आंध्र प्रदेशमधील राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे खासदार विजयसाई रेड्डी यांनी राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला. वायएसआरसीपीचे खासदार असलेल्या रेड्डी यांचा राजीनामा आला आणि एकच खळबळ उडाली. मात्र विजयसाई रेड्डी यांनी राजीनामा का दिला हे कारण ऐकल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. कारण विजयसाई यांनी आपल्याला शेती करायची आहे, असं कारण देत खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. विजयसाई यांनी आपण कितीही प्रगत झालो तरी आपले मुळे गावात, शेतीत आहे, हे सांगितले आहे. यावरुन विजयसाई यांचा साधेपणा पुन्हा सिद्ध झाला आहे. आंध्रप्रदेशच्या राजकारणात त्यांचे नाव आदरानं घेतलं जातं. आता त्यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे. वायएसआरसीपीचे खासदार विजयसाई रेड्डी यांनी राज्यसभा खासदारपदाचा अचानक राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याशिवाय रेड्डी यांनी सक्रिया राजकारणापासून दूर होत असल्याचेही सांगितले. यापुढे आपण फक्त शेतीमध्ये काम करणार असे सांगून विजयसाई रेड्डी यांनी अनेकांना धक्का दिला आहे. (Vijayasai Reddy)
राजकारणात आलेली व्यक्ती शक्यतो अशा पद्धतीनं निवृत्ती घेत नाही. अगदी ज्यांचे खूप वय झाले आहे, ज्यांना धड चालायला येत नाही, बोलता येत नाही, असेही आपल्याला मिळालेले पद सहजासहजी सोडायला तयार होत नाहीत. मग रेड्डी यांनी हा निर्णय घेतला हे जाणून घेतलं पाहिजे. 67 वर्षाचे विजयसाई रेड्डी हे आंध्र प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत राहिले आहेत. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी आणि त्यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. रेड्डी यांची प्रथम 2016 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृतीवरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून रेड्डी यांनी काम पाहिले आहे. नंतर त्यांची राजकारणातील भूमिका बदलली असली तरी त्यांचे आणि एन चंद्राबाबू नायडू यांचे कायम मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. (Latest News)
व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट म्हणून असलेल्या रेड्डी यांची वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक म्हणूनही काम केले आहे. त्यांना पक्षाचे दुसरे प्रभारी म्हणून ओळखले जात होते. या व्यस्त राजकीय जीवनातून निवृत्ती घेणा-य़ा रेड्डी यांजा जन्म आंध्र प्रदेश मधील नेल्लोर जिल्ह्यातील तल्लापुडी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. विजयसाई यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम, तिरुपतीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून सलग दोन वेळा काम केले आहे. प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचा समितीवर त्यांनी प्रमुख म्हणून काम केले आहे. विजयसाई रेड्डी यांच्याकडे भविष्यात आणखी महत्त्वाच्या जबाबदा-या येणार अशी चर्चा असतांनाच त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या मुळ व्यवसायात परत जाण्याचा निर्णय घेतला. (Vijayasai Reddy)
आंध्र प्रदेशामध्ये तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. विजयसाई यांचा जन्म झाला आहे, त्या नेल्लोर जिल्ह्यातील तल्लापुडी येथेही मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. नेल्लोर जिल्हा प्रामुख्यानं चांगल्या दर्जाच्या भात पिकांच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील गावंना भातांचे गावं म्हणूनही ओळखले जाते. अलिकडे या भागातील प्रगतशील शेतकरी या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विक्रीसाठी नेत आहेत. याशिवाय नेल्लोरमधील काही भागात शेंगदाणाही लावला जातो. विजयसाई शेट्टी यांचे वडिलही शेतकरी होते. त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केल्याची माहिती आहे. आता विजयसाई याच वडिलांनी सांभाळलेल्या शेतीसाठी हातभार लावणार आहेत. (Latest News)
===============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
आता राजकारणापासून विजयसाई शेट्टी दूर झाले असले तरी त्यांनी राजीनामा देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. या दोघांनीही मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. रेड्डी यांनी राजीनामा दिल्यावर त्यावर उलटसुलट चर्चाही झाली. त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, अशीही टिका झाली. मात्र रेड्डी यांनी या सर्वांना उत्तर देत, आपले भविष्य हे शेतीत असल्याचे स्पष्ट केले आहे. फक्त मी नाही, तर आपण सर्वांनीच आपले मूळ, म्हणजे, शेती सांभाळायला हवी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. (Vijayasai Reddy)
सई बने