाराजांची आराधना करतात त्यांचे सर्व संकट दूर होऊन त्यांचे कार्य सफल होते. गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्मदिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंतीचा दिवस असतो. (Ganesh Featival)
उद्या अर्थात १ फेब्रवारी रोजी सर्वत्र गणेश जयंती अर्थात माघी गणपती उत्सव साजरा केला जाणार आहे. मग या माघी गणपतीचे किंवा गाणेच जयंतीचे महत्व काय आहे? या दिवशी गणेशाची पूजा कशी करता? या दिवस कसा साजरा करतात चला जाणून घेऊया. (Top Stories)
या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १ फेब्रुवारी शनिवार रोजी येत आहे. १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होणार आहे तर २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी चतुर्थी संपणार आहे. उदयतिथीनुसार, १ फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. या वर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटापासून दुपारी १ वाजून ४६ मिनिटापर्यंत असणार आहे.
माघी गणपतीला अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेशाची स्थापना केली जाते आणि विधिवत पूजा केली जाते. यासोबतच घरोघरी देखील गणपती बाप्पाची यथासांग पूजा होते. एक दिवसासाठी गणेशाची स्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. (Marathi Latest News)
====================
हे देखील वाचा : Salt : 30 हजार किलो दर असणारे मीठ असते का ?
Maghi Ganesh जाणून घ्या माघी गणेशोत्सव पूजा विधी आणि मुहूर्त वेळ
===================
गणेश पुराणानुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते.